" हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाच्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे "

","","","","" />

सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत...

मराठी व्याकरण 1

मराठी व्याकरण 1




जोडाक्षरांचे लेखन

मराठीच्या वर्णमालेचा अभ्यास आपण केला.स्वर ,व्यंजन म्हणजे काय ते आपण पाहिले.त्यांचा उच्चार कसा करावयाचा ,वर्णांची उच्चारस्थाने ,वर्णांचे प्रकार यांचाही अभ्यास आपण केला. स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत.उदा.अ, आ,इत्यादी व्यंजने ही अपूर्ण उच्चारांची आहेत.  उदा.क् , ख्, ट् इत्यादी. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन  एक संयुक्त स्वर निर्माण होतो.हे आपण स्वरांच्या अभ्यासाचे वेळी पाहिले.उदा.अ+ इ = ए. दोन व्यंजने एकत्र आली की त्याला संयुक्त व्यंजन असे म्हणतात.उदा.म् + ह्     = म्ह्,त् +य् = त्य्, एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की,त्या संयुक्त व्यंजनाला द्वित्त असे म्हणतात.उदा.क्क,त् +त् =त्त् अशा संयुक्त व्यंजनाच्या शेवटी स्वर मिसळला की जोडाक्षर तयार होते. म् +ह् =म्ह्,द् +य् = द्य्,श् +च् =श्च् ही संयुक्त व्यंजने आहेत त्यामध्ये स्वर मिसळला की जोडाक्षर तयार होते.म् + ह् +अ = म्ह् ,द् +य् +अ =द्य,श् +च् +अ =श्च. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षार असे म्हणतात. ज्या क्रमाने व्यंजने व स्वर एकत्र येतात त्याप्रमाणे त्यांचा आपण उच्चार करावयाचा असतो. किंवा ज्या क्रमाने आपण उच्चार करतो त्याप्रमाणे जोडाक्षराचे लेखन करावयाचे असते. पुढील शब्दांत आलेली जोडाक्षरे पहा व त्यांची फोड पहा.
शब्द जोडाक्षर फोड
विद्यालय
पश्चिम

आम्ही

शत्रू

द्या
श्चि

म्ही

त्रू

द् + य् + आ
श् + च् + इ

म् + ह् + ई

त् + र्+ ऊ

जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे व्यंजन हे अपूर्ण उच्चारले जाते. हे लक्षात घेऊन जोडाक्षराने लेखन केले जाते.उदा.’विघ्न’ या शब्दात ‘घ्न’ हे जोडाक्षर आहे.त्यातील ‘घ्’ चा उच्चार अपूर्ण होतो.त्याचे लेखन अर्धा घ् (G ) असे केले जाते.

जोडक्षरे लिहिण्याच्या पद्धती

जोडाक्षरे  लिहिण्याच्या पद्धती आहेत.

१)आडवी जोडणी – एकापुढे एक वर्ण लिहून जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धतीला आडवी जोडणी असे म्हणतात.

उदा. क् +क् +अ = क्क,  क् +त् +ई = क्ती,

२)उभी जोडणी – एका खाली एक वर्ण लिहून जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धतीला उभी जोडणी असे म्हणतात.

उदाहरणार्थ,

जोडाक्षरे                                      आडवी जोडणी                                    उभी जोडणी

क् +क् +अ = क्क                              बक्कल,अक्कल                                       बक्कल,अक्कल

क् +व् +अ =क्व                               क्वचित,पक्व                                         क्वचित,पक्व

फ् +फ् +अ = फ्फ                           लफ्फा                                               लफ्फा

जोडाक्षरांचे प्रकार

व्यंजनांच्या लेखनपद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार दिसून येतात.पुढे काही उदाहरणे दिली आहेत.

मध्ये उभा दंड असणारी व्यंजने – क्,फ्

क् (@ ) – रक्त ,मक्ता, क्लेश              फ् (F ) – फ्लॉवर,चाफ्याचे

शेवटी उभा दंड असणारी व्यंजने

ख्,घ् ,च्,ज्,झ्,त्र्, त् , थ्,ध्, न्,प्, ब् ,भ्, म् ,य् ,व् ,ष्, स्

ख् (# ) – ख्यातनाम ,ख्याती,

घ् (G ) – वाघ्या ,विघ्न

च् (c ) – कच्चा,उच्चार ,परिच्छेद

ज् (j ) - ज्येष्ठ ,ज्वर

झ् (J ) – ओझ्याने ,माझ्या

त् (%  ) – उत्तर,उत्थान,प्रयत्न ,तत्पर,वत्सल

थ् (q ) – तथ्य,पृथ्वी

ध् ( Q )- ध्वनी, उद्धव

न् (n ) – अन्न,अन्वय ,गुन्हा

प् (P  ) – दप्तर,स्वप्न

ब् ( b  )-अब्ज, उपलब्ध,शब्द

भ् (B ) – अभ्यास,भ्याड

म् ( m  )- म्हण,निम्मा

य् (y )- शय्या,हिय्या

व् (v )- व्यर्थ,नव्वद

ष् (Y )- कष्ट,घनिष्ट

स् ( s )- अस्त, स्नान

शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने

ग् ,ण्, श्

ग् ( g) – रुग्ण,ग्लानी

ण् (N ) – मृण्मयी,अरण्य

श् ( S) –प्रश्न, अश्व,श्याम,पश्चात्

टीपः- ‘श’ हे अक्षर पूर्वी ‘श्र’ या चिन्हाने दाखविले जाई.जोडाक्षरामध्ये ते ‘ E  ‘ असे येते.उदा.अश्व,पश्चात अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी

व्यंजनेः-

छ, ल , ळ्

छ् (छ्) – उच्छ्वास (च् +छ् +व् +आ = च्छ्वा)

ल् (l )- अल्प , वल्गना

ळ् (ळ) – मळ्यात ,कळ्या

अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने

ट् ,ठ् , ड् ,ढ् ,द् ,ह्

उदा. ट् (ट् ) – घट्ट, कट्टी,कोट्यावधी

ठ्(ठ्) – विठ्ठल ,मोठ्याने

ड्(ड्) – अड्डा,वड्या,खड्ग,वाड्यात

ढ्(ढ्) – काढ्यात.दुढ्ढाचार्य

द् (द्)- उद् भव/ उद्भव,बद्दल / बद्दल /मुद्द्ल/ मुद्दल ,आद्य .आद्य

ह् (ह्) – सह्य,सह्याद्री

दंड नसलेले व्यंजन – र्

(अ) (१) ‘र्’ या व्यंजनानंतर दुसरे एखादे व्यंजन येते तेव्हा ‘र्’ या व्यंजनाचा उच्चार अपूर्ण असतो.तो पुढील व्यंजनावर (र्र)रफार किंवा रेफ देऊन त्याचे लेखन केले जाते.

र् + क् +अ = र्क – अर्क ,तर्क

र् +ग् +अ =र्ग - स्वर्ग

र् + च् +अ =र्च – चर्चा,खुर्ची

र् +ज् +अ =र्ज – अर्ज,दर्ज

र् +ड् +अ = र्ड - कार्ड

र्  +त् +अ =र्त - कीर्तन

र् +प् +अ =र्प – अर्पण,सर्प

र् +ब् +अ =र्ब – निर्बंध ,दुर्बीण

र् +श् +अ = र्श - स्पर्श

र् + व् +अ = र्व – सर्व

(२) ‘र’ या व्यंजनानंतर ‘य् ‘ किंवा ‘ह् ‘ ही व्यंजने येतात आणि जेव्हा ‘र ‘ च्या मागील व्यंजनावर आघात येत नसेल तेव्हा ‘ र’ चे लेखन (=) असे केले जाते.

र् +य् +अ = -य – कै-या,सु-या (सुरीचे अनेकवचन )

र् +ह् +अ =-ह – गु-हार , कु-हाड

(ब) जोडाक्षरात जेव्हा पहिल्या व्यंजनानंतर  किंवा पहिल्या व्यंजनापुढे ‘ र’ हा वर्ण येतो. तेव्हा पहिल्या व्यंजनाचा उच्चार अपूर्ण व ‘र’ चा उच्चार पूर्ण  होतो. उदा. ‘क्रम’ या शब्दात ‘क्र ‘ हे जोडाक्षर आहे.त्यात ‘क् +र् +अ ‘ किंवा ‘क् + र’ अशी त्याची फोड आहे.जोडाक्षरात अशा वेळी ‘र’ च्या अगोदर असणा-या किंवा ‘र’ च्या मागे असणा-या व्यंजनानुसार ‘र’ चे लेखन विविध पद्धतीने होते.

(१) मध्ये दंड असणा-या व्यंजनानंतर ‘र’ हे अक्षर आले तर त्याचे लेखन  (  ` )असे केले जाते.

उदा. क् +र =क्र – तक्रार, क्रियापद,क्रोध

फ् + र =फ्र – फ्रान्स,फ्रेंच

(2)शेवटी दंड असणा-या व्यंजनानंतर ‘ र’हे अक्षर आले तर त्याचे लेखन ( -)असे केले जाते.

उदा.ख् +र = ख्र – ख्रिस्त,ख्रिश्चन

घ् +र = घ्र – व्याघ्र

ज् + र = ज्र –वज्र

त् +र =त्र – पत्र ,छत्री

प् +र = प्र – प्रमाणे

व् +र =व्र – व्रजभूमी

ध् +र = ध्र – ध्रुव

ब् +र =ब्र – ब्रीद,ब्रिटिश

(३) शेवटी स्वतंत्र दंड असणा-या व्यंजनानंतर ‘ र’ हे अक्षर असल्यास त्याचे लेखन (-) असे करतात.

उदा.ग् +र =ग्र –अग्रज ,ग्रंथ

(४)अर्धा दंड असणा-या व्यंजनानंतर ‘र ‘ हे अक्षर आल्यास त्याचे लेखन ‌‌(  / ) किंवा या चिन्हाने होते.

उदा.ट् +र =ट्र – ट्रक, राष्ट्र (ष्ट्र = ष् +ट् +र )

ड् +र =ड्र = ड्रम

द् + र =द्र –द्रुत,  द्रोह

जोडाक्षरलेखन प्रथम स्थानावर ‘र’ हा वर्ण आल्यास (र् +व्यंजन ) किंवा द्वितीय स्थानावर ‘र’ हा वर्ण आल्यास (व्यंजन +र् )होणारे लेखन काळजीपूर्वक करावे.

काही विशेष लेखनपद्धती

१) संस्कृतात ‘ह् ‘ हा वर्णन प्रथम येतो. उदा.ब्रम्हा, प्रल्हाद ,परंतु मराठीत ब्रम्ह ,-हस्व , जिव्हा असे लिहिण्याच्या प्रघात आहे.

२)काही जोडाक्षरे भिन्न रीतीनेही लिहिली जातात.

उदा.क् +त = क्त    तसेच ‘क्त ‘ – उदा.रक्त ,रक्त

क् + र = क्र   तसेच क्रम – उदा.क्रम ,क्रम

श् +र = श्र   तसेच शर   - श्रम ,श्यरम

द् +म = द्म   तसेच द्म – उदा.पद्म पद्म

द् +व = द्व    तसेच द्व – द् वितीया ,द्वितीया

‘ऋ’ आणि ‘ लृ ’ या स्वरांनी होणारी अक्षरे

हे दोन्हीही स्वर आहेत ,हे लक्षात घ्यावे .उदा.ऋषी ,ऋतू , ऋण. हे शब्द ‘ऋ ‘ या स्वरांनी सुरु झाले आहेत.’ ऋ’ या स्वरांनी युक्त असे काही शब्द आहेत.

उदा.गृहपाठ ,नृप , पृथ्वी ,सृष्टी हृदय इ.

येथे ग् +ऋ = गृ – उदा.गृहपाठ

न् + ऋ = नृ – उदा. नृप

प् + ऋ  =पृ – उदा. पृथ्वी

स् + ऋ = सृ – उदा. सृष्टी

ह् + ऋ = सृ – उदा. हृदय

‘लृ ‘ या स्वराने युक्त असा एकच शब्द मराठीत आहे .तो ‘क्लृप्ती ‘ होय.

गृहपाठ, नृप इ. शब्दांत असलेले ‘गृ ‘, ‘नृ’ ही जोडाक्षरे नाहीत .कारण येथे व्यंजन +स्वर = अक्षर (ग् + ऋ =गृ ) अशी रचना आहे. येथे दोन व्यंजने नाहीत म्हणून हे जोडाक्षर नाही.

मराठीतील स्वरांची उच्चारपद्धती

मराठीतील मूलध्वनी  (वर्ण ) व त्यांची उच्चारस्थाने यांचा अभ्यास केला आहे. एका वर्णाला एकच  चिन्ह व  एकच उच्चारस्थान आहे. असे असले तरीही त्याला काही अपवाद आहेत.

मराठीत प्रत्येक वर्णाचा पूर्णोच्चार  होतो. त्याशिवाय त्याचे लांबट व तोकडा (निभृत ) असेही उच्चार होतात.उदा.’गवत ‘या शब्दात तीन ‘अ’ हा पूर्ण उच्चाराचा वर्ण आहे. त्याला ‘ –हस्व उच्चार ‘ असेही म्हणतात ‘व्’ (व् + अ ) मधील ‘अ ‘ हा लांबट उच्चाराचा आहे.पण तो ‘दीर्घ उच्चार’ नव्हे ‘त ‘ मधील (त् +अ ) ‘अ ‘ चा उच्चार तोकडा किंवा निसरडा आहे.अपूर्णोच्चारित असे म्हणतात ; किंवा ‘निभृत ‘ असे म्हणतात .’गवत ‘ या शब्दाचा उच्चार करुन पाहिल्यावर हे लक्षात येईल. ‘सहल ‘ या शब्दाच्या उच्चारातही हा अनुभव येईल .स

(-हस्व उच्चार ) ह (लांबट उच्चार ) ल् (तोकडा किंवा निभृत ).

‘ अ ‘ चे उच्चार

१)मराठी शब्दातील अन्त्य (शेवटचा वर्ण ) ‘अ’ हा निभृत म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो.उदा. कपाट (ट्) ,पान (न् ) ,जवळ (ळ्)

२)अ कारान्ताखेरीज इतर शब्दांतील उपान्त्य अक्षर (शेवटून दुसरे अक्षर ) ‘ अ ‘ युक्त असेल तर ते अपूर्ण उच्चारला जाते.उदा. नकटा (न् कटा),पोचले (च्),बोलणी (ल्)

३)चार अक्षरी  शब्दांतील दुस-या अक्षरातील ‘ अ ‘ हा अपूर्ण उच्चारला जातो.

उदा. करवत (कर् वत ),सरकार (सर् कार ) ,चालवत (चाल् वत ).

४)व,ग, ढ या एकाक्षरी शब्दातील ‘ अ ‘ चा उच्चार लांबट होतो.

उदा. १)राम व सीता    २) त्याला ‘ ग ‘ ची बाधा  झाली. ३)हा मुलगा ‘ढ’ आहे.

इतर स्वरांचे उच्चार

१)प्रत्येक स्वरांचे –हस्व (जलद) व लांबट असे दोन उच्चार आहेत.उदाहरणार्थ,

स्वर                        लांबट   उच्चार               -हस्व उच्चार

अ                             अट                             अडका

आ                            आड                            आमचा

इ                             ईश                             इहलोक

ए                            एक                              एकटा

ऐ                            ऐक                              ऐकून

ओ                           ओठ                             ओठात

औ                           औत                             औषध

२)अकरान्तापूर्वीचे स्वर मराठीत लांबट उच्चारले जातात.उदा.मन ,गात,विष ,मेघ ,म्हैस ,मोर कौल .

३)दीर्घान्तापूर्वीचे स्वर –हस्व उच्चारले जातात.उदा. मुळा ,मासा ,विटी,कुहू ,खेडी ,पैसा ,नौका .

४)संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या (तत्सम ) शब्दांतील  अन्त्य ‘अ’ हा पूर्णोच्चारित असतो. उदा.गुण ,विषय, मंदिर ,सुर ,गृह ,नृप,निर्झर.

५)जोडाक्षर ,अनुस्वार व विसर्ग यानंतरचा ‘अ’ तोडका किंवा निभृत नसातो. उदा. डिंक ,चिंच ,भिंत ,शिस्त ,गुच्छ, शिल्लक ,दुःख निःसंशय

अनुस्वाराचे उच्चार

अनुस्वाराचे किंवा बिंदूचे उच्चार दोन आहेतः १) खणखणीत व २) ओझरता खणखणीत उच्चारास ‘अनुस्वार ‘ असे म्हणतात आणि ओझरत्या उच्चारास ‘अनुनासिक ‘ असे म्हणतात.

१)मराठीत अनुस्वाराचा उच्चार खणखणीत होतो. उदा.घंटा ,तंटा ,आंबा ,चिंच ,गुंड.

२)अनुस्वारः पुढे पहिल्या पाच वर्गांतील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्याच वर्गातील शेवटच्या अनुनासिकासारखा (ड्. ,त्र् ,ण्, न्, म् )म्हणजे पंचमवर्णासारखा होतो.

शंकर (शड्.कर ),चंचल (चत्र्चल ),घंटा (घण्टा) ,भिंत (भिन्त),शिंपला (शिम्पला )

३)अनुस्वारापुढे ‘ य ‘व ‘ल ‘ आल्यास त्याचा उच्चार  अनुनासिक य (यैं) किंवा अनुनासिक ल (लैं) किंवा व (वैं) सारखा होतो.संयम (संय्यम),संलग्न (संल्लग्न किंवा संव्लग्न )

४)अनुस्वारापुढे ‘र’,’व’,’श’, ‘ष’, ‘स’, ‘ह’ ही अक्षरे आल्यास ते अनुनासिक ‘व’ युक्त वँ बनते. उदा. संरक्षण (संvरक्षण ),संवाद (संव्वाद),संशय (संव्शय ),संसार (संव्सार),सिंह (सिंव्ह),संज्ञा (संव्ज्ञा)

विसर्गाचा उच्चार

विसर्गाचा उच्चार त्याच्या मागील स्वरामागोमाग ह्कार युक्त होतो.उदा.दुःख (दुह्ख),अंतःकरण (अंतह्करण)

इतर – जोडाक्षरापूर्वी –हस्व स्वरावर आघात आल्यास तो स्वर दीर्घ उच्चारला जातो. उदा.शिष्य,रस्ता ,मुद्दा,विठ्ठल.परंतु, तसा आघात येत नसल्यास तो –हस्वच  उच्चारला जातो.उदा. व-हाड,उद्या,तुझ्या,पुणे + स = पुण्यास.

आपले उच्चार बिनचूक यावेत यासाठी विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी.आपल्या अध्यापकांकडून ते समजून घ्यावेत.वर्णांचे शुद्ध उच्चार करण्यासाठी ते शिकण्यासाठी अवधानपूर्वक श्रवण,अनुकरण व अध्यापकांकडून ते प्रत्यक्ष समजून घेणे आवश्यक आहे.श्रवणाच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकणे ,थोर व्यक्तींच्या अभिवचनाच्या व भाषणाच्या ध्वनिफिती ऐकणे या गोष्टी सहेतुक केल्या पाहिजेत.

-हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास शब्दांच्या अर्थात फरक पडण्याच्या संभव असतो.अशा काही शब्दांची सूची पुढीलप्रमाणे आहेः

दिन (दिवस),दीन (गरीब)                    सुत (मुलगा), सूत (धागा)

सलिल (पाणी ),सलील (लीलने)            सुर (देव),सूर(आवाज)

शिर (डोके ),शीर (रक्तवाहिनी)             मिलन (भेट), मीलन (मिटणे)





जोडाक्षरांचे लेखन


संधी
आपण बोलत असताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्यांचा एक जोडशब्द तयार होतो . उदाहरणार्थ ,’सूर्य उदय झाला’ असे न म्हणता ‘सूर्योदय ‘झाला असे आपण सहज बोलून जातो.’इति आदी’ न म्हणता आपण ‘इत्यादी ‘ असा शब्द बनवतो.’वाक् मय’ यांच्याऐवजी ‘वाड्.मय’ असा एक शब्द तयार करुन आपण बोलतो. अशा प्रकारचे जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण  तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. ‘संधी’ म्हणजे सांधणे,जोडणे होय. शब्दाची घडण व संधी शब्दाची घडण कशी होते हे आपण पाहिले आहे.’ईश्वर’ या शब्दाची फोड पुढीलप्रमाणे होईल. ई + श् + व् + अ +र् +अ ‘इच्छा’ या शब्दाची फोड पुढीलप्रमाणे होईल. ‘इ + च् + छ् +आ.’ ईश्वर या शब्दाचा शेवटचा वर्ण ‘अ’ आहे. ‘इच्छा’ या शब्दाचा पहिला वर्ण ‘इ’ आहे. ईश्वर + इच्छा असे दोन शब्द शेजारी आल्यावर ईश्वर या शब्दातील शेवटचा  वर्ण ‘अ’ आणि इच्छा या शब्दातील पहिला वर्ण ‘इ’ एकमेकांमध्ये मिसळतात  व जोडशब्द तयार होतो ‘ईश्वरेच्छा ‘. येते अ+ इ = ए असा संधी झाला.सूर्य +अस्त = सूर्यास्त,विद्या  + अर्थी = विद्यार्थी अशी आणखी काही उदाहरणे देता येतील. संधीचे प्रकार स्वरसंधी – एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर ने जोदले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात. स्वर + स्वर असे त्यांचे स्वरुप असते.उदा.कवि + ईश्वर = (इ + ई = ई ) कवीश्वर. व्यंजनसंधी – जवळ जवळ येणा-या या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्यालाव्यंजनसंधी असे म्हणतात. व्यंजन + स्वर असे त्याचे स्वरुप असते. उदा.सत् + जन = (त् + ज्)= सज्जन, चित् +आनंद = (त् + आ )= चिदानंद विसर्गसंधी – एकत्र येणा-या वर्णांतील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास विसर्गसंधी असे म्हणतात. विसर्ग + व्यंजन किंवा विसर्ग + स्वर असे त्याचे स्वरुप असते. उदा. तपः + धन = तपोधन = (विसर्ग + ध् ) दुः + आत्मा = दुरात्मा = (विसर्ग + आ ) स्वरसंधी – आता आपण स्वरासंधींचा अभ्यास करु. १)पुढील शब्दांचे संधी पहा. पोटशब्द                              एकत्र येणारे स्वर व संधी                  जोडशब्द सूर्य + अस्त                          अ + अ = आ                                 सूर्यास्त देव + आलय                       अ + आ = आ                                 देवालय विद्या + अर्थी                      आ + अ = आ                                विद्यार्थी महिला + आश्रम                  आ + आ = आ                                महिलाश्रम मुनि + इच्छा                      इ + इ = ई                                    मुनीच्छा गिरि + ईश                        इ + ई  = ई                                   गिरीश मही + ईश                         ई + ई = ई                                    महीश गुरु +उपदेश                       उ + उ   = ऊ                                 गुरुपदेश भू  + उद्धार                       ऊ  + उ = ऊ                                  भूद्धार निरीक्षण – वरील शब्दांत ,पहिल्या शब्दाचाअ शेवटचा वर्ण –हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर असून दुस-या शब्दांतील पहिला वर्ण –हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर आहे. या दोहोंबद्दल तयार झालेला स्वर हा त्याच प्रकारातील दीर्घ स्वर आहे. यावरुन निघणारा नियम असा – नियम - -हस्व स्वरापुढे किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर –हस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजेच दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ येतो. यालाच सजातीय स्वरसंधी असे म्हणतात. २)आता आपण पुढील शब्दांचे संधी पाहूया – पोटशब्द                         एकत्र येणारे स्वर व संधी                        जोडशब्द ईश्वर + इच्छा                  अ + इ = ए                                        ईश्वरेच्छा गण + ईश                       अ + ई = ए                                        गणेश उमा + ईश                      आ + ई = ए                                        उमेश चंद्र + उदय                     अ + उ = ओ                                       चंद्रोदय महा +उत्सव                   आ + उ = ओ                                       महोत्सव देव + ऋषी                    अ  + ऋ = अर्                                     देवर्षी महा + ऋषी                   आ + ऋ = अर                                     महर्षी निरीक्षण – वरील शब्दांत, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण –हस्व स्वर  किंवा दीर्घ स्वर असून दुस-या शब्दाचा पहिला स्वर हा दुस-या प्रकारच्या स्वरांच्या –हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर आहे. त्यातून,त्या दोहोंबद्दल येणारा स्वर पुढीलप्रमाणे आहे. – अ + इ = ए,अ + ई = ए, आ + ई = ए,अ + उ = ओ ,आ + उ = ओ , अ + ऋ = अर्, आ + ऋ = अर यावरुन  निघणारा नियम असा – नियम – अ किंवा आ यांच्यापुढे इ किंवा ई आल्यास त्या दोहोंऐवजी ‘ए ‘ येतो, अ किंवा आ यांच्यापुढे उ किंवा ऊ आल्यास ‘ओ’ येतो,आणि अ किंवा आ यांच्यापुढे ‘ऋ’ आल्यास त्या दोहोंऐवजी अर् येतो. टीप – याला संस्कृतात गुणसे म्हणतात.तसेच एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे याला आदेश असे म्हणतात.अ किंवा  आ या स्वरांपुढे इ ,उ, ऋ (-हस्व किंवा दीर्घ )आल्यास त्या वर्णांबद्द्ल अनुक्रमे ए ,ओ ,अर् असे वर्ण येणे याल गुणादेश असे म्हणतात. ३)पुढील शब्दांचे संधी पहा. पोटशब्द                  एकत्र येणारे स्वर व संधी               जोडशब्द एक + एक                 अ + ए = ऐ                               एकैक मत + ऐक्य                अ + ऐ = ऐ                               मतैक्य सदा + एव                 आ + ए = ऐ                              सदैव प्रजा + ऐक्य               आ + ऐ = ऐ                              प्रजैक्य जल + ओघ                अ + ओ = औ                             जलौघ गंगा + ओघ               आ + ओ = औ                             गंगौघ वृक्ष + औदार्य             अ + ओ = औ                              वृक्षौदार्य निरीक्षण – वरील शब्दांत अ किंवा आ यांच्यापुढे ए , ऐ असे वर्ण आले असता ऐ हा स्वर तयार झाला आहे ; तर अ किंवा आ या स्वरांपुढे ओ , औ असे स्वर आले असता औ असे स्वर तयार झालेले आहेत.थोडक्यात,अ + ए = ऐ   ,अ + ऐ = ऐ , अ + ओ = औ आ + ए  = ऐ           आ + ऐ = ऐ आ + ओ = औ          अ + औ = औ यावरुन पुढील नियम निघतो. नियम – अ किंवा आ यांच्यापुढे ए किंवा ऐ हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल ऐ येतो आणि अ किंवा आ या स्वरापुढे ओ किंवा औ हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल औ हा स्वर येतो. टीप – याला ‘वृद्ध्यादेश’ (वृद्धि + आदेश )असे म्हणतात. ४)पुढील शब्दांचे संधी पहा. पोटसंधी              एकत्र येणारे स्वर व संधी                जोडशब्द प्रीती + अर्थ          इ + अ= य् + अ = य                    प्रीत्यर्थ इति + आदी         इ + आ = य् +आ  = या                इत्यादी अति + उत्तम        इ + उ = य् + उ = यु                   अत्युत्तम प्रति +एम            इ + ए = य् +ए =ये                     प्रत्येक मनु + अंतर          उ +अ = व् +अ = व                    मन्वंतर सु + अल्प            उ + अ = व् + अ = व                   स्वल्प पितृ +आज्ञा         ऋ + आ = र् + आ = रा               पित्राज्ञा निरीक्षण – वरील शब्दांत इ, उ ,ऋ यांच्यापुढे किंवा त्याच प्रकारच्या दीर्घ स्वरांपुढे अ, उ ,ए  असे विजातीय स्वर आले आहेत व त्या  दोहोंबद्द्ल म्हणजे इ,ई बद्दल ‘य’ हा वर्ण आला व त्यात पुढील स्वर मिसळला,तसेच उ, ऊ बद्दल ‘व’ हा वर्ण आला व त्यात पुढील स्वर मिसळला आणि ऋ बद्दल र् हा वर्ण येऊन त्यात पुढील स्वर मिसळला आहे. थोडक्यात, इ + अ = य् + अ = य इ + आ = य् + आ = या इ + उ = य् + उ = यु इ + ए = य् + ए = ये उ + अ = व् + अ = व ऋ + अ = र् + अ = र यावरुन पुढील नियम निघतो. नियम – इ , उ ,ऋ (-हस्व किंवा दीर्घ )यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास इ – ई  बद्दल ‘य’ हा वर्ण येऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. उ – ऊ बद्दल ‘व’ हा वर्ण येऊन पुढील स्वर त्यात मिसळतो आणि ऋ बद्दल ‘र’ हा वर्ण येऊन त्यात पुढील स्वर मिसळतो व संधी होतो. टीप – इ, उ ,ऋ यांबद्दल अनुक्रमे य् , व् , र् असे आदेश होतात.त्यांना ‘यणादेश ‘ (यण् + आदेश ) असे म्हणतात.य् , व् , र् यांच्याबद्दल अनुक्रमे इ , उ , ऋ आल्यास ‘संप्रसारण ‘ म्हणतात. उदा. येथे – इथे , नव – नऊ , गायी – गाई, सोयी – सोई. पुढील शब्द पहा. पोटशब्द             एकत्र येणारे स्वर व संधी            जोडशब्द ने +अन              ए + अ = अय् + अ =अय            नयन गै + अन             ए + अ = आय् + अ = आय         गायन गो + ईश्वर          ओ + ई = अव् + ई = अवी         गवीश्वर नौ + इक           औ + ई =  आव् + इ = आवि     नाविक नियम - येथे शब्दाच्या अखेरीस ए,ऐ, ओ , औ, हे स्वर आहेत.दुस-या शब्दाच्या प्रारंभीचे स्वर अ, ई हे आहेत.त्याबद्दल ‘अय’, ‘आय’,’अवी’,’आवि’ असे वर्ण येतात.उच्चार आणि संधिनियम यांचा परस्पर संबंध लक्षात घेतला तर, हे किती नैसर्गिक बद्दल आहेत हे लक्षात येईल. थोडक्यात,ए + अ = आय् + अ = अय ऐ + अ = आय् + अ = आय ओ + ई = अव् + ई =अवी औ + इ = आव + इ = आवि याबद्दलचा नियम असा – ए ,ऐ, ओ, औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्यांबद्दल अनुक्रमे ,अय,आय , अवी,आवि असे आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. इ, उ, ऋ (-हस्व किंवा दीर्घ ) यांना होणारे आदेश थोडक्यात पुढील तक्त्यात दिले आहेत. स्वर          दीर्घादेश        गुणादेश        वृद्ध्यादेश          यणादेश अ, आ           -                -                 आ                     - इ, ई              ई               ए                 ऐ                     य् उ , ऊ            ऊ              ओ                औ                    व् ऋ                 -               अर्               आर्                   र

संधी - व्यजनसंधी , विसर्गसंधी

व्यंजनसंधी

आपण मागील पाठात संधी म्हणजे काय याचा अभ्यास केला. आपण बोलताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो.त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्यांचा एक जोडशब्द तयार होतो.वर्णांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास ‘संधी’असे म्हणतात.संधी  होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण  व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहों बद्द्ल एक वर्ण तयार होतो. संधी म्हणजे सांधणे, जोडणे होय.

जवळ जवळ येणा-या दोन वर्णांपैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तेव्हा त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर असे त्याचे स्वरुप असते.

व्यंजनसंधी – आपण व्यंजनसंधी या प्रकाराचा अभ्यास करुया.

१)पुढील शब्दांचे संधी पहा.

पोटशब्द          एकत्र येणारी व्यंजने व संधी               जोडशब्द

विपद् +काल    द् +क् = त् + क् = त्क                      विपत्काल

वाग् +पती       ग्+ प् = क् + प् = क्प                      वाक्पती

वाग् + ताडन    ग् + त् = क् + त् = क्त                      वाक्ताडन

षड् + शास्त्र      ड् + श् = ट् + श् = ट्श                    षट्शास्त्र

क्षुध् + पिपासा   ध् + प् = त् + प् = त्प                     क्षुत्पिपासा

निरीक्षण – वरील शब्दांमध्ये, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा पहिल्या पाच वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय असणारे व्यंजन आहे.दुस-या शब्दातील पहिला वर्ण कठोर व्यंजन आहे.संधी होताना पहिल्या व्यंजनाच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी झाला आहे.

याबाबतचा नियम असा-

नियम – पहिल्या पाच वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो.

याला – प्रथम – व्यंजन – संधी असे म्हणतात.

२)पुढील शब्दांचे संधी पाहा –

पोटशब्द              एकत्र येणारी व्यंजने व संधी               जोडशब्द

वाक् +ईश्वरी        क् + ई = ग् + ई = गी                      वागीश्वरी

वाक्  + विहार      क् + व् = ग् + व् = ग्व                     वाग्विहार

षट् + रिपू            ट् + र् = ड् + र् = ड्र                        षड्रिपू

सत् + आचार        त् + आ = द् +आ = दा                     सदाचार

अच् + आदी          च् +आ = ज् + आ = जा                   आजादी

अप् + ज               प् + ज् = ब् +ज् = ब्ज                     अब्ज

निरीक्षण – वरील शब्दांमध्ये, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण पहिल्या पाच वर्गांतील कठोर वर्ण आहे. त्याच्यापुढे,पुढील शब्दातील पहिला वर्ण अनुनासिकाशिवाय स्वर किंवा मृदू व्यंजन आले आहे. संधी होताना पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी झाला आहे.

याबाबत नियम असा-

नियम – पहिल्या पाच वर्गांतील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो.

याला तृतीय – व्यंजन – संधी असे म्हणतात.

३)पुढील शब्दांचे संधी पाहा-

पोटशब्द              एकत्र येणारी व्यंजने व संधी               जोडशब्द

वाक् + निश्चय       क् + न् = ड्. +न्                            वाड्.निश्चय

षट् +मास            ट् + म् = ण् + म                            षण्मास

जगत् + नाथ         त् + न् = न् + न्                            जगन्नाथ

सत् + मती           त् + म् = न् + म्                            सन्मती

निरीक्षण – वरील शब्दांमध्ये,पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा व्यंजन आहे आणि दुस-या शब्दाचा पहिला वर्ण हा अनुनासिक आहे. संधी होताना पहिले व्यंजन ज्या वर्गातील आहे, त्या वर्गातील अनुनासिक हे त्या व्यंजनाबद्दल येते.

याबाबतचा नियम असा –

नियम – पहिल्या पाच वर्गांतील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो.याला ‘अनुनासिक संधी ‘ असे म्हणतात.

४)पुढील शब्दांतील संधी पाहा –

पोटशब्द              एकत्र येणारी व्यंजने व संधी               जोडशब्द

सत् + चरित्र         त् +च्= च् + च्                              सच्चरित्र

उत् + छेद            त् +छ = च् + छ्                             उ्च्छेद

सत् + जन            त् + ज् = ज् + ज                            सज्जन

तत् + टीका          त् + ट् = ट् + ट्                              तट्टीका

उत् + लंघन          त् + ल् = ल् + ल्                           उल्लंघन

सत् + शिष्य         त् + श् = च् + छ्                            सच्छिष्य

याबाबतचा नियम असा –

त् या व्यंजनापुढे –

१)च् छ् आल्यास त् बद्दल च् होतो.

२)ज् झ् आल्यास त् बद्दल ज् होतो.

३)ट् ठ् आल्यास त् बद्दल ट् होतो

४)ल् आल्यास त् बद्दल ल् होतो.

५)श् आल्यास त् बद्दल च् होतो व श् बद्दल छ् होतो.

५)नियम – ‘म् ‘ पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील ‘ म ‘ मध्ये मिसळून जातो. व्यंजन आल्यास ‘म् ‘बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार किंवा बिंदू येतो.

जसेः सम् + आचार = सदाचार

सम् + गती = संगती

६) नियम – ‘छ् ‘ पूर्वी –हस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये ‘च् ‘ हा वर्ण येतो.

जसेः रत्न + छाया = रत्नच्छाया

शब्द + छल = शब्दच्छल

विसर्गसंधी

आता आपण विसर्गसंधी या संधीच्या प्रकाराचा अभ्यास करुया .

विसर्ग हा स्वतंत्र स्वर नसून तो स्वरादी आहे,हे आपण पाहिले.त्यामुळे कोणत्या तरी स्वरांनतर तो येतो. जसे अ + विसर्ग = अः

विसर्गसंधी मध्ये एकत्र येणा-या वर्णांतील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला विसर्गसंधी असे म्हणतात.

उदा. – मनः + रंजन = मनोरंजन

नः + रं =

न् + अ + विसर्ग + र + अ + अनुस्वार

म्हणजे विसर्ग + र् असे वर्ण येथे एकत्र आले व मनोरंजन असा जोदशब्द तयार झाला.

१)पुढील शब्दांचे संधी पाहाः

पोटशब्द          एकत्र येणारे स्वर , विसर्ग व संधी                जोडशब्द

यशः + धन      श् + अ +विसर्ग + धन = श् + ओ + धन        यशोधन

मनः + रंजन     न् + अ + विसर्ग + रंजन = न् +ओ + रंजन    मनोरंजन

अधः +वदन     ध् + अ+ विसर्ग + वदन = ध् + ओ +वदन     अधोवदन

तेजः+ निधी     ज् + अ +विसर्ग +निधी = ज् + ओ +निधी     तेजोनिधी

निरीक्षण – वरील शब्दांमध्ये , शेवटी विसार्गाच्या मागे ‘अ’ हा स्वर आला आहे. (अ + विसर्ग = अः )दुस-या शब्दातील पहिला वर्ण मृदू व्यंजन आले आहे. त्यामुळे विसर्गाचा ‘उ’ झाला वतो मागील ‘ अ ‘ मध्ये मिसळला.(अ + उ = ओ ) व त्याचा ओ स्वर होऊन तो त्यातील व्यंजनामध्ये मिसळला.उदा. यशः या शब्दातील ‘श + अ + विसर्ग ‘ असा पहिल्या शब्दातील अखेरचा वर्ण आहे. त्यातील ‘श् ‘ मध्ये ओ ( अ + उ = ओ ) मिसळला व ‘शो ‘ असे त्याचे रुप झाले.

जसे यश + उ + धन = यशोधन

मन + उ + रंजन = मनोरंजन

नियम – विसर्गाच्या मागे ‘ अ’ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा ‘ उ ‘ होतो व तो मागील ‘ अ ‘ मध्ये मिसळून त्याचा ‘ ओ ‘ होतो. याला ‘ विसर्ग – उकार – संधी ‘ असे म्हणतात.

२)पुढील शब्दांचे संधी पाहा.

पोटशब्द          एकत्र येणारे स्वर , विसर्ग व संधी                जोडशब्द

निः + अंतर      (न्) + इ + विसर्ग + अं = (नि) रं               = निरंतर

दुः  + जन        (द् ) + उ + विसर्ग + जन = (दु) ज             = दुर्जन

बहिः +अंग       (ह् ) + इ + विसर्ग + अं = (हि ) रं             = बहिरंग

निरीक्षण – वरील शब्दांमध्ये शेवटी विसर्गाच्या मागे अआअ खेरीज कोणत्याही स्वर आला आहे व पुढे मृदू वर्ण आहे. या ठिकाणी विसर्गाचा ‘र ‘ होऊन ते पुढील वर्णात मिसळून संधी झाला आहे.

जसे दुः + जन = दुर्जन,        बहिः + अंग = बहिरंग

याबाबतीत आपल्याला नियम असा सांगता येईल.

नियम – विसर्गाच्या मागे अ, आ, खेरीज कोणत्याही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा ‘ र् ‘ होऊन संधी होतो.

या संधीच्या प्रकाराला ‘विसर्ग – र् – संधी’  असे म्हणतात.

आता पुढील शब्दांचे संधी पाहा.

निः + रस = नि + र् + रस = नीरस,

निः + रव = नि + र् + रव = नीरव

येथे मागील नियमाप्रमाणे विसर्गाचा र् झाला पण अशा ‘ र् ‘ च्या पुढे ‘ र ‘ हा वर्ण आल्यास ‘ र ‘ चा लोप होतो व त्याच्यामागील स्वर –हस्व असल्यास दीर्घ होतो. येथे नि + र् + रस यातील ‘ र् ‘ चा लोप होऊन त्याचा ‘ नि ‘ दीर्घ झाला आहे.

३)पुढील शब्दांचे संधी पाहा –

मनस् + पटल = मनःपटल         तेजस् + कण = तेजःकण

नियम -  पदाच्या शेवटी ‘स’ येऊन त्याच्यापुढे कोणतेही व्यंजन आल्यास ‘स् ‘ चा विसर्ग होतो.

४)पुढील शब्दांचे संधी पाहा –

अंतर् +करण = अंतःकरण           चतुर् + सूत्री = चतुःसूत्री

नियम – पदाच्या शेवटी ‘ र ‘ येऊन त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास ‘ स् ‘ चा विसर्ग होतो.

५)खालील शब्दांचे संधी पाहा .

पुनर् +जन्म = पुनर्जन्म               अंतर् +आत्मा = अंतरात्मा

नियम – विसर्गाच्या ऐवजी येणा-या ‘र् ‘ च्या मागे ‘अ ‘ व पुढे मृदू वर्ण आल्यास तो ‘ र् ‘ तसाच राहून संधी  होतो.

६)पुढील शब्दांचे संधी पाहा.

प्रातः + काल = प्रातःकाल           तेजः +पुंज = तेजःपुंज

इतः  + उत्तर = इतउत्तर             अतः +एव = अतएव

नियम – विसर्गाच्या मागे ‘अ ‘ हा स्वर असून पुढे क् , ख् ,प् , फ् यांपैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो.मात्र पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो.

७)पुढील शब्दांचे संधी पाहा –

निः +कारण = निष्कारण            निः + पाप = निष्पाप

दुः + परिणाम = दुष्परिणाम        दुः + कृत्य = दुष्कृत्य

नियम – विसर्गाच्या मागे इ किंवा उ असून पुढे क् ,ख् ,प् ,फ यांपैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा ष् होतो.

जसे निष्कर्ष, निष्पन्न ,दुष्कीर्ती , आयुष्क्रम ,चतुष्कोण ,बहिष्कृत

(अपवाद – दुः + ख =दुःख , निः + पक्ष = निःपक्ष)

८)पुढील शब्दांचे संधी पाहा –

निः + चल = निश्चल         दुः + चिन्ह = दुश्चिन्ह

मन; + ताप = मनस्ताप      निः + तेज = निस्तेज

नियम – विसर्गाच्या पुढे च् ,छ् आल्यास विसर्गाचा ‘श् ‘ होतो आणि त् ,थ् आल्यास विसर्गाचा ‘ स ‘ होतो.

९) पुढील शब्दांचे संधी पाहा –

दुः + शासन = दुःशासन (दुश्शासन)

निः + संदेह = निःसंदेह (निस्संदेह)

नियम – विसर्गाच्या पुढे श्,स् आल्यास विसर्ग विकल्पाने कायम राहतो; किंवा लोप पावतो.जसे – चतुःशृंगी , पुरःसर,प्रातःसमय , अंतस्थ.

मराठीचे विशेष संधी

वाक्यात येणा-या शब्दाशब्दांत संधी करण्याकडे संस्कृत भाषेची प्रवृत्ती अधिक आहे.मराठीचा कल संधी करण्याकडे नाही. मराठीत संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेले (म्हणजे तत्सम )शब्द बरेच आहेत. ते एकत्र आले की त्यांचा संधी होतो.संस्कृतातल्याप्रमाणे वाक्यांतर्गत संधी मराठीत करत नाहीत. उदा.हराच्या आईने उत्तमला एक आंबा दिला. या वाक्यात अनेक स्वर एकमेकांपुढे आलेले असूनही त्यांचा संधी झाल्याचे आढळत नाही. मात्र

१)मराठीत केव्हा दोन स्वर एकापुढे एक आले असता त्यांतील पहिला स्वर ( = पूर्व स्वर) न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो.

उदा. – काही + असा = काहीसा,       केले + असे = केलेसे

खिडकी + आत = खिडकीत ,    नदी + आत = नदीत

किती + एक = कितीक ,          लाडू + आत = लाडूत

अशा प्रकारच्या संधीला पूर्वरुप संधी असे म्हणतात.

२)केव्हा केव्हा मराठी शब्दांचा संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा स्वर लोप पावतो व दुसरा स्वर (= पर स्वर ) कायम राहून संधी होतो.याला पररुप संधी असे म्हणतात.

उदा.घर + ई = घरी,                       न + उमजे = नुमजे,

घाम + ओळे = घामोळे              कर + उन = करुन

एक + एक = एकेक,                  सांग + एन = सांगेन

३)दीर्घ स्वरापुढे येणा-या स्वराचा मागील स्वराशी बहुतकरुन संधी होत नाही.

उदा.जा+ ऊन = जाऊन,     घे + ईल = घेईल,       हो + ऊ = होऊ

४)’ही’ या शब्दयोगी अव्ययाचा संख्याविशेषणाशी दोन प्रकारांनी संधी होतो.

अ)’ह’ चा लोप न होता जसे – दोन + ही = दोन्ही (तिन्ही, चा-ही)

ब)’ ह ‘ चा लोप होऊन ज्से – दोन +ही = दोनी , (तिनी , चारी )

५)अनुरुप, अनुसार यांसारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्यरुप होऊन मग पूर्वरुप संधी होतो.

जसे – गरज + अनुरूप = गरजेनुरुप, पद्धती + मनुसार = पद्धतीनुसार

६)शब्दांचा उच्चार करताना गडबडीमुळे काही वर्ण एकमेकांत मिसळतात.यातूनच संधीचा जन्म होतो.संधी हे मुख्यतः तत्सम शब्दांच्या बाबतीत होतात.तरीही बोलण्याच्या ओघात मराठीत काही शब्द एकमेकांत मिसळून नवीन रुपे तयार होतात.

जसे – येतो + आहे = येतोहे,येतोय

गेली+ आहे = गेलीहे, गेलीय

बसला + आहात = बसलाहात = बसलात,

मी + होऊन तुझ्याकडे आलो + आहे = मी हून तुझ्याकडे आलोय एका अर्थाने हे मराठीतील संधीच आहेत. बोली भाषेत ते प्रामुख्याने पाहायला मिळतात.

पुढे काही संधीची  उदाहरणे दिलेली आहेत; त्यांचा अभ्यास करा.

ज्ञान + ईश्वर = ज्ञानेश्वर

अन्य + उक्ती = अन्योक्ती

सूर्य  + उदय = सूर्योदय

चंद्र + अस्त  = चंद्रास्त

मनुष्य + इतर = मनुष्येतर

अल्प + आहार = अल्पोहार

सह + अनुभूती = सहानुभूती

परि + ईक्षा  = परीक्षा

प्रश्न + उत्तर = प्रश्नोत्तर

दीर्घ + उत्तरी = दीर्घोत्तरी

लघु + उत्तरी = लघूत्तरी

वन + औषधी = वनौषधी

पर + उपकार = परोपकार

प्रति + अंतर = प्रत्यंतर

हर  + एक = हरेक

चिंता + आतुर = चिंतातुर

प्रति + अक्ष = प्रत्यक्ष

नील + आकाश = नीलाकाश

धारा + उष्ण = धारोष्ण

लंका + अधिपती = लंकाधिपती

अयोध्या + ईश = अयोध्येश

गुरु + आज्ञा = गुर्वाज्ञा

जगत् + ईश्वर = जगदीश्वर

वि + आसंग = व्यासंग

जगत् + जीवन = जगज्जीवन

भगवत् + भक्ती = भगवद्भक्ती

भगवत् + गीता = भगवद्गीता

भगवत् + नाम = भगवन्नाम

भाषा + अंतर = भाषांतर

हेतु + आभास = हेत्वाभास

मत् + माता = मन्माता

सम् + आलोचन = समालोचन

दिक् + अंतर = दिगंतर

पुनः + आगमन = पुनरागमन

यथा + इष्ट = यथेष्ट

आयुः + वेद = आयुर्वेद

निः + इच्छ = निरिच्छ

धनुः + वात = धनुर्वात

अंतः + गत = अंतर्गत

उत् + ज्ज्वल = उज्ज्वल

सत् + मती = सन्मती

गण + ईश + उत्सव = गणेशोत्सव

सत् + चित् + आनंद = सच्चिदानंद



संधी


शब्दविचार
शब्द आणि पद आता आपण शब्दांचा अभ्यास करुया. तोंडावाटे  निघणा-या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. हे ध्वनी आपण कागदावर लिहून दाखविताना विशिष्ट चिन्हे दाखवितो , वापरतो. हे ध्वनींच्या चिन्हांना आपण अक्षरे असे म्हणतो. ब, द, क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना अर्थ प्राप्त झाला आहे,म्हणून ‘बदक ‘  हा शब्द तयार झाला. एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो.’ बदक पाण्यात पोहते. ‘ हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पद व शब्द यांत थोडा फरक आहे. ‘ पाणी’ हा शब्द आहे. ‘पाण्यात ‘ हे पद आहे.वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरुपात बदल करुन त्या शब्दाचे जे रुप तयार होते, त्यास पद असे म्हणतात, पण व्याकरणात पदांना देखील स्थूलमानाने ‘ शब्द’ असे म्हटले जाते.’स्वातीने’ हे पद आहे. यात मूळ शब्द ‘स्वाती ‘ आहे.मूळ शब्दाला व्याकरणात  ‘ प्रकृती ‘ असे म्हणतात. ‘ने’ हा प्रत्यय लागून ‘स्वातीने’ हे जे रुप झाले त्याला ‘विकृती’ असे म्हणतात. विकृती म्हणजे शब्दाच्या मूळ रुपाचे बदललेले रुप .यालाच ‘पद’ असे म्हणतात. वाक्य हे शब्दांचे किंवा पदांचे बनलेले असते. या शब्दाची वाक्यात कोणकोणती कामे असतात, यांचा आपण अभ्यास करु या. शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार.वाक्यात वर उल्लेख केल्यासारखे जे शब्द येतात त्यांची  कार्ये विविध प्रकारची असतात. त्या शब्दांच्या वाक्यातील कार्यावरुन त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहेत. १)वाक्यात येणा-या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात.त्यांना ‘नामे’ असे म्हणतात.उदा.फूल,हरी,गोडी २)जे शब्द सर्व प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात.त्यांना ‘सर्वनामे’ असे म्हणतात.उदा.मी,तू , हा , जो ,कोण ३)जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र  मर्यादित करतात. त्यांना ‘ विशेषणे ‘असे म्हणतात.उदा.कडू ,गोड , दहा त्याचा ४)जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना ‘ क्रियापदे ‘ असे म्हणतात. उदा. बसतो, जाईल , आहे ५)जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना ‘ क्रियाविशेषणे ‘ असे म्हणतात. उदा. आज , काल , तेथे , फार ६)जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवितात त्यांना ‘ शब्दयोगी ‘ म्हणतात. उदा. झाडाखाली , तिच्याकरिता ,त्यासाठी. ७)जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात.त्यांना ‘ उभयान्वयी ‘ असे म्हणतात.उदा. व, आणि , परंतु , म्हणून. ८)जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना ‘ केवलप्रयोगी ‘ असे म्हणतात. उदा. शाब्बास , अबब ,अरेरे. वाक्यात येणा-या शब्दांचे असे आठ प्रकार आहेत. त्यांनाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात .शब्दांच्या आठ जाती म्हणजे शब्दांची आठ कार्ये , नाम , सर्वनाम,विशेषण ,क्रियापद , क्रियाविशेषण ,शब्दयोगी ,उभयान्वयी व केवलप्रयोगी ही दिलेली नावे वाक्यातील त्या त्या  शब्दाच्या कार्यांना अनुलक्षून दिलेली असतात. एक शब्द निरनिराळ्या वाक्यांत निरनिराळी कार्ये करताना आढळतो. जसे, १)दशरथाने कैकयीला दोन वर दिले. (नाम ) २)तू त्या राजपुत्राला वर. (क्रियापद ) ३)पक्षी झाडावर बसतो. (शब्दयोगी ) ४)वरपिता मुलाच्या लग्नात तो-यात वावरत होता. (विशेषण ) वरील वाक्यात ‘ वर ‘ हा एकच शब्द विविध कार्ये करतो म्हणून त्या शब्दाला नाम, क्रियापद , शब्दयोगी ,विशेषण अशी नावे दिलेली आहेत. क्रिकेटच्या खेळात तुम्ही पाहता ना? एकच खेळाडू क्रीडांगणावर वेगवेगळी कामे करताना आढळतो.केव्हा तो ‘ फलंदाज ‘ असतो तर केव्हा तो ‘गोलंदाज ‘ असतो. केव्हा तो ‘क्षेत्ररक्षकांचे ‘ काम करताना दिसतो; क्वचित तोच ‘यष्टिरक्षक ‘ ही होतो.ही जी नावे आपण खेळाडूला देतो ती त्याच्या क्रीडांगणावरील वेगवेगळ्या वेळच्या कार्याला उद्देशून असतात.त्याचप्रमाणे व्याकरणातील ही आठ नावे शब्दांच्या त्या त्या वाक्यांतील कार्यांना उद्देशून असतात. वाक्य हे शब्दांनी बनलेले असते हे खरे. पण, वाक्यात हे जे शब्द येतात ते त्यांच्या मूळ स्वरुअपात जसेच्या तसे ठेवले जात नाहीत.वाक्य होण्यासाठी त्यांच्या रुपात केव्हा – केव्हा आपण बदल करतो. असा बदल सर्वच शब्दांच्या रुपात होत नाहीत.काही शब्दांच्या रुपात बदल होतो तर काही शब्द मुळी बदलतच नाहीत. शब्दांच्या रुपात बदल होतो केव्हा? तर शब्दांचे लिंग किंवा वचन बदलते तेव्हा किंवा विभक्तीचे प्रत्यय  लागतात तेव्हा शब्दांच्या कोणत्या जातीत असा बदल होतो ते आपण पाहू.
शब्दाची जात पुल्लिंग स्त्रीलिंग अनेकचन विभक्ती
नाम
सर्वनाम

विशेषण

क्रियापद

मुलगा
तो

चांगला

गाते

मुलगी
ती

चांगली

गाते

मुलगे
ते

चांगले

गातात

मुलांना
त्यांना

चांगल्यांना

गाण्याने

नाम, सर्वनाम ,विशेषण व क्रियापद या चार शब्दांच्या जातीत लिंग , वचन व विभक्ती यांच्यामुळे बदल होतो ; पण पुढील शब्द पाहा.

१)आता, उदईक , येथे इकडे (क्रियाविशेषणे )

२)मागे ,पुढे ,करिता , साठी (शब्दयोगी )

३)आणि , अथवा ,परंतु ,म्हणून (उभयान्वयी )

४)अरेरे ,शाब्बास , अबब ,अओहो (केवलप्रयोगी )

शब्दांच्या या चार जातींत लिंग , वचन किंवा विभक्ती यांमुळे बदल होत नाही. बदल होणे याला व्याकरणात ‘ विकार ‘ असे म्हणतात.शब्दांच्या आठ जातींपैकी  नाम, सर्वनाम , विशेषण व क्रियापद ही चार ‘ विकारी ‘ आहेत म्हणजे बदलणारी आहेत.क्रियाविशेषण ,शब्दयोगी ,उभयान्वयी व केवलप्रयोगी ही चार ‘ अविकारी ‘ आहेत. म्हणजे त्यांच्या रुपात बदल होत नाही.विकारी व अविकारी यांना अनुक्रमे ‘ सव्यय ‘ व ‘ अव्यय ‘असे म्हणतात. (व्यय = खर्च ,बदल )

शब्दांच्या जाती पुढीलप्रमाणे आहेतः

शब्द

विकारी (सव्यय )                                    अविकारी (अव्यय)

नाम                                                    क्रियाविशेषण

सर्वनाम                                                शब्दयोगी

विशेषण                                               उभयान्वयी

क्रियापद                                              केवलप्रयोगी





शब्दविचार


नामे
नाम म्हणजे काय ते आपण पाहिले.ही नामे वाक्यात वापरताना त्यांच्या रुपात केव्हा केव्हा बदल होतो. जसे – १)मुलगा पुस्तक वाचतो. २)मुलगे खेळ खेळतात. ३)मुलगी गाणे गाते. ४)मुलांना खाऊ आवडतो. वरील वाक्यांत ‘मुलगा’ या शब्दाची ‘मुलगी,मुलगे,मुलांना’ अशी रुपे झालेली आहेत.नामांच्या रुपात हा जो बदल होतो किंवा विकार होतो त्यास‘विकरण’ असे म्हणतात.हा बदल केव्हा व कसा होतो ते आपण पाहू.’मुलगा’ याचे ‘मुलगी’ असे जे रुप बदलेले ते त्याचे ‘लिंग’ बदलल्यामुळे,’मुलगे’ असे जे रुप झाले ते वचन बदलल्यामुळे, व ‘मुलांना’ अस्से जे रुप झाले ते विभक्ती बदलल्यामुळे. लिंग,वचन व विभक्ती यांमुळे नामाच्या रुपात बदल होतो.त्यांना ’नामांचे विकरण’ असे म्हणतात.यांचा आपण क्रमाने विचार करु. लिंग नाम म्हणजे प्रत्यक्ष किंवा काल्पनिक अशा कोणत्याही वस्तूला दिलेले नाव होय.वस्तूंमध्ये आपण १)सजीव व २)निर्जीव असे दोन भाग करतो. सजीवांमध्ये १)मनुष्यप्राण्यांत व २)मनुष्येतर (पशू,पक्षी,कृमी,कीटक वगैरे) असे भाग पडतात.मनुष्यप्राण्यांत काही पुरुष असतात तर काही स्त्रिया असतात.इतर प्राण्यांमध्ये आपण हा फरक आपण ‘ नर’ व ‘मादी’ अशा शब्दांनी करतो.प्राणीमात्रांत पुरुष – स्त्री, नर – मादी असा भेद आपण करतो तो त्यांच्या लिंगावरुन.लिंग याचा अर्थ ‘खूण’ किंवा ‘चिन्ह’ असा आहे.प्राणिवाचक नामांतील पुरुष किंवा नरजातीचा बोध करुन देणा-या  शब्दाला पुरुषलिंगी,पुलिंगी किंवा पुल्लिंगी असे म्हणतात. जसे – चुलता ,शिक्षक,घोडा,चिमणा,मुंगळा इ. स्त्री  किंवा मादी जातीचा बोध करुन देणा-या शब्दांना स्त्रीलिंगी असे म्हणतात.जसे- चुलती,शिक्षिका,घोडी,चिमणी, मुंगी इ.निर्जीव वस्तुवाचक शब्दांवरुन पुरुष किंवा स्त्री यांपैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही.जसे- पुस्तक,दगड,शहर,शाई,कागद वगैरे. अशा शब्दांना खरे तर नपुंसकलिंगी असे म्हणावयास पाहिजे.पण मराठी भाषेच्या व्यवहारात प्रत्यक्ष तसे होत नाही.यांतील ‘दगड,कागद’ गे पुल्लिंगी,’दौत, शाई’ हे शब्द आपण स्त्रीलिंगी मानतो. प्राणिमात्रांचे लिंग हे वास्तविक असे असते तर निर्जीव वस्तूंचे लिंग हे ‘काल्पनिक’ असते. नामाच्या रुपावरुन एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे, की स्त्री जातीची आहे ,की दोम्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरुन कळते त्याला त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात. मराठीत लिंगे तीन मानतातः १) पुल्लिंग,२)स्त्रीलिंग व ३)नपुंसकलिंग काही निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करुन आपण केव्हा -  केव्हा बोलतो.जसे -  १)सूर्य ढगाआड लपला.२)सागर एकदम खवळला.३)वनश्री हसू लागली.४)झरे नृत्य करीत होते.अशा वाक्यांत निर्जीव वस्तूंवरही आपण काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्रीत्व लादून आपण बोलत असतो.केव्हा  केव्हा आकार,शक्ती कठोरपणा,राकटपणा,यांसारखे पुरुष प्राण्यांचे सर्वसामान्य गुणधर्म ज्या वस्तूंत आपणास आढळतात.त्यांना आपण पुल्लिंगी मानतो.लहान आकार,कोमलपणा,देखणेपणा,सौम्यपणा,चांचल्य यांसारखे स्त्रीप्राण्यांत आढळून येणारे सामान्य गुणधर्म ज्या वस्तूंत आढळतात त्यांना स्त्रीलिंगी  असे आपण मानतो.उदाहरणार्थ,लोटा  = पुल्लिंगी तर लोटी स्त्रीलिंगी,वारा पुल्लिंगी तर झुळूक स्त्रीलिंगी,वृक्ष पुल्लिंगी तर वेल स्त्रीलिंगी.सूर्य,सागर,मृत्यु हे पुल्लिंगी तर वनश्री,वीज हे शब्द आपण स्त्रीलिंगी मानतो.पण हा नियम संपूर्णपणे पाळला जात नाही. त्याला अपवाद पुष्कळ आढळतात.दोरा हा दोरीपेक्षा आकाराने लहान असूनही तो पुल्लिंगी व नदी स्त्रीलिंगी. मराठीत एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगांत आढळतात. जसे १)रुमाल (पु.),पगडी (स्त्री.),तर पागोटे (नपु.) २)ग्रंथ(पु.), पोथी (स्त्री.),तर पुस्तक (नपु.),३)देह (पु. ),काया (स्त्री )तर शरीर (नपु) संस्कृत,इंग्रजी यांसारख्या भाषांतून घेतलेल्या काही शब्दांचे लिंग बदललेले दिसते जसे –
शब्द संस्कृत मराठी शब्द इंग्रजी मराठी
स्वप्न पु. नपुं. नदी पु.
खड्ग पु. नपुं. देश स्त्री पु.
अश्रू नपुं. पु. चंद्र स्त्री पु.
मित्र नपुं. पु. निसर्ग स्त्री पु.
मराठीतील लिंगव्यवस्था ही अत्यंत अनियमित व धरसोडीची आहे.त्याप्रमाणे काही विशिष्ट तत्त्व असे दिसत नाही.एखादा नियम सांगावा तर त्यालाअपवादच जास्त.

मग मराठीतील लिंग ओळखण्याची पद्धत कोणती ? प्राणिमात्रांतील पुरुष किंवा नर याचा उल्लेख आपण ‘तो’ या शब्दाने करतो व स्त्री किंवा मादी याचा उल्लेख आपण ‘ती’ या शब्दाने करतो.जसे – तो – बाप,ती – आई,तो – घोडा,ती- घोडी,तो – पोपट,ती- मैना,सजीव प्राण्यांतील एखादा नर आहे किंवा मादी आहे हे निश्चित सांगता येत नसेल तर त्याला नपुंसकलिंगी मानून त्याचा उल्लेख ‘ते’ या शब्दाने करतो.जसे – ते कुत्रे,ते – वासरु, ते – पाखरु.

निर्जीव वस्तूंच्या बाबतीत काही काल्पनिक पुरुषत्व व स्त्रीत्व लादून त्या वस्तूच्या मागे तो – ती – ते हे शब्द वापरुन आपण लिंग ठरवतो उदा.

पुल्लिंग              स्त्रीलिंग                   नपुंसकलिंग

तो वाडा            ती इमारत                ते घर

तो भात          ती भाकरी                  ते वरण

तो टाक           ती लेखणी                  ते पेन

तो दिवा          ती पणती                   ते तेज

वरील पद्धत मराठी भाषा जाणणा-यांना ठीक आहे ; पण अ- मराठी भाषिकांना मराठी शब्दांचे लिंग ओळखणे कठीण जाते.अमक्या शब्दामध्ये ‘तो ‘ का लावायचा ?’ती’ का नाही ? याचे उत्तर देणे व निश्चित नियम सांगणे कठीण आहे. पुल्लिंगी शब्दाच्या मागे ‘ तो ‘ लावायचा व ‘तो’ लागतो म्हणून त्या शब्दाला पुल्लिंगी म्हणावयाचे हा मोठा विचित्र प्रकार होय.मराठीत अमका शब्द पुल्लिंगी का व अमका शब्द स्त्रीलिंगी का,हे सांगूणे कठीण आहे.केवळ रुढी किंवा परंपरा हेच त्याचे उत्तर.मराठी भाषा ही ऐकून व बोलण्यात तिचा वारंवार वापर करुन तिच्यातील लिंगव्यवस्था समजून घेता येते.केवळ नियमाने ती ठरविता येत नाही.

लिंगभेदामुळे नामांच्या रुपात होणारा बदल

१)पुढील उदाहरण पाहाः

पु.           स्त्री.            नपुं.        पु.           स्त्री.            नपुं.

मुलगा      मुलगी         मुलगे      कुत्रा         कुत्री           कुत्रे

पोरगा      पोरगी         पोरगे      घोडा       घोडी          घोडी

यावरुन असे दिसते की, ‘ आ ‘ कारान्त    पुल्लिंगी प्राणिवाचक नामांचे स्त्रीलिंग रुप ‘ ई ‘ कारान्त होते व त्याचे नपुंसकलिंगी रुप ‘ ए ‘ कारान्त होते.

२) पुढील उदाहरण पाहाः

सुतार    सुतारीण    माळी   माळीण     वाघ       वाघीण

कुंभार     कुंभारीण    पाटील  पाटलीण    तेली      तेलीण

यावरुन असे दिसते की,काही प्राणिवाचक पुल्लिंगी शब्दांस ‘ईण’ प्रत्यय लागून त्यांची स्त्रीलिंगी रुपे  होतात.

३)पुढील शब्दांची रुपे पाहाः

हंस     हंसी      वानर      वानरी      गोप    गोपी

दास    दासी     बेडूक      बेडकी       तरुण   तरुणी

यावरुन असे दिसते की, काही प्राणिवाचक ‘ अ ‘ कारान्त पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ‘ ई ‘कारान्त होतात.

४)काही ‘ आ ‘ कारान्त पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ‘ ई ‘ प्रत्यय लागून त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रुपे बनतात उदा.

लोटा         लोटी       खडा            खडी             भाकरा           भाकरी

गाडा       दासी        दांडा            दांडी           आरसा                 आरशी

५)संस्कतातून  मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रुपे ई – प्रत्यय लागून होतात.

राजा    राज्ञी      श्रीमान     श्रीमती        भगवान         भगवती

युवा     युवती      विद्वान     विदुषी         ग्रंथकर्ता        ग्रंथकर्ता

६)काही शब्दांची स्त्रीलिंगी रुपे  स्वतंत्र रुपे स्वतंत्र रीतीने होतात.जसे –

बाप           आई          नवरा            बायको             बोकड         शेळी

वर            वधू           मुलगा            सून                  रेडा           म्हैस

राजा          राणी         दीर              जाऊ                 मोर         लांडोर

पती          पत्नी           पुत्र              कन्या                 बैल          गाय

भाऊ         बहीण         सासू             सासरा               बोका        भाटी

पिता         माता          पुरुष            स्त्री                    खोंड        कालवड

७)मराठीतील   काही  शब्द निरनिराळ्या लिंगांतही   आढळतात. उदा.

बाग (पु.स्त्री.)                 ढेकर(पु.स्त्री.)         पोर (पु.स्त्री.न.पुं.)

वेळ (पु.स्त्री.)                  हरिण (पु.न.पुं.)     संधी (पु.स्त्री.)

वीणा (पु.स्त्री.)               तंबाखू (पु.स्त्री.)      मूल (पु.स्त्री.न.पुं.)

मजा (पु.स्त्री.)                व्याधी (पु.स्त्री.)      नेत्र (पु.न.पुं.)

८)परभाषेतून  आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरुन सामान्यतः ठरवितात.उदा.

बूट (जोडा )पु.          पेन्सिल (लेखणी ) स्त्री.          क्लास (वर्ग ) पु.

बुक (पुस्तक) नपुं.      कंपनी (मंडळी )स्त्री.             ट्रंक (पेटी) स्त्री.

९) सामासिक   शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते.उदा.

साखरभात (पु.)          मीठभाकरी (स्त्री.)       गायरान (नपुं.)

भाजीपाला (पु.)          भाऊबहीण (स्त्री.)      देवघर (नपुं.)

१०)गरुड,टोळ ,पोपट ,मासा,साप,सुरवंट  हे शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख पुल्लिंगीच करतात.तर ऊ, घार ,घूस,जळू,पिसू,मैना,सुसर हे शब्द पुल्लिंगी असूनही त्यांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगीच करतात.





Answer


विभक्ती विचार
नामाच्या रुपामध्ये बदल होतो,त्याची दोन कारणे आपण पाहिली.१)लिंगभेदामुळे नामाच्या रुपात बदल होतो व २)वचनभेदामुळे नामाच्या रुपात बदल होतो.त्याचप्रमाणे ३)०विभक्तीमुळेही नामाच्या रुपात बदल होतो; त्याचा आपण अभ्यास करु. विभक्ती प्रत्येक वाक्य हे एखाद्या कुटुंबासारखे आहे.कुटुंबात आई,वडील,भाऊ,बहीण,पती,पत्नी,मुलगा अशा विविध नात्यांची काही माणसे एकत्र येतात.कुटुंबात एक व्यक्ती प्रमुख असते. या प्रमुख व्यक्तीशी त्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष असे नाते असते. हीच गोष्ट वाक्यातही पाहावयास मिळते.वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांस्शी काही ना काही संबंध असतो.या संबंधाला व्याकरणात कारक असे म्हणतात. वाक्यात जे शब्द येतात ते त्यांच्या मूळ स्वरुपात जसेच्या तसे सामान्यतः येत नाहीत.वाक्यात वापरताना त्यांच्या स्वरुपात जसेच्या तसे सामान्यतः येत नाहीत.वाक्यात वापरताना त्यांच्या स्वरुपात बदल करावा लागतो.उदाहरणार्थ – ‘शेजारी,मधू,रस्ता,कुत्रा,काठी,मार’ असे शब्द एकापुढे एक ठेवल्याने काहीच बोध होत नाही.या शब्दसमूहाल वाक्य म्हणता येत नाही. ते वाक्य होण्यासाठी ‘शेजारच्या मधूने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले.’अशास्वरुपात शब्दरचना करायला हवी. वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरुपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात ‘ विभक्ती ‘ असे म्हणतात. विभक्तीची व्याख्याः नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाक्खविले जातात त्या विकारांना ‘ विभक्ती ‘ असे म्हणतात. प्रत्यय आणि सामान्यरुप नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रुप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्यांस ‘ प्रत्यय ‘ असे म्हणतात.वरील वाक्यात ‘च्या,ने, त,ला’ हे विभक्तीचे प्रत्यय होत. हे विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरुपात जो बदल होतो त्याला ‘ सामान्यरुप ‘ असे म्हणतात. ‘रस्त्या’ व ‘कुत्र्या’ही रस्ता व कुत्रा या नामांची सामान्य रुपे होत व ‘रस्त्यात’, ‘कुत्र्याला’ ही विभक्तीची रुपे होत. पुढील तक्त्यात मूळ शब्दात कसा बदल होतो,तसेच सामान्यरुप व विभक्तीचे प्रत्यय दिसून येतील; विभक्तीची रुपे मूळ शब्द सामान्यरुप विभक्तीचे प्रत्यय भावाला रामाला शाळेतून उंदराशी भाऊ राम शाळा उंदीर भावा रामा शाळे उंदरा ला ला तून शी विभक्तीचे प्रकार प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते.यात क्रियापद हा प्रमुख शब्द होय.ही क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असातो.त्याला ‘ कर्ता ‘ असे म्हणतात ही क्रिया कोणावर किंवा केव्हा घडली?कोणी केली ? कशाने केली? कोणासाठी केली?कोठून घडली? कोठे किंवा केव्हा घडली? हे सांगणारे शब्द वाक्यात असतात.नामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध अशा आठ प्रकारचा असतो; म्हणून विभक्तीचे एकंदर आठ प्रकार मानले जातात.ते असे, १)प्रथमा, २)द्वितीया , ३)तृतीया, ४) चतुर्थी, ५ ) पंचमी, ६)षष्ठी, ७)सप्तमी , ८)संबोधन.यांतील पहिल्या सातांना संस्कृतातील नावे दिली आहेत.आठव्या संबंधाच्या वेळी हाक मारली जाते म्हणून त्याला ‘ अष्ट्मी ‘ असे न म्हणता ‘संबोधन ‘असे नाव आहे. (संबोधन = हाक मारणे,बोलावणे) या विभक्तींचे प्रत्यय कोणते व त्यामुळे नामाच्या स्वरुपात कोणते बदल होतातथे पुढील तक्त्यावरुन दिसून येईल. विभक्तीचे प्रत्यय व ‘ फूल ‘ या नामाची होणारी रुपे विभक्ती एकवचन अनेकवचन प्रत्यय शब्दांची रुपे प्रत्यय शब्दांची रुपे प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन - स, ला,ते ने, ए ,शी स,ला,ते ऊन, हून चा ,ची ,चे त,ई,आ - - फूल फुलास,फुलाला फुलाने,फुलाशी फुलास,फुलाला फुलाहून फुलाचा फुलात फुला - स,ला,ना,ते नी , शी, ई, ही स,ला,ना, ते ऊन , हून चा,ची,चे त,ई,आ नो फुले फुलांस,फुलांना फुलांनी, फुलांशी फुलांस ,फुलांना फुलांहून फुलांचा – ची – चे फुलांत फुलांनो १)वरील काही प्रत्ययांचा उपयोग केवळ पद्यात होतो. २)वरीलप्रमाणे सर्व नामांतही प्रत्यय लागून रुपे तयार करता येतात. ३)नामांची किंवा सर्वनामांची विभक्ती प्रत्ययावरुन ओळखतात.



विभक्ती विचार


सामान्यरूप
विभक्ती,प्रत्यय, सामान्यरुप पुढील वाक्ये वाचा. १)शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. २)घराजवळच विटांचा कारखाना आहे. ३)मासे तळ्यामध्ये राहतात. ४)त्याने अभ्यास केला. अधोरेखित शब्दाचे मूळ रुप,सामान्यरुप व त्याला लागलेला विभक्तीचा प्रत्यय पुढीलप्रमाणे दाखविता येईल.
प्रत्यययुक्त शब्द मूळ शब्द सामान्यरुपे विभक्तीचे प्रत्यय
शिक्षकांनी
मुलांना

घराजवळ

विटांचा

तळ्यामध्ये

त्याने

शिक्षक
मूल

घर

वीट

तळे

तो

शिक्षकां
मुलां

घरा

विटां

तळ्या

त्या

नी
ना

जवळ

(शब्दयोगी अव्यय)

चा

मध्ये

(शब्दयोगी अव्यय)

ने

वाक्यात जे शब्द येतात त्यांतील विशेषतः नामे व सर्वनामे ही जशीच्या तशी त्यांच्या मूळ स्वरुपात येत नाहीत.वाक्यात वापरताना त्यांच्या रुपात केव्हा – केव्हा बदल करावा लागतो.वरील वाक्यांमध्ये ‘शिक्षक’ -  ‘शिक्षकांना’, ‘मूल’ – ‘मुलां- ना’, ‘तळ्या – त’ असे बदल झालेले दिसतात.

‘शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली’,या वाक्यात ‘शिक्षक,गोविंद, वर्ग’ ही नामे जशीच्या तशी वाक्यात न ठेवता ‘शिक्षकां- नी’, ‘गोविंदा- ला’,’वर्गा – त ‘असा त्यांच्या रुपात बदल केला आहे.

नामांच्या किंवा सर्वनामाच्या रुपात हा जो बदल किंवा विकार होतो त्याला विभक्ती असे म्हणतात. ‘शिक्षकांनी’, ‘गोविंदाला’, ‘ वर्गात’, ‘तळ्यात’ ही विभक्तींची रुपे आहेत ही रुपे तयार करताना ‘नी’,’ला’, ‘त’ ही अक्षरे जोडली आहेत.अशा अक्षरांना विभक्तीचे प्रत्यय असे म्हणतात.हे प्रत्यय लागताना त्यांच्या मूळ रुपात बदल होतो.’गोविंद’ या शब्दाचे ‘गोविंदा’, ‘वर्ग’ या शब्दाचे ‘वर्गा’, असे जे रुप होते त्याला ‘सामान्यरुप’से म्हणतात. हा बदल शब्दाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो.जसे – बाळ – बाळाला,घोडा – घोड्याचा, तळे – तळ्यात,पाणी- पाण्यात,फडके – फडक्यांचा.

या विकाराला ‘सामान्यरुप’ असे म्हणण्याचे कारण असे की, विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रुप सर्व विभक्तीत सारखेच म्हणजे सर्वसामान्य असते.

जसे,तळे = तळ्यास, तळ्या- शी,तळ्याचा,तळ्यात.

मूळ शब्दातील अन्त्य स्वर –हस्व असला तर सामान्यरुपाच्या वेळी तो दीर्घ होतो.

जसे,कवि – कवीस, कवीने,गुरु – गुरुचा.

अनेकवचनी शब्दाच्या सामान्यरुपावर नेहमी अनुस्वार येतो.जसे,मुलांना,पशूंत, घोड्यांना,शहरांतून.

विभक्तीप्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दाचे सामान्यरुप होते,तसेच शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीही सामान्यरुप होते.जसे ,घर – घराजवळ,तळे – तळ्यामध्ये,घोडा – घोड्यासाठी,शाळा – शाळेविषयी,घर - घरापुढे

सामान्यरुपांच्या अभ्यासाचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे.मातृभाषा मराठी असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या संभाषणात येणा-या शब्दांतील सामान्यरुपांचे निरीक्षण केले पाहिजे.अमराठी भाषक  विद्यार्थ्यांनी संभाषणात भाग घेऊन बिनचूकपणे शब्दांचा उपयोग करुन सराव केला पाहिजे.पुस्तकवाचनातून डोळसपणाने शब्दांची सामान्यरुपे पाहिली पाहिजेत.सामान्यरुपांचा अभ्यास सुलभ व्हावा,त्यात बिनचूकपणा व शास्त्रीयता यावी यासाठी ‘मराठी शब्दलेखनकोश’ – प्रा.यास्मिन शेख (मनोविकास प्रकाशन) या कोशाचा उपयोग करावा.

सामान्यरुपाचे विविध प्रकार

नामाच्या लिंगाप्रमाणे व त्याच्या शेवटी असणा-या स्वराप्रमाणे सामान्यरुप निरनिराळ्या प्रकारी होते. ही सामान्यरुपे कशी होतात.याबाबतचे काही नियम पुढे दिले आहेत.

१)पुल्लिंगी नामांचे  सामान्यरुप

१)खांब – खांबास, निर्णय – निर्णयास,काळ – काळाने,वर्ग – वर्गात अकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरुप आ- कारान्त होते.

२)घोडा – घोड्याला,कोयता – कोयत्याने,दोरा – दो-याचा आ- कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरुप या – कारान्त होते.(अपवाद – आजोबा,दादा,काका,मामा,नाना,चहा,राजा)

३)धोबी – धोब्याला,तेली – तेल्याने,माळी – माळ्याचा ई – कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरुप या – कारान्त होते.

४)कवी – कवीला,गुरु – गुरुला,साधु – साधूचा,नीती – नीतीला इ – कारान्त व उ – कारान्त तत्सम शब्द आता दीर्घान्त लिहावयाचे असल्यामुळे त्यांचे सामान्यरुप दीर्घान्तच राहाते.

५)भाऊ – भावांनी,विंचू – विंचवांनी,नातू – नातवांचा ऊ – कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरुप वा – कारान्त होते. (अपवाद – पेरु,चाकू,खडू,शत्रू, खेळाडू,पशू)

६)फडके – फडक्यांचा गोखले – गोखल्यांचा,पोरे – पो-यांनी ए – कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरुप या – कारान्त होते.

७)किलो – किलोस,धनको – धनकोचा,बिटको – बिटकोने ओ – कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरुप ओ – कारान्तच राहाते.

२)स्त्रीलिंगी नामांचे सामान्यरुप

१) अ)वीट- विटेचा ,विटांचा, जीभ – जिभेला,जिभांनी अ – कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरुप एकवचनात आ- कारान्त होते.

ब)भिंत – भिंतीला,विहीर- विहिरीत काही अ – कारान्त स्त्रालिंगी नामांची सामान्यरुपे ई – कारान्त होतात.

२)शाळा – शाळेत,भाषा – भाषेचा,माता – मातेला,विद्या – विद्येने आ- कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरुप ए – कारान्त होते.

३)भक्ती – भक्तीने,नदी – नदीचा,नद्यांचा,बी – बियांचा,पेटी – पेटीत,दासी – दासीला,दासींचा,स्त्री – स्त्रियांना ई – कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरुप एकवचनात ई – कारान्त व अनेकवचनात ई – कारान्त किंवा या – कारान्त होते.

४)काकू – काकूला, वधू- वधूचा,सासू – सासूला,सासवांना ऊ – कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरुप होत नाही.क्वचित ते वा – कारान्त होते.

५)बायको – बायकोला,बायकांना

ओ – कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरुप एकवचनात होत नाही वनेकवचनात आ- कारान्त होते.

३)नपुंसलिंगी नामांचे सामान्यरुप

१)मूल – मुलाने,पान – पानाचा, दुकान – दुकानात,फूल – फूलात,अ – कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरुप आ- कारान्त होते.अशा वेळी उपान्त्य अक्षर (शेवटून दुसरे अक्षर) दीर्घ असल्यास –हस्व होते.

२)पाणी – पाण्यात, मोती – मोत्याचा,लोणी – लोण्याचा ई – कारान्त नपुं.लिंगी नामाचे सामान्यरुप या – कारान्त होते.

३)अ)लिंबू – लिंबाचे,कोकरु – कोकराचे,लेकरु – लेकराला ऊ – कारान्त नपुं – लिंगी नामाचे सामान्यरुप आ- कारान्त होते.

ब)कुंकू – कुंकवाचा,गळू – गळवाचा,आसू – आसवाने काही ऊ – कारान्त नपुं.लिंगी नामांचे सामान्यरुप वा – कारान्तहोते.

४)तळे – तळ्यात, केळे- केळ्यांची,खोके – खोक्यात,नाणे – नाण्यात ए – कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरुप या – कारान्त होते.

काही महत्त्वाचे

सामान्यरुपात दन्ततालव्याचा शुद्धदन्ततालव्य व स- काराचा श- कार होतो.जसे – चोच – चोचीने,ससा – सशाला,राजा – राजाने

शुद्धतालव्य,य आणि श तसेच राहतात.’श’ या तालव्यात ‘ य ‘ या तालव्याची भर घालत नाहीत. जसे – बाजा – बाजाने,पाया – पायात,माशी – माशीचा

वचनविकारात च – वर्ग (च,छ, ज ,झ ) स,श यास ‘य’ च्या बाराखडीतील अक्षाअर जोडण्याचा प्रसंग आल्यास तो य – रहित जोडावा.जसे – टाच – टाचांना,सोय – सोईने,जोशी – जोशांना

सामान्यरुप केव्हा होत  नाही?

१)एकाक्षरी शब्दाचे सामान्यरुप होत नाही.

जसे – ‘श ‘ ला सुटा काना असतो.’अ’ ने ‘ब’ ला मारले.

२)परकीय भाषेतील शब्दांचे सामान्यरुप केव्हा केव्हा होत नाही.

जसे – ‘शेक्सपीअर’ ची नाटके अद्यापही लोकांना आवडतात.

राजेसाहेबांनी ‘ गव्हर्नर’ ला मेजवानी दिली.

३)ग्राम किंवा देशवाचक विशेषनामांचे केव्हा -  केव्हा सामान्यरुप होत नाही.

जसे – पंधारा ऑगस्टला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले.

मी बनारसला शिक्षणासाठी गेलो.

ही वस्तू मी इंग्लंडहून आणली.

पण चतुर्थीचा ‘स’ आणि सप्तमीचा ‘त’ प्रत्यय लागताना सामान्यरुप होते.जसे – नागपूर – नागपुरास हिंदुस्थान – हिंदुस्थानात,पंजाब – पंजाबात.

विशेषणांचे सामान्यरुप

१)अ- कारान्त,ई – कारान्त व ऊ – कारान्त विशेषणांचे सामान्यरुप होत नाही.

जसे – जगात गरीब माणसांना कोणी विचारीत नाही.

त्याचे लोकरी कपड्यांचे दुकान आहे.

मला कडू कारल्याची भाजी आवडते.

२)विभक्तिप्रत्यय लागलेल्या नामांच्या आ- कारान्त विशेषणांचे सामान्यरुप या – कारान्त होते.जसे – भल्या माणसाने,ह्या मुलाचा,वेड्या मुलीने,ख-या गोष्टीस वरील उदाहरणातील विशेषण व विशेषणाचे सामान्यरुप पुढील  तक्त्त्यात दाखविले आहे.

विशेषण नाम विशेषणाचे सामान्यरुप विभक्तिप्रत्यययुक्त नाम
भला माणूस भल्या माणसाने
हा मुलगा ह्या मुलाचा
वेडी मुलगी वेड्या मुलीने
खेडी गोष्ट ख-या गोष्टीस




सामान्यरूप


सर्वनामे
पुढील परिच्छेद वाचा. पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले.पंतप्रधान विमानातून उत्साहाने खाली उतरले.पंतप्रधानांनी सर्वांना हसून अभिवादन केले.जवळच लहान मुले उभी होती.पंतप्रधान लहान मुलांकडे गेले.पंतप्रधानांना एका मुलाने गुलाबाचे फूल दिले. पंतप्रधानांना आनंद झाला. वरील परिच्छेदात थोडा बदल करुन तो पुन्हा लिहूया.आता वाचा. पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले. ते विमानातून उत्साहाने खाली उतराले.त्यांनी सर्वांना हसून अभिवादन केले.जवळच लहान मुले होती.ते लहान मुलांकडे गेले एका लहान मुलाने त्यांना गुलाबाचे फूल दिले. त्यांना आनंद झाला. वरील दोन्ही परिच्छेदांचे वाचन केल्यावर लक्षात येईल की, प्रारंभी ‘पंतप्रधान’ या नामाचा उल्लेख केल्यावर पहिल्या परिच्छेदात त्याच नामाचा उल्लेख पुनःपुन्हा अयोग्य वाटतो.दुस-या परिच्छेदात,प्रारंभी ‘पंतप्रधान’ या नामाचा उल्लेख योग्य वाटतो.नामाचा पुनःपुन्हा येणारा उल्लेख कानाला खटकतो.दुस-या परिच्छेदात नामाचा पुनरुच्चार टाळाण्यासाठी ‘ते’,’त्यांना’असा उल्लेख आला आहे. अशा नामाऐवजी येणा-या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. नाम वाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरे वाटत नाही.नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्याऐवजी ‘मी,तू,तो, हा, जो ,आपण ,कोण ,काय’ यांसारखे शब्द आपण वापरतो.या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो.ते ज्या नामांबद्द्ल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो.वाक्यात  एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वानाम करते.’तो’ हा शब्द रामा,वाडा,कळाप, थवा आळस अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्द्ल वापरता येतो.अशा शब्दाचा उपयोग सर्व (प्रकारच्या )नामांसाठी होतो,म्हणून त्यास सर्वनाम असे म्हणतात. नामांचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणा-या विकारी शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात. सर्वनामांचे प्रकार सर्वनामांचे पुढीलप्रमाणे एकंदर सहा प्रकार मानतातः- १)पुरुषवाचक सर्वनाम,२) दर्शक सर्वनाम,३)संबंधी सर्वनाम ,४)प्रश्नार्थक सर्वनाम,५)सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम व ६)आत्मवाचक सर्वनाम १) पुरुषवाचक सर्वनामः- बोलणा-याच्या किंवा लिहिणा-या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतातः१)बोलणा-यांचा २) ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा व ३)ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा व वस्तूंचा.व्याकरणात यांना ‘पुरुष’असे म्हणतात.या तीनही वर्गांतील नामांबद्द्ल येणा-या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. १)बोलाणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथमपुरुषवाचक सर्वनामे.उदा.मी,आम्ही,आपण स्वतः २)ज्याच्याशी बोलावयाचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे.उदा.तू तुम्ही,आपण स्वतः ३)ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीयपुरुषवाचक सर्वनामे.उदा.तो,ती,ते ,त्या. २)दर्शक सर्वनामेः- जवळची किंवा दूरचीवस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास ‘दर्शक सर्वनाम’ असे म्हणतात.उदा.हा, ही,हे,तो,ती,ते. ३)संबंधी सर्वनामेः- वाक्यात पुढे येणा-या दर्शक सार्वनामाशी संबंध दाखविणा-या सर्वनामांना ‘संबंधी सर्वनामे’ असे म्हणतात.उदा. जो – जी – जे, जे ज्या. ४)प्रश्नार्थक सार्वनामेः- ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो.त्यांना ‘प्रश्नार्थक सर्वनामे’म्हणतात.उदा. कोण ,काय , कोणास,कोणाला,कोणी इ. ५)सामान्य  सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामेः- कोण ,काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही,तेव्हा त्यांना ‘अनिश्चित सर्वनामे’असे म्हणतात. उदा.१)कोणी कोणास हसू नये. २)त्या पेटीत काय आहे ते सांगा.या सर्वनामांना कोणी ‘सामान्य सर्वनामे’ असे म्हणतात. ६)आत्मवाचक सार्वनामे पुढील वाक्ये पाहा.- १)मी स्वतः त्याला पाहिले.                           २)तू स्वतः मोटार हाकशील का? ३)तो आपण होऊन माझ्याकडे आला.              ४)तुम्ही स्वतःला काय समजता? आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वतः’ असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते.यालाच कोणी ‘स्वतःवाचक सर्वनाम’ असेही म्हणतात. आपण व स्वतः – पुरुषवाचक सर्वनाम व आत्मवाचक सर्वनाम यांतील फरक आपण व स्वतः ही दोन्ही सर्वनामे पुरुषवाचकही असतात.तेव्हा या दोहोंमध्ये फरक इतकाच की,पुरुषवाचक ‘आपण’ हे केवळ अनेकवचनात येते.आत्मवाचक ‘आपण’ हे दोन्ही वचनात येते.पुरुषवाचक ‘आपण ‘ हे ‘आम्ही’ व ‘तुम्ही’ या अर्थाने येते, तेव्हा ते पुरुषवाचक असाअते व ‘स्वतः’ या अर्थाने येते तेव्हा ते आत्मवाचक असते. सर्वनामांचा लिंगविचार मराठीत मूळ सर्वनामे नऊ आहेत.ती पुढीलप्रमाणेः मी,तू,तो, हा ,जो,कोण, काय, आपण ,स्वतः यांतील लिंगानुसार बदलणारी तीनचः १) तो, २) हा, ३) जो. जसे  तो - ती – ते,  हा – ही – हे,  जो – जी – जे. याशिवाय इतर सर्व सर्वनामांची तीनही लिंगातील रुपे सारखीच राहतात; ती बदलत नाहीत, सर्वनामांचा वचनविचार मराठीतील मूळ नऊ सर्वनामांपैकी ‘मी ,तू, तो, हा ,जो’ ही पाच सर्वनामे वचनभेदाप्रमाणे बदलतात.जसे मी – आम्ही,तू – तुम्ही; तो ,ती,ते – ते ,त्या ,ती ; हा,ही ,हे – हे ,ह्या, ही; जो,जी ,जे – जे ,ज्या,जी; बाकीच्या सर्वनामांची (कोण,काय,आपण, स्वतः) रुपे दोन्ही वचनांत सारखीच राहतात. सर्वनामाचे लिंग व वचन ते ज्या नामाकरिता आले असेल त्यावर अवलंबून असते. सर्वनामांचा विभक्तिविचार सर्वनामे ही नामांच्याऐवजी येत असल्यामुळे नामांना जे विभक्तीचे प्रत्यय लागतात तेच बहुधा सर्वनामांना लागतात.नामाप्रमाणेच सर्वनामाची विभक्तिरुपे अनियमित होतात.नमुन्यादाखल ‘तू’ या सर्वनामाची सर्व विभक्तिरुपे पुढील तक्त्त्यात दिली आहेत.सर्वनामांची संबोधन विभक्ती नसते; कारण सर्वनामे ही प्राणी किंवा वस्तू नसल्यामुळे त्यांची हाक मारण्यासाठी योजना होत नाही. ‘तू’ या सर्वनामाची विभक्तीची रुपे
विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा
द्वितीया

तृतीया

चतुर्थी

पंचमी

षष्ठी

सप्तमी

तू
तुला,तुजला,तूते

तू,त्वा,तुशी,तुजशी

तुला,तुजला,तूते

तुजहून

तुझा,तुझी,तुझे

तूत,तुझ्यात*

तुम्ही
तुम्हांस,तुम्हांला,तुम्हांते

तुम्ही,तुम्हांशी

तुम्हांस,तुम्हांला,तुम्हांते

तुम्हांहून

तुमचा,तुमची,तुमचे

तुम्हांत,तुमच्यात़ *

*मूळ शब्द व प्रत्यय यांच्यामध्ये आणखी एक अक्षर येऊन तुझ्याने,तुमच्यांशी,तुझ्याहून,तुमच्याहून,तुझ्यात,तुमच्यात अशी जी रुपे होतात,्त्यांस ‘विकरण’ असे म्हणतात. ही शुद्ध विभक्तीची रुपे नसून यांना ‘सविकरणी विभक्ती’ असे म्हणतात.

सर्वनामांचे उपयोग

विविध सर्वनामांचा सामान्यतः कसा उपयोग होतो,ते पुढील तक्त्त्यात

सर्वनाम          उपयोग                         उदाहरण

मी                 बोलणारा स्वतः              मी शाळेतून आलो.

एकट्याबद्दल बोलताना

आम्ही          १)स्वतःबरोबर इतरांच्या    आम्ही उद्या सहलीला जाऊ.

वतीने बोलताना

सर्वनाम          उपयोग                               उदाहरण

२)स्वतःचा मोठेपणा               १)काल आमच्या मुलीचे लग्न झाले.

दाखविण्यासाठी एखादी

व्यक्ती,तसेच संपादक,             २)जनतेला जागृत करणे हे आमचे कर्तव्य आहे,

राजा, वरिष्ठ अधिकारी,

हे स्वतःबद्दल ‘आम्ही’             ३)आम्ही हा किताब तुम्हांस देतो.

वापरतात.

तू                  १)एका व्यक्तीशी बोलताना      तू आता  घरी जा.

२) प्रेमाने,भक्तीने,सलगीने       १)आई,तू कुठे गेली

बोलताना                            होतीस.

३)देवा,तू मला क्षमा कर.

तुम्ही              १)अनेकांशी बोलताना            १)तुम्ही आता सर्वजण घरी जा

२)एखाद्या व्यक्तीबद्दल             २)गुरुजी, तुम्ही उद्या आमचाकडे या.

आदर दाखवताना –

तो – ती – ते     ज्याच्याबद्दल बोलायचे            तो उद्या शाळेत येणार नाही.

त्याचा उल्लेख करताना

जो – जी – जे    वाक्यात पुढे येणा-या              १)जो चढतो तोच पडतो.

‘तो’ या सर्वनामाशी                २)जे चकाकते ते सोने नव्हे.

संबंध दाखविताना

हा – हा – हे    पुढे असलेली वा                       ही माझी टोपी आहे.

जवळची वस्तू

दाखवावयाची असल्यास

सर्वनाम             उपयोग                                उदाहरण

कोण              प्रश्नार्थक कोण (प्राणिवाचक)      १)कोण बोलतो तिकडे?

प्रश्नार्थक काय (वस्तुवाचक)           २)तुला काय हवे?

सामान्य (अनिश्चित)                    ३)कोणी यावे कोणी जावे.

आश्चर्यकारक उद्गार.                    ४)कोण ही गर्दी.

आपण         १)पुरुषवाचक या अर्थी                  १)आपण आमच्याकडे उद्या याल का?

२)स्वतःबद्दल मोठेपणा घेताना        २)आपण हे कबूल करणार नाही

३)आत्मवाचक स्वतः या अर्थी         ३)तो आपणहून माझ्याकडे आला.

सर्वनामांचे काही विशेष

१)सर्वसाधारपणे नामाचा वापर अगोदर होतो, तेव्हाच व त्यानंतर सर्वनामाचा वापर होतो.

२)सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग,वचन अशी ओळख  नसते,सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रुप ते ज्या नामाच्या जागी येते त्यावरुन निश्चित होते.

३)लिंगानुसार बदलणारी सर्वनामे – ‘हा, तो ,जो ‘ आहेत. इतर सर्वनामांची तिन्ही लिंगांतील रुपे सारखीच असतात.

४)प्रश्नार्थक सर्वनाम व सामान्य सर्वनाम (अनिश्चित सर्वनाम) यांतील फरक ‘कोण’ ,’काय’ ही सर्वनामे वरील दोन्ही प्रकारात आहेत. वाक्यातील उपयोगानुसार त्याचा प्रकार लक्षात येतो.

अ)प्रश्नार्थक सर्वनाम – कोण ,काय

पुढील वाक्ये वाचा.

१)कोण रे तू?           २)तुला काय हवे?

पहिल्या वाक्यात अनोळखी व्यक्तीबद्दल ‘कोण ‘ हे सर्वनाम आले आहे. तसेच, दुस-या वाक्यात जे हवे आहे त्या वस्तूबद्दल ‘काय ‘ हे सर्वनाम आले आहे.दोन्ही ठिकाणी माहिती विचारण्यासाठी हे प्रश्न आहेत. म्हणून ती प्रश्नार्थक  सर्वनामे आहेत.

आ)सामान्य सर्वनाम (अनिअश्चित सर्वनाम ) – कोण,काय.

पुढील वाक्ये वाचा.

१)तिकडे कोण आहे,ते मला माहीत नाही.

२)त्या दुकानात काय वाटेल ते मिळते.

३)गुणेश म्हणजे सर्वज्ञ.त्याला काय माहीत नसते!

पहिल्या वाक्यात ‘तिकडे जो कोणी आहे ‘ त्याच्याबद्दल ‘ कोण ‘ हे सर्वनाम आले आहे. ते वाक्यात प्रश्नार्थक नाही. या वाक्यातील ‘कोण’ हे सर्वनाम कोणत्या नामाबद्दल आले आहे,हे निश्चित सांगता येत नाही.

दुस-या वाक्यात ‘दुकानात जे काही मिळते’ त्याच्याबद्दल ‘काय ‘ हे सर्वनाम आले आहे.हे वाक्य प्रश्नार्थक नाही.असेच तिस-या वाक्याबद्दलही म्हणता येईल.

‘कोण ‘,’काय’ या सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी न करता सामान्यपणे केलेला आहे ;आणि ती सर्वनामे कोणत्या नामांबद्दल येतात ते निश्चितपणे सांगता येत नाही म्हणून त्या सर्वनामांना सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात.

५)आत्मवाचक सर्वनामेः आपण ,स्वतः

पुढील वाक्ये पाहाः

१)मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखविली.

२)नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे.

पहिल्या वाक्यात ‘मी’ या सर्वनामाबरोबर ‘आपणहून’ हे सर्वनाम आले आहे.दुस-या वाक्यात ‘नागरिकाने’ या नामानंतर ‘आपणाला’ हे सर्वनाम आले आहे.येथे ‘स्वतःहून’, ‘स्वतःला’ ही सर्वनामांची रुपे बिनचूकपणे वापरणे शक्य होते.अशा वाक्यात येणा-या ‘आपण’ व ‘स्वतः’ या सर्वनामांनाआत्मवाचक सर्वनामे म्हणतात.

स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीशिवाय सहसा वापरले जात नाही. (अपवादः ‘स्वतःमेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’.)आपण हे सर्वनाम आत्मवाचक म्हणून वापरले तर तेदेखील नामाच्या किंवा सर्वनामाच्या आधाराने येते.

६)’आपण’ या आत्मवाचक सर्वनामाचा पुरुषवाचक सर्वनाम म्हणूनही उपयोग केला जातो आणि ते तीनही पुरुषांत व दोन्ही वचनांत चालते.

उदाहरणासाठी काही वाक्ये –

१)तुझ्या सांगण्यावरुन आपण त्याच्याशी भांडणार नाही.

-  आपण = मी. प्रथमपुरुष,एकवचन

२)आम्ही ठरवले आहे की,आपण सहलीला जाऊ.

- आपण = आम्ही.प्रथमपुरुष,अनेकवचन

३)शिक्षक विद्यार्थिनीला उपरोधाने म्हणाले,”आपण रडणे थांबवून बोलाल का?”

- आपण = तू.द्वितीय पुरुष,एकवचन

४)मी देवळात गेलो तेव्हा आपण इकडे घरी आलात का?

- आपण = तुम्ही.द्वितीय पुरुष,अनेकवचन.

५)सुरेशने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही.

- आपण = तो. तृतीय पुरुष,अनेकवचन.

६)नेत्यांनी कामगारांना बाहेर थांबविले आणि आपण चर्चेसाठी मालकांकडे गेले.

- आपण = ते – नेते.तृतीय पुरुष,अनेकवचन.

थोडक्यात – सर्वनामांचे  प्रकार व सर्वनामे

१)पुरुषवाचक सर्वनामेः मी, आम्ही, तू, तुम्ही , तो , ती, ते , ते , त्या ,ती

२)दर्शक सर्वनामेः हा , ही , हे ;हे,ह्या , ही; तो ,ती, ते ; ते, त्या, ती

३)संबंधी सर्वनामेः जो , जी , जे ; जे ज्या, जी

४)प्रश्नार्थक सर्वनामेःकोण , काय

५)सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामेः कोण, काय

६)आत्मवाचक सर्वनामेः आपण ,स्वतः





सर्वनामे


विशेषणे
पुढील शब्दसमूह पाहा. चांगली मुले,      काळा कुत्रा,       हिरवे रान, पाच टोप्या,      त्याची पिशवी,    खूप लोक वरील शब्दसमूहांत ‘चांगली,काळा,हिरवे, पाच,त्याची,खूप’ हे शब्द त्यांच्यापुढे येणा-या नामांविषयी विशेष माहिती सांगतात. ही विशेष माहिती सांगणारे शब्द त्या नामांची विशेषणे आहेत. विशेषण – नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणा-या शब्दास ‘ विशेषण ‘ असे म्हणतात. विशेषणाचे वैशिष्ट्य हे की, ते नामाबद्दल अधिक माहिती सांगते व नामाची व्याप्ती मर्यादित करते व अते साधारणपणे नामापूर्वी येते.उदा.’ टोपी ’ हे नाम आहे. आपल्याला ‘ टोप्यां ‘ विषयी बोलावयाचे आहे.त्या टोप्यांची संख्या ‘ पाच ‘ असे सांगून आपण संख्या सांगितली व ‘पाच ‘ टोप्यांविषयी माहिती सांगून आपण ती मर्यादित केली. ‘लोकरीच्या काळ्या पाच टोप्या आम्ही बाजारातून आणल्या.’ या वाक्यात ज्या टोप्यांविषयी आपल्याला बोलावयाचे आहे ते अधिक मर्यादित केले ; म्हणजे अधिक निश्चित केले असे म्हटले तरी चालेल. विशेषण आणि विशेष्य ज्या नामांबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात.वरील शब्दसमूहातील विशेषण – विशेष्य संबंध पुढीलप्रमाणे तक्त्त्यात मांडता येतील. विशेषण         विशेष्य                            विशेषण             विशेष्य चांगली          मुले                                  पाच                  टोप्या काळा            कुत्रा                                त्याची               पिशवी हिरवे            रान                                  खूप                  लोक विशेषणांचे प्रकार विशेषणांचे मुख्य प्रकार तीन आहेतः- १)गुणविशेष, २)संख्याविशेषण व ३) सार्वनामिक विशेषण त्या शिवायही विशेषणांचे पुढील तीन प्रकार आहेतः- १)नामसाधित विशेषण २)धातुसाधित विशेषण व ३) अव्ययसाधित विशेषण १)गुणविशेष – ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास गुणविशेष असे म्हणतात.जसेःमोठी मुले, आंबट बोरे,शुभ्र ससा, शूर सरदार, रेखीव चित्र, निळासावळा झरा २)संख्याविशेषण – ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्याविशेषण असे म्हणतात. संख्याविशेषणाचे पुढील पोटप्रकार आहेतः १)गणनावाचक संख्याविशेषण  २)क्रमवाचक संख्याविशेषण   ३)आवृत्तिवाचक संख्याविशेषण ४)पृथकत्ववाचक संख्याविशेषण ५)अनिश्चित संख्याविशेषण १)गणनावाचक संख्याविशेषण पुढील शब्द पाहाः दहा मुली,चौदा भाषा, साठ रुपये, सहस्त्र किरणे,अर्धा तास, दोघे मुलगे वरील शब्दांतील दहा, चौदा,साठ, सहस्त्र , अर्धा,दोघे या विशेषणांना उपयोग केवळ गणती किंवा गणना करण्याकडे होतो. त्यांस गणनावाचक संख्याविशेषणे म्हणतात. गणनावाचक विशेषणे दोन प्रकारांनी लिहितात. १)अक्षरांनी व २) अंकांनी गणनावाचक संख्याविशेषणाचे तीन उपप्रकार मानतात. अ)पूर्णांक वाचक – (एक, दोन…….शंभर)१,२, १०० ब)अपूर्णांक वाचक – (पाव – १/४, अर्धा – १/२, पाऊण – ३/४, तीन पंचमाश – ३/५) क)साकल्या वाचक – (तितक्या वस्तूंपैकी सर्व) – दोन्ही भाऊ, पाची पांडव, चा-ही बहिणी २)क्रमवाचक संख्याविशेषण पुढील शब्द पाहा पहिला वर्ग,चौथा बंगला, आठवी इयत्ता, साठावे वर्ष वरील शब्दांतील ‘पहिला, चौथा, आठवी , साठावे’ ही विशेषणे वस्तूंचा क्रम  दाखवितात. अशा विशेषणांना ‘क्रमवाचक संख्या विशेषणे’ असे म्हणतात. प्रथमा द्वितीया……सप्तमी ही संस्कृतातील क्रमवाचक संख्याविशेषणे मराठीतही वापरतात. ३)आवृत्तिवाचक संख्याविशेषणे पुढील शब्द पाहा चौपट मुले, दसपट रुपये,दुहेरी रंग,द्विगुणित आनंद वरील शब्दांतील ‘चौपट, दसापट,दुहेरी,द्विगुणित’ ही विशेषणे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवितात.त्यांना ‘ आवृत्तिवाचक संख्याविशेषणे ‘ असे म्हणतात. ४)पृथकत्वावाचक संख्याविशेषण पुढील शब्द पाहा एकेक मुलगा,दहा दहांचा गट यांतील ‘ एकेक, दहादहा ‘ ही विशेषणे वेगवेगळा( किंवा पृथक) असा बोध करुन देतात.अशा विशेषणांना ‘पृथकत्वावाचक संख्याविशेषणे ‘असे म्हणतात. ५)अनिश्चित संख्याविशेषण सर्व रस्ते,थोडी मुले, काही पक्षी, इतर लोक,इत्यादी देश वरील शब्दांतील ‘सर्व ,थोडी, काही, इतर, इत्यादी ‘ ही संख्याविशेषणे निश्चित अशी संख्या दाखवीत नाहीत. म्हणून त्यांना ‘ अनिश्चित संख्याविशेषणे ‘ असे म्हणतात. अन्य,अल्प, एकंदर ३. सार्वनामिक विशेषण – पुढील शब्द पाहा हा मनुष्य,   तो पक्षी,     माझे पुस्तक   तिच्या साड्या,    असल्या झोपड्या,      कोणता गाव वरील शब्दांतील ‘हा, तो, मी , असा, कोण ही मूळची सर्वनामे आहेत. सर्वनाम हे नामाऐवजी येत असते. पण वरील शब्दांत सर्वनामांच्यापुढे नामे आली आहेत. ती आता सर्वनामे राहिली नसून ती त्यांच्यापुढे आलेल्या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणजे ती विशेषणांचे कार्य करतात.सर्वनामांपासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषणे किंवा सर्वनामसाधित विशेषणे असे म्हणतात. मी, तू, तो , हा , जो, कोण , काय ही सर्वनामे  अशावेळी नेहमीच त्यांच्या मूल रुपात न येता त्यांच्या रुपात पुढीलप्रमाणे बदल होतो. मी – माझा,     तू – तुझा ,     तो – त्याचा , आम्ही – आमचा,    तुम्ही – तुमचा,   ती – तिचा हा – असा,असला, इतका, एवढा, अमका तो – तसा ,  तसला, तितका , तेवढा, तमका जो – जसा, जसला, जितका, जेवढा कोण – कोणता, केवढा काय – कसा, कसला नामे, सर्वनामे, धातुसाधिते व अव्ययसाधिते यांचा विशेषणांसारखा उपयोग १)नामसाधित विशेषणे पुढील वाक्ये पाहा. १)माझ्या भावाचे कापड – दुकान आहे. २)मी आज साखर – काकडी खाल्ली. ३)त्याचा मित्र पुस्तक – विक्रेता होता. ४)रामाला फळ – भाजी फार आवडते. वरील वाक्यांतील ‘कापड ,साखर, पुस्तक, फळ’ ही मूळची नामे आहेत. पण वरील वाक्यांत ती त्यांच्यापुढे आलेल्या नामांबद्दल अधिक माहिती सांगतात ; म्हणजे ती विशेषणांची कार्ये करतात.अशा प्रकारचे विशेषणे व विशेष्य मिळून सामासिक शब्द तयार होतो. सातारी पेढे,बनारसी बोरे, अशा शब्दांत ‘सातारी,’ ‘बनारसी’ ही अनुक्रमे सातारा, बनारस या नामांपासून साधलेली विशेषणे आहेत. नामांपासून तयार केलेल्या विशेषणांना नामसाधित विशेषण असे म्हणतात . २)सार्वनामिक विशेषणे याचे विवेचन यापूर्वी आपण पाहिले आहे. ३)धातूसाधित विशेषणे पुढील शब्द पाहा. पिकलेला आंबा,   रांगणारे मूल,       वाहती नदी, हसरी मुलगी,      बोलकी बाहुली,    पेटती ज्योत. वरील शब्दांतील ‘पिकलेला ,रांगणारे,वाहती, हसरी,बोलकी,पेटती’ हे शब्द त्यांच्यापुढे क्रमाने येणा-या नामांची विशेषणे आहेत.पण ही विशेषणे ‘पिक, रांग, वाह ,हस , बोल , पेट’या धातूंपासून  बनलेली आहेत. अशा विशेषणांना ‘धातुसाधित विशेषणे ‘ असे म्हणतात. ४)अव्ययसाधित विशेषणे पुढील शब्द पाहा वरचा मजला,  खालची माडी,  मागील दार,  पुढची गल्ली. वरील शब्दांतील ‘वरचा ,खालची,मागील,पुढची’ हे शब्द त्यांच्यापुढे आलेल्या ‘मजला, माडी, दार , गल्ली’ या नामांची विशेषणे आहेत. पण ही विशेषणे ‘वर, खाली, मागे , पुढे ‘ या अव्ययांपासून तयार झालेली आहेत. म्हणून त्यांना ‘अव्ययसाधित विशेषणे’ असे म्हणतात. वर, खाली, मागे, पुढे या मूळ अव्ययांना ‘चा , ब , ई , ल’ हे प्रत्यय लागून ही विशेषणे झालेली आहेत. विधि – विशेषणे विशेषण हे सामान्यतः विशेष्याच्या पूर्वी येते. जसे – ‘चांगला मुलगा सर्वांना  आवडतो.’ येथे चांगला हे अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण होय. पण केव्हा केव्हा ‘तो मुलगा आहे चांगला.’ अशा विशेषणाला विधिविशेषणे किंवा उत्तरविशेषण असे म्हणतात.पुढील वाक्यांचा अभ्यास करुयाः- १)मुलगा हुशार आहे. २)गणेशचे अक्षर सुंदर आहे. ३)आजची पूजा चांगली झाली. वरील वाक्यांतील ‘हुशार’ हे विशेषण ‘मुलगा’ या नामाबद्दल अधिक देते व ते नामानंतर आले आहे.’सुंदर’ हे विशेषण ‘अक्षर’ या नामाबद्दल अधिक माहिती सांगते व नामानंतर आले अहे. ‘चांगली’ हे विशेषण ‘पूजा’ या नामाबद्दल अधिक माहिती सांगते व ते नामानंतर आले आहे. ‘हुशार, सुंदर, चांगले’ विधिविशेषणे आहेत. नामापूर्वी येणा-या विशेषणाला अधिविशेषण म्हणतात तर नामानंतर येणा-या विशेषणाला विधिविशेषण असे म्हणतात. क्रियाविशेषण पुढील वाक्य वाचा. मुलगा चांगला खेळतो.    मुलगी चांगली खेळते.       ते चांगले खेळतात. वरील वाक्यातील ‘चांगला ,चांगली, चांगले’ हे शब्द विशेषणे आहेत. परंतु ती विशेषणे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारी आहेत. क्रियाविशेषण हे विकारी असाते. त्यामुळे ही क्रियाविशेषणे आहेत ; पण क्रियाविशेषण अव्व्यये नाहीत. विशेषणाचे लिंग, वचन व विभक्ती विशेषण हे विशेष्यावर अवलंबू असते तेच विशेषणाचेही असते,जसे – शहाणा मुलगा (पुल्लिंगी, एकवचन) शहाणी मुलगी (स्त्रीलिंगी, एकवचन) शहाणे मुलगे (पुल्लिंगी, अनेकवचन) शहाण्या मुली (स्त्रीलिंगी, अनेकवचन) शहाणी मुले (नपुंसकलिंगी, अनेकवचन) विशेषण हा विकारी शब्द आहे. म्हणजे विशेष्याच्या लिंगवचनानुसार विशेषणाच्या रुपात बदल होतो.जसे – मोठा ग्रंथ, मोठी पोथी, मोठ्यापोथ्या, हा बदल आकारान्त विशेषणात होतो.याला अपवाद आहे तो आकारान्त संख्याविशेषणांचा. उदाहरणार्थ – सहा मुली, अकरा मुलगे,बारा स्त्रिया, तेरा मुले. आकारान्त विशेषणाखेरीज इतर अन्ती विशेषणांत लिंग – वचनाप्रमाणे बदल होत नाही, जसे – पुल्लिंग                     स्त्रीलिंग                      नपुंसकलिंग                    अनेकवचन सुंदर पक्षी                सुंदार मुलगी                 सुंदर फूल                       सुंदर फुले रानटी मनुष्य            रानटी स्त्री                    रानटी गवत                    रानटी माणसे कडू बदाम                कडू  काकडी                 कडू कारले                      कडू कारली शब्दांचे व्याकरण चालवताना विशेषणाचे लिंग वा वचन सांगण्याची पद्धती नाही. कारण, विशेष्याच्या लिंगवचनाप्रमाणे असते.विशेषणास विभक्ति – प्रत्यय लावण्याची पद्धती नाही. विशेषणाचे कार्य व उपयोग विशेषणाचे मुख्य कार्य हे की, ते नामाबद्द्ल विशेष माहिती सांगते व नामाची व्याप्ती मर्यादित करते. विशेषण हे नेहमी नामासह येते. वाक्यात नाम नसेल तर विशेषण असणार नाही. विशेषणाच्या पुढे नाम असते तेव्हा ते विशेषण नामाचे कार्य करते. उदा. १)नामसदृश्य विशेषण – १)श्रीमंत माणसांना गर्व असतो. (विवेषण) २)श्रीमंतांना गर्व असतो. (नाम) २)दर्शक विशेषण      - ही मुलगा चलाख आहे. ३)संबंधी विशेषण      - जो मुलगा व्यायाम करतो,तो सशक्त होतो. ४)प्रश्नार्थक विशेषण    - कोण मनुष्य येऊन गेला? त्याने काय पदार्थ आणले? ५)सार्वनामिक विशेषण – आम्हां मुलांना कोण विचारतो?

विशेषणे


क्रियापद विचार
पुढील वाक्ये वाचाः

१)गाय दूध देते.                २)आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो.

३)मुलांना खरे बोलावे.       ४)आमच्या संघाने ढाल जिंकली.

वरील वाक्यांत ठळक अक्षारांत छापलेले शब्द पाहा. ‘देते, करतो , बोलावे, जिंकली’ हे शब्द त्या त्या क्रिया दाखवितात. ‘देते’ या शब्दात देण्याची क्रिया आहे. इतर वाक्यांमध्ये ‘करण्याची, बोलण्याची जिंकण्याची’ क्रिया आहे. शिवाय हे शब्द त्या – त्या वाक्यांचे अर्थ पूर्ण करतात. अशा शब्दांना ‘क्रियापदे’ असे म्हणतात.

क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय.

क्रियापद या शब्दातील ‘ पद ‘ या शब्दाचा अर्थ ‘शब्द ‘ असा आहे. मग क्रियापद या शब्दाचा अर्थ ‘क्रिया दाखविणारा शब्द ‘ असा होईल.

उदाहरणार्थ ‘आई रोज देवाला जाऊन येते.’ या वाक्यात क्रिया दाखविणारे दोन शब्द आहेत. १)जाऊन  व २)येते. हे शब्द ‘जाण्याची ‘ व ‘येण्याची ‘ क्रिया दाखवितात.पण ‘जाऊन ‘ या क्रियावाचक शब्दाने त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.’येते’ या क्रियावाचक शब्दाने तो अर्थ पूर्ण होतो. म्हणून येते ‘जाऊन ‘ हे क्रियापद नसून या वाक्यात ‘ येते ‘ हे क्रियापद आहे.

धातू – ‘येते’ या क्रियापदात मूळ शब्द ‘ये’ हा असून त्याला ‘ ते ‘ हा प्रत्यय लागलेला आहे आणि ‘येते’ हे क्रियापदाचे रुप बनलेले आहे.‘क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात.

वरील क्रियापदांमध्ये ‘करतो, बोलावे, जिंकली ‘ या क्रियापदांत अनुक्रमे ‘काअर, बोल, जिंक’ हे धातू आहेत.

(कोशामध्ये धातूची मूळ रुपे न देता ‘णे ‘ हा प्रत्यय लावून ‘ देणे , करणे , बोलणे, जिंकणे’ अशी रुपे देण्याची प्रथा आहे. ‘देणे, करणे’ ही क्रियापदे नसून क्रियावाचक नामे आहेत.)

धातुसाधित किंवा कृदन्ते

धातूला प्रत्यय लागून क्रियापदाची विविध रुपे बनतात. जसे – बस – तो , बस – ला, गा – ऊन ,गा – ताना’ हीदेखील धातूपासून तयार झालेली रुपे आहेत. ती वाक्याचा अर्थ पूर्ण करीत नाहीत. धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणा-या शब्दांना धातुसाधिते किंवा कृदन्ते असे म्हणतात.

पुढील वाक्ये पाहा.

१)ह्या मुली पूर्वी फार चांगल्या गात.

२)त्या आता गात नाहीत.

वरील वाक्यात ‘ गा ‘ या धातूला ‘ त ‘ हा प्रत्यय लागून ‘ गात ‘ अशी क्रियावाचक रुपे आली आहेत. पहिल्या वाक्यात ‘गात ‘ हे वाक्याचा अर्थ पूर्ण करते. म्हणून ते क्रियापद आहे.दुस-या वाक्यात ‘ गात ‘ हे केवळ धातुसाधित आहे.

क्रियापदाची व्याख्या करताना आपण ‘ वाक्यातील क्रिया दाखविणार व वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द ‘ अशी केलेली आहे. यातील ‘ वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा ‘ हे शब्द महत्त्वाचे आहेत. कारण, वाक्यात क्रिया दाखवणारे आणखी काही शब्द असू शकतात ; पण ते वाक्याचा अर्थ पूर्ण करीत नाहीत.

पुढील वाक्ये पाहा

१)हसणा-याकडे आपण लक्ष देऊ नये.

२)त्याच्या घरात खाणारी माणासे पुष्कळ आहेत.

३)जहाज समुद्रात बुडताना मी पाहिले.

वरील वाक्यात ‘ हसणारा, खाणारी,बुडताना ‘ हे शब्द त्या त्या वाक्यात क्रिया दाखवितात पण वाक्याचा अर्थ पूर्ण करीत नाहीत. म्हणून ती क्रियापदे नाहीत.वाक्यातील त्यांच्या कार्यावरुन ‘हसणारा ‘ हे नाम आहे, ‘खाणारी ‘ हे विशेषण आहे व ‘बुडताना ‘ हे क्रियाविशेषण आहे.

क्रियापद हा क्रिया दाखविणारा शब्द खरा ; पण सर्वच क्रियापदे क्रिया दाखवितात असे नाही. ‘ त्याने मुलाला मारले ‘ या वाक्यातील ‘मारले ‘ हा शब्द मारण्याची क्रिया दाखवितो ; पण ‘रावण दुष्ट होता’,’मी विद्यार्थी आहे’,’राम राजा झाला’ या वाक्यातील ‘होता, आहे, झाला’ हे शब्द कोणतीही क्रिया दाखवीत नाहीत. ते कर्त्याची स्थिती दाखवितात ; किंवा स्थित्यंतर (दुसरी स्थिती ) दाखवितात. ‘अस ‘ ह्या धातूने स्थिती दाखविली जाते, तर ‘हो ‘ ह्या धातूने स्थित्यंतर दाखविले जाते. अशा शब्दांनाही व्याकरणात ‘क्रियापदे ‘ असे म्हणतात.

कर्ता व कर्म क्रियापद हा वाक्यातील मुख्य शब्द होय. क्रियापदाखेरीज वाक्याचा अर्थ सहसा पूर्ण होत नसतो. म्हणून प्रत्येक वाक्यात क्रियापद हे असावेच लागते.काही म्हणीवजा वाक्यांत तो शब्दा गाळलेला असतो, किंवा गुप्त (अध्याहृत) असतो.जसे -  १)एकी हेच बळ (आहे) २)सगळे मुसळ केरात (गेले ) ३)शितावरुन भाताची परीक्षा (होते )

वाक्यात क्रियापदाने दाखविलेली ‘क्रिया करणारा’ जो कोणी असतो त्यास ‘कर्ता ‘ असे म्हणतात. ‘कर्ता म्हणजे (क्रिया ) करणारा.’ हा कर्ता क्रियापदाने दाखविलेली क्रिया ज्याच्यावर कारतो ते त्याचे कर्म. वाक्यातील क्रियापदाने दाखविलेली क्रिया कर्त्यापासून निघते व ती दुस-या कोणावर किंवा कशावर तरी घडते. त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे त्या क्रियेचा रोख किंवा कल असाअतो ते त्याचे कर्म.

वाक्यातील कर्ता व कर्म कसे शोधतात?

वाक्यातील कर्ता व  कर्म कसे शोधतात ?

(कित्येक जण क्रियापदाला ‘कोण ‘ व ‘काय ‘ असे प्रश्न विचारुन अनुक्रमे कर्ता व कर्म शोधून काढतात. जसे १)रामा आंबा खातो. या वाक्यात ‘कोण खातो?’ – रामा व ‘काय खातो?’ – आंबा. म्हणून ‘राम ‘ हा कर्ता व ‘आंबा ‘ हे कर्म. पण युक्ती किंवा पद्धती सगळीकडे लागू पडत नाही. २)’मी बैलाला मारले. ‘ या वाक्यात ‘कोण मारतो?’ – मी ‘ काय मारतो?’ असा प्रश्न कारता येत नाही.म्हणून ‘कोणाला मारतो?’ असा प्रश्न करुन ‘कोणाला ‘ चे उत्तर ‘ बैलाला ‘ हे कार्म ठरवितात.३)’विद्यार्थी प्रामाणिक आहे.’ या वाक्यात  ‘कोण आहे?’ – विद्यार्थी. ‘काय आहे?’  - प्रामाणिक असे म्हणून ‘प्रामाणिक’ हे कर्म ठरवितात.पण ‘आहे ‘ हे क्रियापद तर अकर्मक असते. तसेच ४) ‘मला दूध आवडते ‘ – अशा वाक्यात ‘कोण आवडते?’ असा प्रश्न करता येत नाही ; म्हणून ‘कोणाला आवडते?’ असा प्रश्न करता येत नाही ; म्हणून ‘कोणाला आवडते?’ असा प्रश्न करुन या ‘कोणाचे ‘ उत्तर ‘मला ‘ हा कर्ता ठरवितात. व ‘काय आवडते? ‘ याचे उत्तर ‘दूध ‘ हे कर्म ठरवितात. हे चूकीचे आहे. ‘ आवडते ‘ हे मराठीत अकर्मक क्रियापद असून ‘दूध ‘ हा त्याचा कर्ता आहे. एकदा ‘काय ‘चे उत्तर कर्म येते तर काही वेळा ते कर्म नसाते. एकदा ‘कोणाला?’ याचे उत्तर कर्म होते, तर केव्हा कर्ता ठरते. त्यामुळे विद्यार्थी गोंधळून जातो. म्हणून ‘कोणाला ‘ ‘काय’  हे प्रश्नार्थक शब्द वापरुन  कर्ता व कर्म शोधण्याचा प्रयत्न करु नये.

तर मग मराठीत कर्ता व कर्म कसा शोधून काढावा?

कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील  क्रियापदातील मूळ धातू शोधून काढावा व त्याला – ‘णारा ‘ हा प्रत्यय लावून ‘कोण?’ असा प्रश्न करावा म्हणजे कर्ता मिळतो.

आता वरील उदाहरणे घेऊन आपण कर्ते शोधूः

(१) ‘रामा आंबा खातो.’ या वाक्यात ‘खातो’ हे क्रियापद असून त्यात ‘खा’ हा मूळ धातू आहे. त्याला ‘-णारा’ हा

प्रत्यय लावून ‘खाण्यास कोण ?’ असा प्रश्न विचारला की ‘रामा’ हे उत्तर मिळते. म्हणून ‘रामा’ कर्ता होय.

वाक्यातील कर्म शोधताना मुख्य क्रियापदाने दाखविलेली क्रिया ‘कोणावर घडते?’ असा प्रश्न करावा. ती

क्रिया ज्या वस्तूवर किंवा प्राण्यावर घडते ते त्याचे कर्म. वरील उदाहरण पुन्हा घेऊ  ‘रामा आंबा खातो.’

खाण्याची क्रिया कोणावर घडते? – आंब्यावर. म्हणून ‘आंबा’ या वाक्यातील कर्म होय.

(२) ‘मी बैलाला मारतो’ यावाक्यात ‘मारणारा कोण ?’ – मी. म्हणून ‘मी, हा या वाक्यातील कर्ता. ‘मारण्याची

क्रिया कोणावर घडते?’ – बैलावर. म्हणून ‘बैलाला’ हे कर्म.

(३)  ‘विद्यार्थी प्रामाणिक आहे.’ या वाक्यात ‘आहे’ हे क्रियापद व ‘अस’ हा मूळ धातू आहे. ‘असणारा कोण ?’

विद्यार्थी. म्हणून ‘विद्यार्थी’ हा या वाक्यातील कर्ता. आता असण्याची क्रिया कोणावर घडते?-

‘विद्यार्थ्यावरच’. म्हणजे येथे क्रिया कर्त्यापासून पुढे जातं नाही. म्हणून या वाक्यात कर्म नाही. ‘आहे हे

क्रियापद अकर्मक आहे.

(४) ‘मला  दूध आवडते.’ या वाक्यात ‘आवडते’ हे क्रियापद आहे. ‘आवड’ हा मूळ धातू आहे. आता आपण प्रश्न

विचारु – ‘आवडणारे कोण?’ – पण ‘कोण’ हा प्रश्न व्यक्तीशी संबंधित असतो. ‘दूध’ हा पदार्थ असल्यामुळे

आपण प्रश्न हा कर्ता आहे. (‘मला’ हा कर्ता नव्हे)

पुढील वाक्ये पाहा.

(१) त्याला थंडी वाजते – वाजणारी कोण ? – थंडी. ‘थंडी’ हा कर्ता.

(२) राजाला मुकुट शोभतो – शोभणारा कोण ? – मुकुट. ‘मुकुट’ हा कर्ता.

(३) मला चंद्र दिसतो. – दिसणारा कोण ? – चंद्र. ‘चंद्र’ हा कर्ता.

वरील वाक्यामध्ये ‘त्याला, राजाला, मला’ हे कर्ते नव्हेत.

आता तुमच्या लक्षात आले असेल की, क्रिया करणारा तो कर्ता व क्रिया भोगणारा किंवा सोसणारे ते कर्म.

क्रियापदाचे प्रकार

क्रियापदाचे मुख्य प्रकार दोन आहेतः(१) सकर्मक क्रियापद   (२) अकर्मक क्रियापद

(१) सकर्मक क्रियापद

पुढील वाक्ये पाहाः

(१) गवळी धार काढतो.

(२) अनुराग निबंध लिहितो.

(३) आरोही लाडू खाते.

वरील वाक्यांना पूर्ण अर्थ आहे. जर ‘गवळी काढतो’, ‘अनुराग लिहितो’, ‘आरोही खाते’ एवढीच वाक्ये दिली तर त्यांचे अर्थ पूर्ण होत नाहीत. म्हणजेच ‘काढतो’ या क्रियापदाला ‘धार’ या कर्माची जरुरी आहे. म्हणून

‘काढतो’ हे क्रियापद सकर्मक आहे. तसेच ‘लिहितो’, ‘खातो’, या क्रियापदाचे बाबतीतही आहे. यावरुन असे दिसते की, क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते. त्यास ‘सकर्मक क्रियापद’ असे म्हणतात.

(२) अकर्मक क्रियापद

पुढील वाक्ये वाचाः

(१) मी रस्त्यात पडलो.

(२) आज भाऊबीज आहे.

(३) सुनील उद्या पुण्याला जाईल.

वरील वाक्यातील ‘मी रस्त्यात पडलो’ या वाक्यात पडण्याची क्रिया कर्त्यावरच घडते. ती क्रिया कर्त्या

पासून पुढे जात नाही. ‘मी पडलो’ यात पुरा अर्थ आहे.. ‘पडला’ या क्रियापदाला कर्माची जरुरी नाही; म्हणून

‘पडलो’ हे क्रियापद अकर्मक आहे. उरलेल्या वाक्यांचे बाबतीत तसेच म्हणता येईल.

यावरुन असे दिसते की,

कर्त्या पासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल,

तर ते क्रियापद ‘अकर्मक’ असते.

द्विकर्मक क्रियापदे

पुढील वाक्ये वाचाः

(१) गुरुजी विद्यार्थ्याना व्याकरण शिकवितात.

(२) आजीने नातीला गोष्ट सांगितली.

(३) तिने भिका-याला पैसा दिला.

वरील वाक्यांत ‘शिकवितात, सांगितली, दिला’ ही क्रियापदे सकर्मक असून त्यांना दोन कर्मे आहेत.

पहिले वाक्य पहा. शिकविणारे कोण ? – गुरुजी. गुरुजी हा कर्ता. शिकविण्याची क्रिया कोणावर घडते?  -

‘व्याकरण’ व ‘विद्यार्थी’ या दोहोंवर. तीच गोष्ट ‘सांगितली’ व ‘दिला’ या क्रियापदांचे बाबतीतही आहे. या

क्रियापदांना दोन कर्मे लागतात अशा क्रियापदांना ‘द्विकर्म’ क्रियापदे असे म्हणतात. यांतील वस्तुवाचक

कर्माना ‘प्रत्यक्ष कर्मे’ असे म्हणतात. आणि व्यक्तिवाचक कर्माना ‘अप्रत्यक्ष कर्मे’ असे म्हणतात. वरील

वाक्यांतील, ‘व्याकरण, गोष्ट,पैसा’ ही प्रत्यक्ष कर्मे व विद्यार्थ्याना, नातीला व भिका-याला’ ही अप्रत्यक्ष

कर्मे होत. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीया असते तर अप्रत्यक्ष कर्माची वुइभक्ती संप्रदानी चथुर्थी असते.

उभयविध क्रियापदे

पुढील वाक्ये पाहाः

(अ)  (१) त्याने घराचे दार उघडले. (२) त्याच्या घराचे दार उघडले.

(आ) (१) रामाने धनुष्य मोडले. (२) ते लाकडी धनुष्य मोडले.

(अ) गटातील दोन्ही वाक्यांत ‘उघडले’ हे क्रियापद आहे. पहिल्या वाक्यात ते सकर्मक वापरले आहे.

या वाक्यात ‘त्याने’ कर्ता असून ‘दार’ हे कर्म आहे. ‘उघडले’ क्रियापद सकर्मक आहे.

दुस-या वाक्यात ‘उघडले’ हेच क्रियापद आहे. येथे ‘उघडणारे कोण’ या प्रश्नांचे उत्तर ‘दार’ येते. तर

‘उघडण्याची क्रिया कोणावर घडली? या प्रश्नांचे उत्तरही ‘दार’ येते. याचा अर्थ ‘उघडले’ क्रियापद येथे

‘अकर्मक’ आहे.

(आ) गटातील वाक्यांत ‘मोडले’ हे क्रियापद आहे. त्यापैकी पहिल्या वाक्यात ‘मोडले’ हे क्रियापद

सकर्मक आहे तर दुस-या वाक्यात ते अकर्मक आहे.

यावरुन असे दिसते की, एकच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यांत सकर्मक व अकर्मक असे दोन्ही त-हेने

वापरता येते; अशा क्रियापदांना उभयविध क्रियापदे असे म्हणतात. काप, आठव, स्मर, लोट हे धातू या

प्रकारचे होत.

विधानपूरकः सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. कर्म दिल्याशिवाय सकर्मक धातू

संबंधीचे विधान पूर्ण होत नाही. अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते. केवळ कर्ता व क्रियापद

एवढ्यानेच सकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुधा पूर्ण होते. जसे त्याने बैलास मारले (सकर्मक). तो गेला

ती धावते(अकर्मक).

पण काही अकर्मक धातू असे आहेत, की कर्ता व क्रियापद असूनही त्यांचा वाक्यार्थ अपुरा असतो.

उदा.  (१) राम झाला. (२) मुलगा आहे. (३) आंबा निघाला. (४) गुरुजी दिसतात. ‘झाला, आहे, निघाला,

दिसतात’ ही क्रियापदे म्हणतात. ती विधाने पूर्ण करण्यासाठी काही शब्दांची जरुरी असते. जसे-

(१) राम राजा झाला.            (३) आंबा नासका निघाला.

(२) मुलगा हुशार आहे.           (४) गुरुजी रागावलेले दिसतात.

वरील वाक्यांतील ‘राजा, हुशार, नासका, रागावलेले’ हे शब्द अपुरी विधाने पूर्ण करतात. अशा

शब्दांना ‘विधानपूरक’ किंवा ‘पूरक’ असे म्हणतात.

काही अकर्मक धातू

अकर्मक धातूंविषयी अधिक अभ्यास केला तर दिसते की, स्थितीवाचक, गतवाचक, वस्तुस्थितीदर्शक,

स्थित्यंतरवाचक धातू अकर्मक असतात. तर, कृतीवाचक धातू सकर्मक असतात. काही अकर्मक धातूः-

(१) अस, नस, हो, नहो, ऊठ, बस, नीज, झोप, थरथर, कुडकूड, रड, पड, सड, मर, सर, ऊड, धाव,

थांब, थक, शक, जाग, झीज, वाढ, झड, जळ, किंचाळ, तूट, सुट पहूड, उजळ, प्रकाश, ओरड, घोर, सळसळ,

खळखळ, धडपड, चुरचूर, भुकेज, कीड, राह, वाह, फू उमल, उपज, निपज, जन्म, पीक, लोळ, वाज, भीज,

शीज, सूज, वीझ, रुझ, बिघड इ.

(२)आवड, वाट, रुच,दीस, परवड, मीळ, कळ शोभ, लाज, भी, घाबर, हस या धातूच्या प्रयोगात

संप्रदान, अपादान किंवा अधिकरण अशा अर्थाने एखादे चतुर्थ्यन्त पद येते.

क्रियापदाच्या प्रकारांमध्ये सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद या प्रकारांचे महत्त्व फार मोठे

आहे. या प्रकारच्या अभ्यासाचा उपयोग पुढील अनेक घटकांमध्ये होतो. उदा. वाक्यांचे प्रयोग, प्रयोग ओळखणे,

वाक्याचे प्रकार, व्याकरण चालविणे, वाक्य पृथक्करण इ. या पुढील अभ्यासात पायाभूत घटक म्हणून पाहिले पाहिजे.

क्रियापदाचे अन्य प्रकार
क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ करणारा क्रियावाचक शब्द होय हे आपण पाहिले क्रियापदातील

प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात हेही आपण पाहिले. खेळतो या शब्दांत ‘खेळ’ हा धातू आहे. ‘तो’

हा प्रत्यय लागून ‘खेळणे’, खेळताना, खेळणारा’ अशा प्रकारची क्रियादर्शक रुपेही तयार होतात. पण ती

वाक्याच्या अर्थ पूर्ण करण्याचे काम करीत नाहीत. धातूपासून बनलेल्या, धातूपासून साधलेल्या अशा

रुपांना धातुसाधिते असे म्हणतात.

आपण गेल्या पाठात क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार अभ्यासले. सकर्मक क्रियापदे आणि अकर्मक

क्रियापदे. आपण क्रियापदांच्या अन्य प्रकारांचा या पाठात करणार आहोत.

संयुक्त व सहाय्य क्रियापदे

खालील वाक्ये पाहाः

(१) क्रीडांगणावर मुले खेळू लागली.

(२) आपणही आता खेळू.

पहिल्या वाक्यांतील ‘खेळू’ हा शब्द खेळण्याची क्रिया दाखवितो; पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करीत

नाही. दुस-या वाक्यातील ‘खेळू’ या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, म्हणून ते क्रियापद होय.

मग पहिल्या वाक्यात क्रियापद कोणते? ‘खेळू लागली’ याआ दोन शब्दांनी ती क्रिया पूर्ण होते. नुसते लागली

या शब्दाने क्रियेचा अर्थ पूर्ण होत नाही. ‘खेळू लागली’ या संयुक्त शब्दांत ‘खेळू’ हे धातूसाधित असून ‘लागली’

या क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण करण्यास म्हणजे क्रियापदाचे रुप बनविण्यास साहाय्य केले

म्हणून ‘लागली’ हे सहाय्य क्रियापद होय. ‘खेळू लागली’ हे क्रियापद धातूसाधित व सहाय्य क्रियापद यांच्या

संयोगाने बनले आहे, म्हणून अशा क्रियापदाला ‘संयुक्त क्रियापद’ असे म्हणतात.

धातूसाधित व सहाय्य क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद होते, हे आपण पाहिले. पण त्याला एक अट

असते ती म्हणजे या संयुक्त क्रियापदाने दर्शवलेली क्रिया एकच असायला हवी. त्या दोन वेगवेगळ्या क्रिया

असून चालणार नाहीत.

पुढील वाक्ये पाहाः

(१) बाळ, एवढा लाडू खाऊन टाक.

(२) बाळ, एवढा लाडू खाऊन जा.

पहिल्या वाक्यात ‘खाऊन टाक’ हे संयुक्त क्रियापद आहे. येथे खाण्याची क्रिया व टाकण्याची क्रिया

अशा दोन क्रिया नसून ‘खाऊन टाक’ याचा अर्थ ‘खा’. यातील दोन शब्दांनी एकाच क्रियेचा बोध होतो.

दुस-या वाक्यातील ‘खाऊन जा’ या शब्दांत खाण्याची व नंतर जाण्याची अशा दोन वेगळया क्रिया

आहेत. म्हणून ‘खाऊन जा’ हे संयुक्त क्रियाप्द नाही. ‘जा’ हे मुख्य क्रियापद असून ‘खाऊन’ हे धातूसाधित

आहे.

संयुक्त क्रियापदातील धातूसाधितावरुन मुख्य क्रियेचा बोध होतो, तर विधानाला केवळ पूर्णता

आणण्याचे काम सहाय्य क्रियापद करते. जेव्हा धातूसधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध

होतो, तेव्हा धातूसाधिताला मदत करणा-या क्रियापदाला ‘सहाय्यक क्रियापद’ असे म्हणतात. ‘अस, नस, हो,

ये, जा, दे, लागू, टाक, शक, पाहिजे, नको’ वगैरे ठराविक धातूंवरुन सहाय क्रियापदे बनतात. यांतील ‘अस,

हो, नस’ हे धातू काळाचे प्रकार दाखवितात. ‘पाहिजे, नको, नये, नलगे’ हे अर्थाचे प्रकार दाखवितात. सहाय्यक

क्रियापद सर्व काळी , सर्व पुरुषी चालत नाहीत. म्हणून त्यांना गौण क्रियापदे असेही म्हणतात.

येथे आणखीही एक लक्षात ठेवली पाहिजे . ती ही की ‘मार देणे, अभ्यास करणे, प्रेम करणे, पाणी घालणे, विचार करणे’ अशा नाम व क्रियापद मिळून होणा-या शब्दांना संयुक्त क्रियापद मानू नये. इंग्रजीत

त्यांना ‘to beat, to study, to love, to water, to think’ असे एकेरी प्रतिशब्द असल्यामुळे त्यावरुन

बनलेल्या मराठीतील क्रियापदांना संयुक्त क्रियापदे कित्येक जण चुकून मानतात. अशा ठिकाणी ‘देणे, करणे,

मारणे’ ही मुख्य क्रियापदे मानून ‘मार, अभ्यास, प्रेम, पाणी, विचार’ ही त्यांची कर्मे मानावीत.

सिद्ध व साधित क्रियापदे

मूळ धातूंना प्रत्यय लावून क्रियापदे बनवितात, हे आपण पाहिले

आता पुढील वाक्ये पाहाः

(१) माझ्या कपाटातील पुस्तके तो नेहमी हाताळतो.

(२) आईच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले.

(३) तो शिक्षकांच्या व्यवसायात स्थिरावला.

(४) आम्ही ही पुस्तके मुंबईहून आणवली.

(५) खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली.

वरील पहिल्या दोन वाक्यांतील क्रियापदे अनुक्रमे हात व पाणी या दोन नामापासून बनविलेली क्रिया

साधलेली  आहेत. तिस-या वाक्यातील ‘स्थिरावली’ हे क्रियापद ‘स्थिर’ या विशेषणापासून बनविलेले आहे. चौथ्या वाक्यातील ‘आणवली’ हे क्रियापद ‘आण’ या धातूपासून बनविलेले आहे पाचव्या वाक्यातील ‘पुढारली’ हे क्रियापद ‘पुढे’ या अव्ययापासून साधलेले आहे. अशा रीतीने ‘हाताळ, पाणाव, स्थिराव, आणव, पुढार’ हे धातू नामे, विशेषणे, क्रियापदे व अव्यये यांना प्रत्यय लागून बनले आहेत. अशा विविध प्रकारच्या शब्दांपासून

तयार होणा-या धातूंना ‘साधित धातू’ म्हणतात व या साधित धातूपासून बनलेल्या क्रियापदांना ‘साधित क्रियापदे’ असे म्हणतात. ‘जा, ये, कर, ऊठ, बस’ असे जे मूळचे धातू आहेत. त्यांना ‘सिद्ध क्रियापदे’ असे म्हणतात.

प्रयोजक क्रियापदे व शक्य क्रियापदे

प्रयोजक क्रियापदे

साधित धातूवरुन दोन प्रकारची क्रियापदे बनतात.

(१) प्रयोजक क्रियापदे व   (२) शक्य क्रियापदे

पुढील वाक्ये वाचा

(१) ते मूल हसते.           (२) आई त्या मुलाला हसविते.

पहिल्या वाक्यात ‘हसते’ क्रियापद आहे; तर दुस-या वाक्यात ‘हसविते’ क्रियापद आहे. दोन्ही क्रिया-

पदांतील मूळ धातू ‘हस’ हाच आहे. हसण्याची क्रिया दोन्ही वाक्यांत मूलाकडूनच होते. पहिल्या वाक्यात

हसण्याची क्रिया मूलाकडून स्वाभाविकपणे किंवा आपणहून केली गेली, पण दुस-या वाक्यात ‘हसविते’ या

शब्दाने आईने ती त्याला करायला लावली असा अर्थ व्यक्त होतो.

यावरुन असे दिसते की

मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून, ती क्रिया तो दुस-या कोणाला तरी

करावयास लावीत आहे, असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला ‘प्रयोजक क्रियापद’ असे म्हणतात.

उदा. झाड पडले. या वाक्यात पडण्याची क्रिया कर्त्याकडून स्वाभाविकपणे घडली. ‘झाडे पाडले’

या वाक्यात पाडण्याची क्रिया दुस-याकडून झाली म्हणून ‘पाडले’ हे प्रयोजक क्रियापद आहे. तसेच देतो-देवदेतो,

चालतो – चालवितो, बसतो – बसवितो. (प्रयोजक म्हणजे प्रेरणा देणारा. कर्ता मूळ धातूतील स्वतः करीत नसून ती क्रिया करण्याला दुस-याला प्रवृत्त करतो.)

प्रयोजक क्रियापदे दोन प्रकारांनी तयार होतात.

(१)        मूळ धातूला ‘व’ हा प्रत्यय लागून ( ‘व’, ‘चे’, ‘वि’ असेही रुप होते.)

हसतो    -  हसवतो    -  हसवितो

बसतो    -  बसवतो    -  बसवितो

चालतो  -   चालवतो  -  चालवतो

निजतो  -   निजवतो   -  निजवितो

वरील शब्दांत ‘व’ च्या पुढे ‘इ’ हा आगम म्हणजे नवीन वर्ण येतो. याला संस्कृतात इडागम (इट् + आगम) असे म्हणतात.

‘खा, पी, दे, घे, ये, ने’ यांसारख्या एकाक्षरी धातूंना ‘व’ च्या ऐवजी ‘ववि’ हे प्रत्यय लागतात.

जसे – खातो  -  खाववितो, देतो  - देववितो, घेतो  - घेववितो. (अपवाद – पी  -  पितो  -  पाजतो,

ये  -  येतो   -  आणता )

(२)         मूळ धातूतील आदयाक्षरात वृध्दी किंवा गुण होतो.

( अ बदल आ, इ बदल ए, उ बद्दल ओ )

गळणे  -   गाळणे , चरणे   -  चारणे, मरण   -  मारणे

फिटणे  -   फेडणे , तुटणे    -  तोडणे, फुटणे   - फोडणे ( ट च्या जागी ‘ड’ येतो. )

काही धातूंच्या बाबतीत पुन्हा प्रयोजक रुप झालेली आढळतात.

जसे    -  मरणे    -   मारणे      -   मारविणे         सुटणे   -   सोडणे     -   सोडविणे

पडणे  -   पाडणे    -  पाडविणे                          पिणे    -   पाजणे     -    पाजविणे

शक्य क्रियापदे

पुढील वाक्ये वाचा.

(१) मला आता का करवते.

(२) त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते.

(३) मला दररोज वीस किलोमीटर चालवते.

वरील वाक्यांत ‘करवते, बसवते, चालवते’ या क्रियापदांत ‘कराव, बसव, चालव’ हे साधित धातू आहेत.पण वरील वाक्यांत कर्ता या क्रिया दुस-याकडून करवतो असा प्रयोजकाचा अर्थ नसून त्या क्रिया करण्याची कर्त्याला शक्यता आहे, असा अर्थ व्यक्त होतो ( ती क्रिया कर्त्याला करणे शक्य आहे, असा अर्थ व्यक्त

होतो). अशा वेळी त्यांना शक्य क्रियापदे असे म्हणतात.

यावरुन असे दिसते की,

जे साधित धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवितात, त्यांना

‘शक्य क्रियापदे’ असे म्हणतात.

‘शक्य क्रियापदे’ व ‘प्रयोजक क्रियापद’ याच्या रुपात साम्य असले तरी त्यांच्या उपयोगावरुन व त्या

वरुन व्यक्त होणा-या अर्थावरुन त्यातील फरक लक्षात येईल तो पुढीलप्रमाणेः-

सिध्द क्रियापदे शक्य क्रियापदे प्रयोजक क्रियापदे
(१) मी खेळतो. (१) आजारानंतर मला आता
खेळवते.

(१) आई मुलाला खेळवते
(२) मी चालतो. (२) त्या मुलाला आता एक
किलोमीटर चालवते.

(२) आई मुलाल चालवते.
(३) बाईनी वह्या आणल्या. (२) बाईना वह्या वर्गात आणवत
नाहीत.

(३) बाईनी शिपायाकडून वह्या
वर्गात आणवल्या.

अनियमित क्रियापदे

धातूला काळ व अर्थ दाखविणारे प्रत्यय लागून क्रियापदांची रुपे बनतात. ‘बस’ या धातूची रुपे पुढील

प्रमाणे होतातः-

बसतो (वर्तमान काळ)                   बस (आज्ञार्थ)

बसला (भूतकाळ)                         बसावा (विध्यर्थ)

बसेल (भविष्यकाळ)                      बसता  (संकेतार्थ)

परंतु, मराठीमध्ये काही धातू असे आहेत की, त्यांना काळांचे व अर्थाचे (आख्यातांचे) सर्व प्रत्यय न

लागता ते थोड्या वेगळयाच प्रकारे चालतात त्यांना ‘गौण क्रियापदे’ किंवा ‘अनियमित क्रियापदे’ असे म्हणतात.

‘आहे, नाही, नव्हे, पाहिजे, नको, नलगे, नये’ या क्रियापदांची रुपे अशा प्रकारची आहेत. त्यांची मूळ रुपे क्रिया-

पदेच असून त्यात अमुक  एक धातू आहे, असे निश्चितपने सांगता येत नाही.

उदाहरणार्थ, (१) मुलांनी सतत खेळू नये. (२) सुज्ञास अधिक सांगणे नलगे.

(३) या दरवाजाने जाऊ नको. (४) परमेश्वर सर्वत्र आहे.

(५) मला कॉफी पाहिजे. (६) असे वागणे बरे नव्हे.

(७) आई घरी नाही.

भावकर्तृक क्रियापदे

क्रियापद म्हटले, की त्यात क्रिया आली व ती क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी कर्ता असावाच लागतो.

पण पुढील वाक्ये पाहाः

(१) मी घरी पोचण्यापूर्वीच सांजावले.

(२) पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते.

(३) उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते.

(४) आज दिवसभर सारखे गडगडते.

वरील वाक्यांतील ‘सांजावले, मळमळते, उजादले, गडगडते’ ही क्रियापदे अशी आहेत, की त्यांचे

कर्ते वाक्यांत स्वतंत्रपणे दिसत नाहीत. वरील वाक्यांतील ‘सांजावले’ याचा अर्थ ‘सांज झाली’, ‘मळमळते’

म्हणजे ‘मळमळ होते’ वगैरे. या शब्दांतील क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव तोच त्याचा कर्ता मानावा लागतो.

अशा क्रियापदांना भावकर्तृक क्रियापदे असे म्हणतात. या क्रियापदांचा कर्ता वाक्यात स्पष्ट नसतो म्हणून काही

व्याकरणकार त्यांना ‘अकर्तृक क्रियापदे’ असे म्हणतात.

करणरुप आणि अकरणरुप

वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असते तेव्हा क्रियापदाच्या रुपाला करणरुप असे

म्हणतात व हे विधान जेव्हा नकारार्थी असते तेव्हा क्रियापदाच्या त्या रुपाला अकरणरुप असे म्हणतात.

उदा. (१) मुलांनी खरे बोलावे. (करणरुप)

(२) मुलांनी खोटे बोलू नये. (अकरणरुप)

हे अकरणरुप करताना ‘न, ना, नये, नाही, नको’ अशा सारख्या शब्दांचा वापर करतात.

धातुसाधिते (कृदन्ते)

धातूला प्रत्यय लागून क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करीत असतील तर त्यांना आपण ‘क्रियापदे’ असे म्हणतो. जेव-तो, जेव-ला, जेव-तात. तसेच, धातूला ‘णे, ते, ता, ताना, ऊ, ऊन, ला, वे’

हे प्रत्यय लागून क्रियावाचक शब्द बनतात. जसे – जेव-णे, जेव-त, जेव-ता, जेव-ताना, जे-वून, वगैरे. पण

हे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण न करता ते वाक्यात नामे, विशेषणे किंवा क्रियाविशेषणे यांची कार्ये करतात.

धातूपासून तयार झालेल्या अशा शब्दांना ‘धातुसाधिते’ किंवा ‘कृदन्ते’ असे म्हणतात. धातूंना जोडल्या

जाणा-या प्रत्ययांना संस्कृतात ‘कृत् प्रत्यय’ म्हणतात. कृत (= करीत). कृदन्त (= कृत् + अन्त) म्हणजे ज्याच्या

अंती केवळ कृत् (= क्रियादर्शक) प्रत्यय आहे असा शब्द ही कृदन्ते वाक्यांत कोणकोणत्या प्रकारची कार्ये करतात.

ती खालील तक्त्यात थोडक्यात दिलेली आहेत.

कृदन्तांचे प्रकार व त्यांची कार्ये

क्रम प्रकार उदाहरण धातू प्रत्यय कार्य
१. णे-कृदन्त त्याचे वागणे मला आवडते. वाग णे ना
२. त-कृदन्त तो रस्त्याने खात जातो. खा क्रियाविशेषण
३. ता-कृदन्त सत्य संकल्पाचा दाता भगवान.
तो घरी चालता झाला.

मी पहाटे पाच वाजता उठतो.

दा
चाल

वाज

ता
ता

ता

नाम
विशेषण

क्रियाविशेषण

४. ताना-कृदन्त तो धावताना रस्त्यात पडला. धाव ताना क्रियाविशेषण
५. ऊ-कृदन्त मुलांना खाऊ आवडतो. खा नाम
६. ऊन-कृदन्त खुर्चीत बसून तो बोलला. बस ऊन क्रियाविशेषण
७. ला-कृदन्त केल्याने होत आहे रे.
झाकली मूठ सव्वालाखाची.

कर
झाक

ला
ली

नाम
विशेषण

८. वे-कृदन्त मला आता घरी जावयास हवे.
त्याचे चेंडू फसवे असतात.

जा
फस

वे
वे

नाम
विशेषण

एका अर्थाने कृदन्ते किंवा धातुसाधिते हे क्रियापदाच्या घराण्यातून नाम, विशेषण किंवा

क्रियाविशेषण यांपैकी एका घराण्यात आलेले ‘दत्तक शब्द’ होत. यांच्यावर दोन्ही घराण्यांचे संस्कार

झालेले असतात. घडलेले असतात. क्रियापद या नात्याने यांना कर्ता, कर्म, पूरक, क्रियाविशेषणे असू

शकतात. तर नाम या नात्याने त्यांना लिंग, वचन व विभक्ती यांचे प्रत्यय लागतात. जसे.

(१) तुमचे बोलणे सौम्य आहे. (कर्ता, नपुंसकलिंगी,एकवचन)

(२) त्याने माझी सर्व देणी दिली. (कर्म, नपुंसकलिंगी, अनेकवचन)

(३) माझ्या बोलण्याचा त्याला राग आला. (षष्ठी विभक्ती)

(४) त्याचे चेंडू फसवे होते. (विशेषण, पूरक)





क्रियापद विचार


क्रियापद विचार : क्रियापदाचे अर्थ व आख्यात विचार
काळांचे विशेष उपयोग मराठीत एकंदर तीन काळ आहेतः (१) वर्तमान काळ , (२) भूतकाळ व (३) भविष्यकाळ . त्यांचा  आपण अभ्यास केला आहे. तसेच  त्यांच्या पोटप्रकारांचाही अभ्यास आपण केला. भाषेचा व्यवहार करताना काळांचे बंधन काटेकोरपणे पाळले जात नाही. एखाद्या काळाचा वापर दुस-याच काळातील क्रियेबद्दल केलेला आढळून येतो. शिवाय, त्यांतही विविध सूक्ष्म छटा आढळातात. भाषेचा अभ्यास करताना काळाचे हे विशेष उपयोग माहीत असणे आवश्यक आहेत. [अ] वर्तमान काळ (१) सर्व काळी व सर्वत्र सत्य असलेले विधान करताना (स्थिर सत्य ) उदा. सूर्य पूर्वेस उगवतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. (२) भूतकाळातील घटना वर्तमानात सांगताना . (ऐतिहासिक वर्तमान काळ ) उदा. अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो. (म्हणाला ) (३) लवकरच सुरू होणारी क्रिया दर्शविताना (संनिहित भविष्यकाळ ) उदा. तुम्ही पुढे व्हा, मी येतोच. (मी येईन) (४) अवतरण देतोना = उदा. समर्थ रामदास म्हणतात, ‘ जगी सर्व सूखी असा कोण आहे ?’ (५) लगतचा भूतकाळ  सांगताना. (संनिहित भूतकाळ ) मी बसतो (=  बसलो ) तोच तुम्ही हजर! (६) एखादी क्रिया सतत घडते अशा अर्थी . (रीति वर्तमानकाळ ) उदा. तो नेहमीच उशिरा येतो. (= येत असतो. ) [आ] भूतकाळ (१) ताबडतोब  घडणा-या  क्रियेबाबत. ( संनिहित भूतकाळ ) उदा.तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. (= येईन) (२) एखादी क्रिया भविष्यकाळी खात्रीने होणार या अर्थी (निःसंशय भविष्यकाळ) उदा. जवळ ये की मार बसलाच म्हणून समज     (खात्री) (३) संकेतार्थ असल्यास (संभव ) पाऊस आला. (= येईल ) तर ठीक. (४) वर्तमानकाळातील अपूर्ण क्रिया संपण्याच्या बेतात आहे. अशा अर्थी तो पाहा तुझा मित्र आला. (= येत आहे.) [इ] भविष्यकाळ (१) संकेतार्थ असल्यासः तू मदत देशील तर मी आभारी होईन. (२) अशक्यता दर्शवितानाः सगळेच मूर्ख कसे असतील. (अशक्यता ) (३) संभव असतानाः गुरूजी आत शाळेत असतील. ( असण्याचा संभव ) (४) इच्छा व्यक्त करतानाः मला दोन रूपये हवे होते. (= आहेत.) क्रियापदाचा अर्थ क्रियापदाच्या रूपांवरून निरनिराळ्या काळांचा बोध होतो हे आपण  पाहिले ; पण केव्हा – केव्हा क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध न होता आज्ञा, उपदेश, विनंती, कर्तव्य, इच्छा, संकेत वगैरे बोलणा-याच्या मनातील हेतू, उद्देश किंवा प्रयोजन समजते. ह्यालाच व्याकरणात‘क्रियापदाचा अर्थ’ असे म्हणतात. हे अर्थ चार मानतातः (१) स्वार्थ, (२) आज्ञार्थ, (३) विध्यर्थ, (४) संकेतार्थ. अर्थ व त्यांचे विविध  उपयोग (१)स्वार्थ स्वार्थ म्हणजे स्वतःचा किंवा मूळचा अर्थ होय. क्रियेचे विधान तोच त्याचा अर्थ होय. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध  होतो व आज्ञा, विधी किंवा संकेत वगैरे अर्थाचा बोध न होता क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेवढाच समजतो तेव्हा त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाची सर्व काळांतील रूपे ही ‘स्वार्थी ’ होत. जसे, (१)  मुले अभ्यास करतात.  (२) तो घरी गेला.  (३) मी खात्रीने पास होईन. (२)आज्ञार्थ क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे किंवा मागणे, आशीर्वाद देणे, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश करणे या गोष्टीचा बोध होतो. तेव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. जसे, (१)  मुलानो, सर्वजण रांगेत उभे राहा. (आज्ञा) (२)  देवा, सर्वांना सुखी ठेव. (प्रार्थना ) (३)  एवढे आमचे काम कराच. (विनंती.) (४)  मी हे काम करू ? (अनुमोदन प्रश्न) (५)  तेवढी खिडकी लाव पाहू. (सौम्य आज्ञा) (३)विध्यर्थ जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध  होतो, तेव्हा यास विध्यर्थी असे म्हणतात. जसे, (१)  मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. (कर्तव्य) (२)  अंगी धैर्य असणा-यांनीच हे कार्य करावे. (योग्यता) (३)  परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. (शक्यता ) (४)  आता पाऊस थांबावा. (इच्छा ) (५)  कृपया, उत्तर पाठवावे. (विनंती ) (६)  तो बहुधा घरी असावा (४)संकेतार्थ जेव्हा म्हणजे अट. जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो. म्हणजे अमुक केले अस्ते तर अमुक झाले असते असे समजते, तेव्हा त्यास संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात. जसे, (१)  मला जर बरे असते तर मी भाग घेतला असता. (२)  निमंत्रण आले तर मी येईन. (३)  पाऊस आला तरी सहल जाणारच . (४)  तू आला नसतास  तरी चालले असते. आख्यातविकार संस्कृतात क्रियापदाला ‘आख्यात’ असे म्हणतात. लिंग, वचन व विभक्ती यांमुळे नामाच्या रूपात जसा बदल होतो तसाच लिंग, वचन  व पुरूष यांमुळे क्रियापदाच्या  रूपातही बदल (=विकार ) होता. उदा. बसतो. (पुल्लिंगी), बसते (स्त्रीलिंगी ), बसतात (अनेक वचन), बसतोस (द्वितीय पुरूष ). धातुला प्रत्यय लागून क्रियापदांची  रूपे बनतात हे आपण पाहिले. उदा. बस – तो, बस – ला, बसे, बसेल, बसू , बसा – वा, बस – ता . ही रूपे म्हणजे काळांची व अर्थाची रूपे आहेत. क्रियापदांना म्हणजेच आख्यातांना ‘तो, ला, ई, ईल, ऊ, वा’ वगैरे प्रत्यय लागून विविध काळ व अर्थ यांची रूपे तयार होतात. त्यांना आख्यात प्रत्यय असे म्हणतात. काळ व अर्थ क्रियापदांना  होणारे विकार असल्यामुळे यानांच आख्यातविकार असे म्हणतात. ‘आख्यात’ या शब्दाऐवजी ‘काळ व अर्थ’ हे शब्द अधिक सोपे व रूढ आहेत. त्याच शब्दांचा वापर सर्वत्र व या पुस्तकात केलेला आहे. तरीपण चार काळ व तीन अर्थ यांना आख्यातांची जी नावे देण्यात आली आहेत. ती अधिक सूक्ष्म व शास्त्रीय असल्यामुळे त्या नावांचा परिचय पुढे थोडक्यात करून देण्यात येत आहे.
काळ / अर्थ क्रियापदाचे रूप आख्याताचे नाव
वर्तमानकाळ बसतो प्रथम - ताख्यात
भूतकाळ बसला लाख्यात
रीतिभूतकाळ बसे ई – आख्यात
भविष्यकाळ बसेल ईलाख्यात
आज्ञार्थ बसू ऊ - आख्यात
विध्यर्थ बसावा वा - ख्यात
संकेतार्थ बसता द्वितीय = ताख्यात
आख्यातांना दिलेली ही नावे अधिक चांगली व शास्त्रीय आहेत, असे म्हणायचे कारण वर्तमान, भूत, भविष्य ही काळांची नावे तितकीशी काटेकोर नाहीत. वर्तमानकाळाच्या रूपावराण केव्हा भविष्यकाळाचा ( मी येतोच = येईन ) व भूतकाळाच्या रूपावरून केव्हा भविष्यकाळाचा ( मी आलोच = येईन ) वगैरे आशय व्यक्त होत अस्तो. हे आपण ‘काळांचे विशेष उपयोग’ या मुद्द्याचे स्पष्टीकरण समजून घेताना पाहिले आहे.

धातूंची आख्यातरूपे

धातूंना वेगवेगळे प्रत्यय लागून त्यांची तिन्ही लिंगी, तिन्ही पुरूषी व दोन्ही वचनी  आख्यातरूपे म्हणजे क्रियापदाची रूपे तयार होतात. नमुन्यातदाखल काही धातूंची सर्व आख्यातांतील रूपे दिली आहेत.

वर्तमानकाळ (प्रथम ताख्यात )

‘बस’ धातू ( अकर्मक ) ‘कर’ साधू ( सकर्मक )

                 एकवचन                        अनेकवचन            एकवचन                         अनेकवचन

प्र.पु.        मी बसतो – ते                  आम्ही बसतो         मी करतो – ते                     आम्ही करतो.

द्वि.पु.    तू बसतोस- तीस – तेस        तुम्ही बसता         तू करतोस – तीस – तेस         तुम्ही करता

तृ.पु.        तो बसतो                          ते                      तो करतो                                ते

              ती बसते                          त्या बसतात         ती करते – ती                      त्या करतात

                ते बसते                          ते                        ते करते                                ती

भूतकाळ ( लाख्यात )

मी बसलो – ले                   आम्ही बसलो                 मी केला – ली – ले               आम्ही केला- ली – ले

तू बसलास – लीस              तुम्ही बसल्या – ल्यात       तू केला – ली – ले                 तुम्ही केला – ल्या – ली

तो बसला                         ते बसले                         त्याने

ते बसली                          त्या बसल्या                    तिने केला – ली – ले              त्यांनी केले – ल्या - ली

ते बसले                            ती बसली                       त्याने

रीतिभूतकाळ ( ई – आख्यात ) ( पद्यरूपे)

मी बसे                              आम्ही बसू                    मी करी                                आम्ही करू

तू बस                               तुम्ही बसा                    तू करीस                               तुम्ही करा

तो – ती – ते बसे                 ते – त्या – ती बसत        तो - ती – ते करी                    ते – त्या – ती  करीत

भविष्यकाळ ( ईलाख्यात )

मी बसेन                           आम्ही बसू                    मी करीन                              आम्ही करू

तू बसशील                         तुम्ही बसाल                 तू करशील                             तुम्ही करा

तो – ती – ते बसेल             ते – त्या – ती बसतील      तो – ती – ते करील                ते – त्या – ती  करतील

आज्ञार्थ ( ऊ – आख्यात )

मी बसू ?                         आम्ही बसू ?                  मी करू ?                             आम्ही करू ?

तू बस                             तुम्ही बसा                      तू कर                                  तुम्ही करा

तो – ती – ते बसो             ते – त्या – ती बसोत          तो – ती – ते करो                   ते – त्या – ती करोत

विध्यर्थ ( वाख्यात )

मी बसावा                        आम्ही बसावे -               मी करावा -                           आम्ही करावे –

वी – वे                            व्या – वी                      वी – वे                                  व्या – वी

तू बसावास -                    तुम्ही बसावेत -              तु- करावास -                          तुम्ही करावेत-

वीस – वेस                       व्यात - वीत                  वीस – वेस                              व्यात – वीत

तो बसावा                       ते बसावे ( त )                तो करावा                               ते करावेत

ती  बसावी                      त्या बसाव्या ( त )          ती करावी                                त्या कराव्यात

ते बसावे                         ती बसावी (त )              ते करावे                                  ती करावीत

संकेतार्थ   (द्वितीय ताख्यात )

जर मी बसतो – ते           जर आम्ही बसतो             जर मी करतो – ते                      जर आम्ही  करतो

जर तू बसतोस                जर तुम्ही बसता              जर तू करतास -                          जर तुम्ही करता

तीस – तेस                                                       तीस – तेस

जर तो बसता                 जर ते बसते                    जर तो करता                             जर ते करते

जर ती बसती                जर त्या बसत्या                जर ती करती                             जर त्या करत्या

जर ते बसते                  जर ती बसती                   जर ते करते                               जर ते करती

अकर्मक ‘हो’ धातू

वर्तमान काळ  ( प्रथम ताख्यात )                         भूतकाळ  ( लाख्यात )

मी होतो – ते             आम्ही होतो                      मी झालो – ले                             आम्ही झालो

तू होतोस – तेस          तूम्ही होता ( त )               तू झालास – लीस – लेस               तुम्ही झाला ( त )

तो होतो                     ते                                  तो झाला                                  ते झाले

ती होते                     त्या होतात                        ती झाली                                 त्या झाल्या

ते होते                       ती                                  ते झाले                                   ती झाली

अकर्मक   ‘ पाहिजे’ धातू                                 अकर्मक  ‘नको’ धातू

मी पहिजे                     आम्ही पाहिजे                  मी नको                                  आम्ही नको

मी पाहिजे ( स )           तुम्ही पाहिजे ( त )             तू नको ( स )                            तुम्ही नको – का

तो – ती – ते                ते – त्या – ती                    तो – ती – ते                            ते – त्या – ती –

पाहिजे                        पाहिजे (त )                       नको                                       नकोत

काही धातूना  भूतकाळाचे प्रत्यय लागताना त्यांच्या रूपात बदल होतो. उदा. कर (केला ), जा (गेला ),मर ( मेला ), दे (दिला ), ये (आला ), धू (धूतला), हो (झाला), घे (घेतला), घाल ( घातला), म्हण (म्हटले), सांग (सांगितला) वगैरे.





क्रियापद विचार : क्रियापदाचे अर्थ व आख्यात विचार


क्रियाविशेषण अव्यय
अविकारी आणि विकारी शब्द प्रकार – उजळणी आतापर्यंत आपण नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या चार शब्द प्रकारांचा अभ्यास केला. या चार शब्दाप्रकारांवर लिंग, वचन, विभक्त्ती किंवा काळ व अर्थ यांचा परिणाम होऊन या प्रकारांतील शब्दांच्या रूपात कसा बदल होतो हे आपण पाहिले.शब्दांच्या आठ प्रकारांपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या प्रकारांना ‘विकारी’ असे म्हणतात. कारण वाक्यात त्यांचा उपयोग होत असताना लिंग, वचन, विभक्ती इ. चा त्यांच्यावर परिणाम होऊन  या प्रकारांतील शब्दांच्या रूपांत बदल होतो. आता आपण अविकारी शब्दप्रकारांचा अभ्यास करणार आहोत. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय या शब्दप्रकारांना अविकारी असे म्हणतात. कारण लिंग, वचन, विभक्ती इ. चा त्यांच्यावर परिणाम होऊन त्या शब्दप्रकारांतील शब्दांच्या रूपांमध्ये काही बदल होत नाही. क्रियाविशेषण नामाबद्दल अधिक माहिती देणा-या शब्दाला ‘नाम विशेषण’ किंवा ‘विशेषण’ असे म्हणतात हे आप पाहिले. त्याचप्रमाणे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणा-या शब्दाला ‘क्रियाविशेषण’ असे म्हणतात. क्रियापदाने जी क्रिया दर्शविली जाते ती केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती प्रमाणात घडली अशा प्रकारची अधिक माहिती देणारे शब्द वाक्यात येतात त्यांना आपण ‘क्रियाविशेषण’ असे म्हणतात. क्रियाविशेषण आणि क्रियविशेशण अव्यय यांतील फरक क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते. म्हणजे लिंग, वचन इ. चा त्याच्या रूपावर परिणाम होतो. त्यानुसार ते बदलते. उदा. ‘ती मुलगी चांगली गाते.’ या वाक्यात ‘चांगली’ हे ‘गाते’ या क्रियापदाचे बिशेषण आहे. जर या वाक्यातील कर्ता पुल्लिंगी ठेवला तर हे वाक्य ‘तो मुलगाचांगला गातो.’ असे होईल. मूळ वाक्यातील कर्ता अनेकवचनी ठेवला तर ‘त्या मुली चांगल्या गातात’ असे ते वाक्य होईअल. म्हणजे ही क्रियाविशेषणे विकारी आहेत. आता पुढील वाक्ये पाहा. १. मुलगी जलद चालते.                            २. मुलगा जलद चालतो. ३. मुली जलद चालतात.                           ४. मुले जलद चालतात. वरील वाक्यांतील ‘जलद’ हे क्रियाविशेषण ‘चालणे’ क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते. तसेच, लिंग, वचन यांमध्ये बदल केला तरी ‘जलद’ या क्रियाविशेषणावर काही परिणाम होत नाही. त्यात बदल होत नाही. ते तसेच राहते. म्हणून त्याला ‘क्रियाविशेषण अव्यय’ असे म्हणतात.्यावरून असे दिसते की, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. कोणत्याही शब्दाचा प्रकार हा त्याच्या रूपावरून न ठरवता वाक्यातील त्याच्या कार्यावरून ठरतो. हे आपण पाहिले आहे. तीच गोष्ट क्रियाविशेषणाच्या बाबतीतही खरी आहे. उदा. ‘मोठा’ हा शब्द विशेषण म्हणून वापरला जातो. तो मुळात विकारी किंवा  सव्यय आहे; कारण लिंगवचनांतील बदलाप्रमाणे त्याची रूपे ‘मोठा – मोठी – मोठे’ अशी होतात. पण त्याला ‘मोठ्याने’ असे तृतीयेचा ‘ने’ हा प्रत्यय लागून रूप तयार होते. तो लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही. म्हणून तो शब्द अविकारी किंवा अव्यय, तर ‘मोठा’ हा शब्द विकारी किंवा सव्यय आहे. तसेच म्हण (क्रि.) सव्यय, तर ‘म्हणून’ अव्यय. ‘जोर’ (नाम) सव्यय तर ‘जोरात’ अव्यय. शब्दाला विभक्तीचा प्रत्यय लागून  ते अव्यय झाले की, मग त्याला पुन्हा विभक्तीचे प्रत्यय लागत नाहीत. क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार क्रियाविशेषण अव्ययांचे वर्गीकरण दोन प्रकारे करतातः (१) त्यांच्या अर्थावरून (अर्थमूलक प्रकार)   (२) त्यांच्या स्वरूपावरून (स्वरूपमूलक प्रकार) अर्थमूलक प्रकार क्रियाविशेषण अव्ययांचे ‘अर्थमूलक प्रकार’ पुढीलप्रमाणे आहेत. १) कालवाचक क्रियाविशेषण अव्यये पुढील  वाक्ये पाहा १. काल शाळेला सुट्टी होती.                               २. मी दररोज व्यायाम करतो. ३. पूर्वी शिक्षक पागोटे घालत.                             ४. तो वारंवार आजारी पडतो. वरील वाक्यातील ‘काल, दररोज, पूर्वी, वारंवार’हे शब्द त्या त्या वाक्यातील क्रिया केव्हा, किती वेळा घडली हे दाखवतात. ही अव्यये क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवितात; म्हणून त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे पुढील तीन प्रकार पडतात. [अ] कालदर्शक – आता, आधी, सध्या,तूर्त, हल्ली, सांप्रत, उद्या, परवा, लगेच, केव्हा, पूर्वी, मागे, दिवसाचा, रात्रीस [आ] सातत्यदर्शक – नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी, अध्यापि, दिवसभर, आजकल [इ] आवृत्तिदर्शक – वारंवार, फिरून पुनःपुन्हा, दररोज, सालोसाल, क्षणोक्षणी २) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये पुढील वाक्ये पाहा. १. परमेश्वर सर्वत्र असतो.                    २. साप माझ्या समोरून गेला. ३. तेथे कर माझे जुळती.                     ४. येथून नदी जवळ आहे. वरील वाक्यातील ‘सर्वत्र’ समोरून, तेथे, येथून’ हे शब्द वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थळ लिंवा ठिकाण दाखवितात; म्हणून त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. याचे दोन प्रकार आहेत; पुढील प्रमाणे [अ] स्थितिदर्शक – येथे, तेथे,जेथे, खाली , वर, कोठे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे, जिकदे, तिकडे, सभोवार. [आ] गतिदर्शक – इकडून, तिकडून, दूर, लांब, तेथून, मागून, पुढून, वरून, खालून ३)रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये पुढील वाक्ये पाहा. १. रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे. २. तो मुलगा उभ्याने पाणी  गटागटा पितो वरील वाक्यांतील ‘सावकाश, जपून, उभ्याने, गटागटा’ हे शब्द क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते ते दाखवतात म्हणून त्यांना  रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. त्यांचे पुढील तीन प्रकार आहेत. [अ] प्रकारदर्शक – असे,तसे,जसे, कसे, उगीच,व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी, तेवी, हळू, सावकाश, जलद. [आ] अनुकरणदर्शक – झटकन, पटकन, पटपट, टपटप, चमचम, बदाबद [इ] निश्चयार्थक – खचित, खरोखर. ४) संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यये पुढील वाक्ये पाहा. १. मी मुलीला अनेकदा बजावले आहे. २. ते गृहस्थ  वाचताना नेहमी अडखळतात. ३. सहलीस गेल्यावेळी आम्ही भरपूर पाणी प्यालो. वरील वाक्यातील ‘अनेकदा, नेहमी,भरपूर’  हे शब्द क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेचे परिमाण दाखवितात. अशा शब्दांना संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. अशा प्रकारचे आणखी काही शब्द पुढीलप्रमाणे किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकूल, मुळीच, भरपूर, बहुत, अतिशय, मोजके, पूर्ण. ५) प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यये पुढील वाक्ये पाहा. १. तुम्ही आमच्याकदे याला का?  २. आपण मला आपल्या घरी न्याल ना? वरील वाक्यातील ‘का, ना’ हे शब्द त्या त्या वाक्यातील विधानांना प्रश्नाचे स्वरूप देतात. अशा शब्दांना. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. ६) निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यये पुढील वाक्ये पाहा १. तो न चुकता येतो.            २. तो तोंड उघडेल तर ना. वरील वाल्यातील ‘न,ना’ हे शब्द त्या त्या  वाक्यांतील क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शवितात. अशा शब्दांना निषेधार्थक क्रियाविशेषण अव्ययेअसे म्हणतात. स्वरूपमूलक प्रकार सिद्ध, साधित व स्थानिक क्रियाविशेषण अव्यये सिद्ध क्रियाविशेषण अव्यये ‘येथे, तेथे, आज, पुढे, मागे’ इ. शब्द मूलतः क्रियाविशेषण अव्ययेच आहेत. त्यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. साधित क्रियाविशेषण अव्यये- ‘मोठ्याने, वस्तुतः एकदा, हसताना, कोठून’ वगैरेसारखे शब्द मूळ शब्दांना प्रत्यय  लागून बनले आहेत. अशांना साधित क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. [अ] प्रत्यय साधित १. नामसाधित – दिवसा, रात्री, वस्तुतः, व्यक्तिशः,अर्थात २. सर्वनामसाधित – त्यामुळे, ह्यावरून, कित्येकदा ३. विशेषणसाधित – मोठ्याने, एकदा, इतक्यात, एकत्र ४. धातुसाधित – हसू, हसत, हसता, हसताना, हसून ५. अव्ययसाधित – कोठून, इकडून, खालून, वरून, येथपर्यंत ६. प्रत्ययसाधित – शास्त्रदृष्ट्या, मनःपूर्वक, कालानुसार, बुद्धिपुरस्सर. [आ] सामासिक संस्कॄत किंवा फारसी उपसर्ग, शब्दांच्या द्विरूक्तीनं होणारे काही जोडशब्द किंवा सामाजिक शब्द क्रियाविशेषणांचे  कार्य करीत असतात. जसे आजन्म, यथाशक्ती, निःसंशय, यावज्जीव, प्रतिदिन, गावोगाव, गल्लोगल्ली, दररोज, समोरासमोर, हरघडी, गैरहजर. [इ] स्थानिक क्रियाविशेषण अव्यये पुढील वाक्ये पाहा. १. ती काय माती गाते ! (नाम) २. तो इंग्रजी चांगले बोलते. (विशेषण ) ३. तो हसत बोलतो. (कॄदन्त) ४. तू जिन्याने वर ये. (शब्दायोगी) ५. मी तर गरीब . (उभयान्वयी) ६. दहा रूपये तरी लागतील. (उभयान्वयी) वरील वाक्यांतील ‘माती, चांगले, हसत, वर, तर, (खरोखर याअर्थी) तरी (निदान याअर्थी)’ हे इतर प्रकारचे शब्द  आहेत. यांना कोणी स्थानिक क्रियाविशेषण अव्यये असेही म्हणतात. क्रियाविशेषणे व विशेषणे अ) पुढील वाक्ये पाहा (१) गोगलगाय फार हळू चालते.   (२) काळवीट अतिशय जलद धावतो. वरील वाक्यातील फार व अतिशय हे शब्द क्रियाविशेषणांबद्दल विशेष माहिती सांगतात. त्यांचा संबंध अंतिमतः क्रियापदांशीच पोचत असल्याने त्या शब्दांना क्रियाविशेषण अव्यये म्हणावे. आ) पुढील वाक्ये पाहा १) तो फार अशक्त मुलगा आहे.  २) बागेत पेरूचे खूप उंच झाड आहे. वरील वाक्यांतील फार, खूप हे शब्द विशेषणे आहेत. व त्यांचा संबंध नामांशीच आहे. म्हणून त्यांना विशेषणे म्हणावे.



क्रियाविशेषण अव्यय


वाक्य विचार : विभक्तीचे अर्थ काराकार्थ व उपपदार्थ
विभक्ती व सामान्यरूप यांचा अभ्यास आपण यापूर्वी केला आहे. प्रत्येक विभक्तीचा एक प्रमुख अर्थ मानला जातो, त्याचा अभ्यास आप्ण पाठात करू या. वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो. त्याला ‘कारकसंबंध’ असे म्हणतात आणि त्या विभक्तीला ‘कारकविभक्ती’असे म्हणतात. पुढील वाक्ये पाहा ‘ आमच्या वर्गातील मधूने शाळेचे सुवर्णपदक जिंकले’ या वाक्यात ‘जिंकले’  हे क्रियापद आहे. हा या वाक्यातील प्रमुख शब्द होय. ‘मधूने’ व ‘सुवर्णपदक’ या शब्दांचा ‘जिंकले’ या क्रियापदाशी प्रत्यय संबंध आहे. कारण, जिंकणारा कोण ? तर ‘मधू’ या वाक्यातील कर्ता आहे. जिंकण्याची क्रिया कोणावर घडते ? ‘सुवर्णपदक’ या शब्दावर .म्हणून ‘सुवर्णपदक’ हे ‘जिंकणे’ या क्रियापदाचे कर्म आहे. या वाक्यात ‘मधूने’ व ‘सुवर्णपदक’ यांची कारकविभक्ती आहे. कारण , या नामांचा  संबंध क्रियापदाकडे आहे. आता या वाक्यातील ‘आमच्या’ व ‘वर्गातील’ या दोन पदांचा संबंध ‘मधूने’ या शब्दाकडे आहे. तसेच ‘शाळेचे’ या शब्दाचा संबंध ‘सुवर्णपदक’ या नामाकडे आहे. म्हणजे ‘आमच्या , वर्गातील, शाळेतील’ या तीन शब्दांचा संबंध या वाक्यातील ‘जिंकले’ या मुख्य पदाकडे म्हणजे क्रियापदाकडे नसून, ‘मधूने’ व सुवर्णपदक’ या दोन उपपदाकडे आहे. अशा संबंधाला ‘उपपदसंबंध’ किंवा ‘उपपदविभक्ती’ असे म्हणतात. विभक्तीच्या रूपांमुळे वाक्यातील शब्दा – शब्दांमधील हे जे संबंध किंवा नाती जोडली जातात त्यांना विभक्तीचे अर्थ असे म्हणतात वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना ‘कारकार्थ’ असे म्हणतात आणि क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात. त्या संबंधाना ‘उपपदार्थ’ असे म्हणतात. आपण विभक्ती व उपपदार्थ यांची माहिती करून घेऊ. विभक्तीचे अर्थ नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील मुख्य क्रियेशी असणारे संबंध प्रमुख आहेत. वाक्यातील क्रियापद हा प्रमुख शब्द होय. क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो, त्याला कर्ता असे म्हणतात. कर्त्यांची विभक्ती केव्हा  केव्हा प्रथमा असते. प्रथमेचा प्रमुख कारकार्थकर्ता होय. कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडली हे सांगणारा शब्द म्हणजे कर्म- कर्माची विभक्ती द्वितीया. म्हणजेच द्वितीयेचा कारकार्थ कर्म होय. वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते किंवा ज्याच्या साधनाने घडते त्याला ‘करण’ असे म्हणतात. ‘करण’ म्हणजे साधन . ‘मी सुरीने सफरचंद कापले’ या वाक्यात कापण्याची क्रिया ‘सुरी’ या साधनाने केली. म्हणून ‘सुरीने’ ची विभक्ती तृतीया असून तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण आहे. जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते, तेव्हा ते दान ज्याला करण्यात येते त्याच्या वाचक शब्दाला किंवा देणे, बोलणे, सांगणे इ. अर्थाच्या क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला वा स्थानाला ‘संप्रदान’ असे म्हणतात. ‘मी गुरूजींना दक्षिणा दिली. या वाक्यात गुरूजींना याची विभक्ती चतुर्थी व चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदान आहे. (संप्रदान – दान ) क्रिया जेथून सुरू होते तेथून ती व्यक्ती वा वस्तू दूर जाते म्हणजे क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखवावयाचा असतो त्यास ‘अपादान’ असे म्हणतात उदा. ‘मी शाळेतून आत्ताच घरी आलो.’ या वाक्यातील ‘शाळतून’ या शब्दाची विभक्ती पंचमी व पंचमीला मुख्य कारकार्थ अपादान आहे. (अपादान = वियोग ) वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे क्रियेचे स्थान काळ दर्शविणा-या शब्दाच्या संबंधास ‘अधिकरण’ असे म्हणतात. ‘दररोज सकाळी मी शाळेत जातो.’ या वाक्यातील ‘सकाळी’  व ‘शाळेत’ हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ व स्थल दाखवितात. त्यांची विभक्ती सप्तमी व सप्तीमीचा मुख्य कारकार्थ अधिकरण आहे. (अधिकरण – आश्रय, स्थान) विभक्तीचे मुख्य  कारकार्थ  सहा आहेत. (१) कर्ता, (२) कर्म, (३) करण, (४) संप्रदान, (५) अपादान, (६) अधिकरण षष्ठी विभक्तींत शब्दाचा संबंध सामान्यातः क्रियापदाशी येत नाही, दुस-या नामाशी येतो.षष्ठीचा अर्थ संबंध. केव्हा केव्हा षष्ठीलाही कारकार्थ असलेला आढळतो. संबोधनाचा उपयोग हाक मारताना करतात. जे नाम संबोधन म्हणून वापरले जाते. त्याला विकार होतो व प्रत्ययही लागतात. म्हणून संबोधन ही आठवी विभक्ती मानतात. विभक्तीचे प्रत्यय, विभक्ती वप्रमुख कारकार्थ  पुढीलप्रमाणे आहेत.
विभक्ती

प्रत्यय

कारकार्थ

(१) प्रथमा (२) द्वितीया (३) तृतीया (४) चतुर्थी (५) पंचमी (६) षष्ठी (७) सप्तमी (८) संबोधन प्रत्यय नाहीत स, ला, ते, ना ने, ए, शी, नी स, ला, ते, ना ऊन, हून चा, ची, चे, च्या, ची त, इ, आ -, नो कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण हाक
विभक्ती अर्थावरून मानावी की प्रत्ययावरून ?

वाक्यात शब्दाशब्दांतील संबंध (म्हणजेच विभक्तींचे अर्थ ) प्रत्ययांनी दाखविले जातात. विभक्ती ही या संबंधावरून (म्हणजे अर्थावरून ) मानावी की हा अर्थ व्यक्त करणारे जे प्रत्यय त्यांवरून मानावी ? असा वाद नेहमी केला जातो. तसे पाहिले तर अर्थाशिवाय प्रत्यय नाहीत आणि प्रत्ययाशिवाय अर्थ व्यक्त करता येत नाही. विविध अर्थ (म्हणजे संबंध ) व्यक्त होतात म्हणून आपण विभक्ती वेगवेगळ्या मानतो.व हा अर्थ दाखविण्याचे कार्य करतात ते प्रत्यय . अर्थ व प्रत्यय हे परस्परांवर अवलंबून असल्यामुळे विभक्ती या प्रत्ययावरून मानाव्या की अर्थावरून, असा वाद करणे योग्य नव्हे. विभक्ती , विभक्तीमधील फरक प्रत्ययांमुळे सहज ओळखता येतो. म्हणून विभक्ती ही कारकार्थावरून मानण्यापेक्षा प्रत्ययांवरून मानावी.

उपपदार्थ

सामान्यतः एका विभक्तीचा एकच प्रमुख कारकार्थ सांगितला जातो. परंतु तेवढाच तो  त्या विभक्तीला असतो  असे नाही. एकाच विभक्तिप्रत्ययाने वेगवेगळे कारकार्थ आपण व्यक्त करू शकतो. करकार्थ  सहाच असेल तरी उपपदार्थ बरेच आहेत. उपपदार्थात उद्देश्य, विधान, परिणाम, मूल्य, कारण, हेतू, तुलना, संबंध वगैरे महत्त्वाचे उपपदार्थ आहेत. प्रत्येक विभक्तीचे काही कारकार्थ व काही उपपदार्थ तक्त्याच्या स्वरूपात पुढे दिलेले आहेत.

सर्व विभक्तींचे काही महत्त्वाचे कारकार्थ व उपपदार्थ

विभक्ती व प्रत्यय

कारकार्थ

वाक्य

उपपदार्थ

वाक्य

प्रथमा (प्रत्यय नाही) १. कर्ता २. कर्म ३. अधिकरण पक्षी उडतो. मुलगा पुस्तक वाचतो. आम्ही दोन दिवस खेळलो. १. उद्देश्य २. विधान ३. परिणाम ४. अंतर ५. मूल्य तानाजी हा शूर होता. राम राजा झाला. त्याने पाच तोळे सोने घेतले. तो दहा मैल चालतो. केळी एक रूपया डझन.
द्वितीया ( स, ला, ना, ते) १. कर्म (अप्रत्ययी) (सप्रत्ययी) राम आंबा खातो. त्याने चोरास पकडले.
---

(उपपदार्थ नाही)

तृतीया (ने, ए, शी, नी) १. करण २. कर्ता ३. अधिकरण चाकूने लेखणी करतात. मुलाने कुत्र्यास मारले. मे नदीच्या काठाने गेलो. १. रीत २. निमित्त्व ३. न्यूनत्व ४. परिणाम ५. प्रमाण ६. सांनिध्य ७. अवधी ८. नोविका तो ऐटीने चालतो. तो गर्वाने फुललेला होता. तो कानाने बहिरा आहे. भोपळा किलोने विकतात. मी दोन इंचांनी उंच आहे. तो भिंतीशी बसला. तो चार वर्षांनी आला. तो रागाने बोलला.
चतुर्थी ( स, ला, ना, ते) १. संप्रदान २. कर्ता ३.कर्म ४.करण ५.अपादान ६.अधिकरण तू रामाला पुस्तक दे. मला आता चालवते. त्याने मला ओळखले. मी एका घावात दोन तुकडे केले. त्याच्या नाकाला धार लागली आहे. तो मुंबईस गेला. १. उद्देश,हेतू २. परिणाम ३. मूल्य ४.विषय ५. स्वामित्व ६.योग्यता ७.नाते ८.वियोग मी अभ्यासला जातो. गहू शेराला दोन रूपये रूपयाला चार आंबे आंबा रूचीला गोड होता. त्याला घरदार नाही. मुलगी लग्नाला आली. मला बहीण नाही. तो नोकरास मुकला.
पंचमी (ऊन, हून) १.अपादान २. करण तो घरातून बाहेर पडला. तुझ्या हातून हे काम होणार नाही. १.अंतर, हेतू २.तुलना ३.भेद घराहून स्टेशन दोन मैल आहे. संत मेणाहून मऊ असतात. जांबाहून पेरू वेगळा आहे.
षष्ठी (चा,ची,चे) १.कर्ता २.करण ३.अपादान ४. अधिकरण त्याचे लिहून त्याच्या वागण्याचा मला राग आला. शिंक्याचे सुटले. तो दिवसाचा झोपतो. १. प्रयोजन २.स्थित्यंतर ३.मूल्यमाल ४.कार्यकारण ५.जन्यजनक ६. मालकी ७.योग्यता ८.संबंध ९.वाह्य वाहक १०.आधार आधेय ११.धर्माधर्मी १२. साकल्य बसावयाची खोली . काळ्याचे पांढरे झाले. रूपयाची भाजी दगडाची मूर्ती मुलाची आई गोविंदाची सायकल लग्नाची मुलगी त्याची बायको घोड्याची गाडी गाडीचे उतारू योग्यतेचा माणूस गावचा गाव
सप्तमी (त,ई,आ) १.अधिकरण २.करण मी रात्री घरी परतेन. ती शाळेस पायी गेलो १.हेतू २.विषय ३. साहितत्त्व ४. सर्वोत्तमत्व मी तुझ्यापायी बुडालो तो इंग्रजीत कच्चा आहे. टाळ्यांच्या गजरात ठराव मान्य झाला. शहाण्यात शहाणा
संबोधन

संबोधन = हाक मारणे

रामा, इकडे ये

---

---

वरील तक्त्यावरून आता तुमच्या सहज लक्षात आले असेल की, विभक्तीमुळे किती विविध अर्थ आपण व्यक्त करू शकतो. प्रथमेचा अर्थ कर्ता, द्वितीयेचा अर्थ कर्म, असे आपण सर्वसामान्यपणे म्हणत असलो, तरी एका विभक्तीने दुस-या विभक्तीचे अर्थही आपण व्यक्त करतो. म्हणून विभक्ती ओळखताना त्या शब्दाला कोणता प्रत्यय लागला आहे हे पाहून प्रत्ययावरून विभक्ती सांगावी ; मग विभक्तीचा अर्थ वेगळा असला तरी चालेल. विभक्तीचे अर्थ व शब्दयोगी अव्यये विभक्ती प्रत्ययांची कामे करतात. निरनिराळ्या विभक्तींच्या अर्थाने निरनिराळी शब्दयोगी अव्यये नामांस लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्यरूप होते. त्यांना ‘विभक्ती प्रतिरूपक अव्यये’ असे म्हणतात. ही अव्यये विभक्तींचा अर्थही दर्शवितात. या विषयाचा अभ्यास यापूर्वी आपण ‘शब्दयोगी अव्यये’ या पाठात केलेला आहे.





वाक्य विचार : विभक्तीचे अर्थ काराकार्थ व उपपदार्थ


प्रयोग
‘वाक्याविचार’ करताना आपण बरीच माहिती मिळविली ; वाक्य म्हणजे पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह होय. वाक्यातील सर्वांत महत्त्वाचा शब्द म्हणजे क्रियापद होय. वाक्यरूपी कुटुंबाचा तो प्रमुख असतो. क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा वाक्यात जो कोणी असतो त्यास कर्ता असे म्हणतात.वाक्यात निर्देशिलेली क्रिया कर्त्याशीच न थांबता ती केव्हा केव्हा पुढे जाते व ती ज्याच्यावर घडते ते त्या वाक्यातील कर्म होय. कर्ता, कर्म, क्रियापद हे वाक्यातील महत्त्वाचे घटक असतात. ‘प्रयोग’ म्हणजे काय ? वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे  क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. कर्ता- कर्म- क्रियापद हे वाक्यातील महत्त्वाचे घटक .वाक्यातील कर्ता – कर्म – क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला प्रयोग असे म्हणतात. ‘प्रयोग’ हा शब्द संस्कृत ‘प्र + युज’ (= योग) यावरून तयार झाला असून त्याचा अर्थ जुळणी किंवा ‘रचना’ असा आहे.प्रत्येक वाक्यात जे क्रियापद असते त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचनाच अशी असते की ते क्रियापद केव्हा कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग, वचन किंवा पुरूष याप्रमाणे बदलते, तर केव्हा ते क्रियापद मुळीच बदलत नाही. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना तिलाच व्याकरणात ‘प्रयोग’ असे म्हणतात. कर्ता, कर्म व क्रियापद यांच्यामधील परस्पर संबंध व्यक्त करण्याच्या रचनेला किंवा पध्दतीला ‘प्रयोग’ असे म्हणतात. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी विशिष्ट प्रकारची जुळणी किंवा रचना निगडित असणे म्हणजे प्रयोग होय. वाक्याचे मूलाधार आणि प्रयोग “ वाक्यातील रचना मुख्यतः ज्यांच्या आधाराने होते ते वाक्याचे घटक कर्ता, कर्म आणि क्रियापद होत. स्थिती किंवा कृती यांचा बोध करून वाक्यार्थाला पूर्णपणा आणणारा, वाक्यातील सर्वप्रधान शब्द म्हणजे क्रियापद. या क्रियापदाचे सांगितली जाणारी स्थिती किंवा कृती जो अनुभवतो किंवा करतो तो कर्ता आणि त्याच्या कृतीचा परिणां ज्याच्यावर होतो किंवा जे त्याच्या कृतीचा विषय बनते, ते कर्म. या घटकांपैकी ज्याला प्राधान्य द्यावे लागते त्याच्या अनिरोधाने वाक्याची ठेवण बदलते. मुख्य घटकांच्या अनुरोधाने बदलणारी वाक्याची ही ठेवण म्हणजेच प्रयोग.” हे “मराठीः घटना, रचना, परंपरा” (लेखक – श्री. अरविंद  मंगरूळकर व कृष्ण श्रीनिवास अर्जूनवाडकर) या ग्रंथातील विवेचन ‘ पयोग ‘ या संदर्भात अधिक मदत करणारे ठरते. कर्ता आणि कर्म क्रियापदांचा विचार करताना कर्ता  व कर्म यांचा शोध कसा घ्यावा याचा विचार आपण केला आहे. त्याची उजळणी आपण थोडक्यात करूया. क्र्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला ‘- णारा’ प्रत्यय लावून ‘कोण ?’ असा प्रश्न करावा म्हणजे कर्ता मिळतो. उदा. (१) ‘रामा आंबा खातो.’ या वाक्यात ‘खा’ हा धातू आहे. त्याला ‘- णारा’ हा प्रत्यय लावून ‘खाणारा कोण ?’ असा प्रश्न विचारला की ‘रामा’ हे उत्तर मिळते. ‘रामा’ हा या वाक्यातील कर्ता आहे. (२) ‘विद्यार्थी प्रामाणिक आहे.’ या वाक्यात ‘आहे’ हे क्रियापद आहे. ‘अस’ हा धातू आहे. ‘असणारा कोण ?’  असा प्रश्न विचारल्यावर ‘विद्यार्थी हे उत्तर मिळाले म्हणून ‘विद्यार्थी’ हा कर्ता  होय. (३) ‘मला दूध आवडते’ या वाक्यात ‘आवडते’ हे क्रियापद आहे. आवड हा धातू आहे. ‘आवडणारे कोण ?’ असा प्रश्न विचारल्यावर ‘दूध’ हे उत्तर आले म्हणून ‘दूध’ हा शब्द या वाक्यातील कर्ता होय. वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली क्रिया कर्त्यापासून निघते व ती दुस-या कोणावर किंवा कशावर तरी घडते. त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे क्रियेचा रोख किंवा कल असतो ते त्या क्रियेचे कर्म असते. वरील वाक्यांपैकी ‘रामा आंबा खातो.’ या वाक्यातील कर्म शोधताना ‘खाण्याची क्रिया कोणावर घडते ?’ या प्रश्नाचे उत्तर ‘आंब्यावर’ असे येते. म्हणून ‘आंबा’ हे या वाक्यातील ‘कर्म’ होय. सकर्मक क्रियापद  आणि अकर्मक क्रियापद प्रयोगा’चा अभ्यास करताना सकर्मक क्रियापद’ व ‘अकर्मक क्रियापद’ या क्रियापद प्रकारांची थोडक्यात उजळणी आवश्यक ठरते. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरूरी लागते त्यास ‘सकर्मक क्रियापद’ असे म्हणतात. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरूरी लागत नाही. त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. कर्त्यापासून निघालेली  क्रिया कर्मापाशी थांबते तेव्हा त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. कर्त्यापासून निघालेली  क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल, तर ते क्रियापद  अकर्मक क्रियापद असते. सामान्यतः कृतिवाचक धातू सकर्मक असतात, तर स्थितिवाचक व स्थित्यंतरवाचक धातू अकर्मक असतात. काही अकर्मक धातूः- (१) अस, नस, हो, नहो, ऊठ, बस, नीज, झोप, थरथर, रड, पड, सर, मर, धाव, थांब, थक, शक, जाग, झीज, जळ, किंचाळ, तूट, सूट, उजळ, प्रकाश, ओरड, घोर, सळसळ, कीड, राह, वाह, फूल, उमल, उपज, जन्म, पीक, लोळ, पोळ, वाज, भीज. (२) हव, पाहिजे, आवड, वाट, रूच, दीस, परवड, मीळ, कळ, शोभ ,लाज, भी, घाबर, हस या दुस-या गटातील धातूंच्या प्रयोगात संप्रदान , अपादान किंवा अधिकरण अशा अर्थाने एखादे चतुर्थ्यतं पद येते. प्रयोगाचे प्रकार प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार  आहेतः-१. कर्तरीप्रयोग    २. कर्मणीप्रयोग    ३. भावेप्रयोग १.कर्तरीप्रयोग पुढील वाक्य पाहा (१) तो गाणे गातो.                                      (२) ती गाणे गाते. (३) ते गाणे गातात.                                    (४) तू गाणे गातोस. यातील पहिल्या वाक्यात ‘तो’ हा ‘कर्ता’ आहे.आणि ‘गातो’ हे क्रियापद आहे. या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी ‘गातो’ हे क्रियापद कोणाप्रमाणे बदलते हे पाहणे आवश्यक आहे. ते कर्त्याप्रमाणे बदलते की कर्माप्रमाणे बदलते, हे आपण शोधू या. त्यासाठी क्रमाने लिंग, वचन व पुरूष बदलून पाहू . असा बदल करताना एकावेळी एकच प्रकारचा बदल  करणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. वाक्य क्र. २ पाहा. ‘तो’ या पुल्लिंगी कर्त्याच्या ठिकाणी ‘ती’ हा स्त्रीलिंगी कर्ता ठेवला. त्याबरोबर ‘गातो’ हे क्रियापदाचे रूप बदलेले व ते ‘गाते’ असे झाले. म्हणजे या वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंगाप्रमाणे बदलते, असे ठरले. वाक्य क्र.३ पाहा. ‘तो’ या कर्त्याचे अनेकवचनी रूप ‘ते’ ठेवले. त्याबरोबर क्रियापदाचे रूप ‘गातात’ असे झाले. वाक्य क्र. ४ पाहा. कर्त्याचा पुरूष बदलून ‘तू’ हा द्वितीय पुरूषी कर्ता ठेवताह क्रियापदाचे रूप ‘गातोस’ असे झाले. याचा अर्थ असा की, ‘तो गाणे गातो.’ या वाक्यातील ‘गातो’ हे क्रियापद कर्त्याचे लिंग, वचन, व पुरूष यांप्रमाणे बदलले आहे. म्हणजेच येथे क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते.म्हणून हा कर्तरीप्रयोग आहे. कर्तरीप्रयोगात कर्ता हा आपली हुकमत चालवितो. कर्तरीप्रयोगात कर्ता हा धातूरूपेश ( = क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालविणारा) असतो. कर्तरीप्रयोग क्रियापद सकर्मक असेल तर त्यास ‘सकर्मक कर्तरीप्रयोग’ म्हणतात व क्रियापद हे अकर्मक असल्यास त्यास ‘अकर्मक कर्तरीप्रयोग’ असे म्हणतात. उदा. ती गाणे गाते. (सकर्मक कर्तरीप्रयोग ) ती घरी जाते. (अकर्मक कर्तरीप्रयोग ) कर्तरीप्रयोगाची खूण कर्तरीप्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमच असतो. व कर्म हे प्रथमच किंवाअ द्वितीयातच असते. उदा. १. मी शाळेतून आताच आलो. (प्रथम कर्ता) २. पोपट पेरू खातो. (प्रथम कर्म) ३. शिक्षक मुलांना शिकवितात. (द्वितीया कर्म) २. कर्मणीप्रयोग पुढील वाक्य पाहा १. मुलाने आंबा खाल्ला. ४. मुलाने चिंच खाल्ली. २. मुलीने आंबा खाल्ला. ५. मुलाने आंबे खाल्ले. ३. मुलांनी आंबा खाल्ला. वरील वाक्यात ‘मुलाने’ हा कर्म आहे. (वाक्य क्र. १) आता या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी कर्त्याचे लिंग वचन बदलून पाहा. ‘मुलाने’ याच्याऐवजी ‘मुलीने’ किंवा ‘मुलांनी’ असा कर्ता बदलला तरी क्रियापदाचे रूप ‘खाल्ला’ असेच राहते. ( वाक्य क्र.२ व ३ पाहा) कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलत नाही, म्हणून हा कर्तरीप्रयोग  नव्हे. आता कर्माचे लिंग बदलून पाहा. ‘आंबा’ऐवजी ‘चिंच’ हे स्त्रीलिंगी कर्म ठेवले तर क्रियापदाचे रूप ‘खाल्ली’ असे होईल. (वाक्य क्र. ४ व ५ ) आता वचन बदलून पाहा. ‘आंबा’ हे झाले तर, ‘मुलाने आंबे खाल्ले.’ असे वाक्य होईल व त्यात क्रियापद ‘खाल्ले’ असे होईल. म्हणजे या वाक्यात कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, म्हणून हा कर्मणीप्रयोग  आहे. कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते, म्हणजेच कर्म हा धातुरूपेश आहे. कर्मणी प्रयोगात सकर्मक व अकर्मक असे दोन  प्रकार असणार नाहीत. कारण, कर्म असल्याशिवाय कर्मणीप्रयोग  होणार नाही. या प्रयोगातील क्रियापद सकर्मक हवे. कर्मणीप्रयोगाची खूण कर्मणीप्रयोगात कर्म प्रथमान्त असते. कर्ता प्रथमान्त कधीच नसतो. कर्ता  केव्हा तृतीयान्त, चतुर्थ्यन्त, सविकरणी तृतीयान्त किंवा शब्दयोगी अव्ययात असतो. उदारणार्थ, १) तिने गाणे म्हटले. (तृतीयान्त कर्ता व प्रथमान्त कर्म) २) मला हा डोंगर चढवतो. (चतुर्थ्यन्त कर्ता) ३) रामाच्याने काम करवते. (कर्ता सविकरणी तृतीयान्त) ४) मांजराकडून उंदीर मारला गेला. ( कर्ता शब्दयोगी अव्ययान्त) वरील चारही वाक्यांत प्रयोग कर्मणी असला तरी त्याचेही विविध प्रकार आहेत. (१) प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोगः- या प्रयोगात क्रियापद हे लिंगवचनानुसार बदलत असेल तरी बहुतेक कर्ताच प्रधान असतो. त्यास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात. वरील वाक्ये क्र. १ व २ ही याची उदाहरणे आहेत. (२) शक्य कर्मणीए प्रयोगः- वाक्यक्र. ३ मध्ये शक्यता सुचवलेली आहे. यातील क्रियापद ‘शक्य क्रियापद’ आहे. त्यास शक्य कर्मणी प्रयोगअसे म्हणतात. (३) प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ‘ज’ हा प्रत्यय लावून ‘करिजे, बोलिजे, कीजे, देईजे’ अशी कर्मणीप्रयोगाची उदाहरणे पाहावयास मिळतात. उदा. १. त्वां काय कर्म करिजे लघु लेकराने । २. नळें इंद्रासी असे बोलिजेलें ३. जो जो कीजे परमार्थ लाहो. ४. द्विजी निषिधापासाव म्हणीजेलो. या प्रकाराच्या प्रयोगास प्राचीन किंवा ‘पुरूषकर्मणी’ असे म्हणतात. (४) ‘त्याची गोष्ट लिहून झाली’ या प्रकारच्या वाक्यात कर्ता ‘त्याची हा षष्ठी विभक्तीत आहे. ‘लिहून झाली’ या संस्कृत क्रियापदाने क्रियापदाच्या  समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो. अशा प्रकारच्या प्रयोगाला ‘समापन कर्मणी असे म्हणतात. (५) कर्मणीप्रयोगातील कर्त्याला ‘कडून’ हा शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धती प्रमाणे रचना करण्याचा जो नवीन आहे. त्यास ‘नवीन कर्मणी’ किंवा ‘कर्मकर्तरी’ असे म्हणतात. उदा. ‘शिपायाकडून चोर पकडला गेला.’ कर्मकर्तरी प्रयोग पुढील वाक्ये पाहा १. राम रावणास मारतो. २.  रावण रामाकडून व मारला जातो. दोन्ही वाक्यांचा अर्थ जवळजवळ एकच आहे. पहिल्या वाक्यात ‘मारतो’ या क्रियापदाचा कर्ता ‘राम’ हा असून ‘रावण’ हे कर्म आहे. दुस-या वाक्यात ‘रावण’ हा कर्ता आहे. म्हणजे पहिल्या वाक्यातील कर्म हे दुस-या वाक्यात कर्ता बनले आहे. व मूळच्या वाक्यातील कर्त्याला ‘कडून’ हे शब्दयोगी अव्यय जोडले असून धातूच्या भूतकाळी रूपापुढे ‘जा’ या धातुचे मूळच्या काळातील  रूप ठेवले आहे.पहिल्या वाक्यात ‘राम’ या धब्दास प्रधान्य आहे. व त्याचा प्रयोग ‘कर्तरी’ आहे. तर दुस-या वाक्यात ‘रावण’ या शब्दाला म्हणजे मूळच्या वाक्यातील कर्माला प्राधान्य दिल्यामुळे जो प्रयोग जो प्रयोग बनला आहे. त्यास कर्मकर्तरी प्रयोग असे म्हणतात.अशी वाक्यरना इंग्रजीत पॅसिव्ह ला  मराठीत ‘कर्मकर्तरी असे म्हणतात. सकर्मक धातूच्या भूतकालवाचक कृदन्ताला ‘जा’या साहाय्यक धातूची मदत देऊन हा प्रयोग करतात. कर्मकर्तरीला काही जण ‘नवीन कर्मणी’ असे म्हणतात. जेव्हा वाक्यातील कर्माला प्राधान्य देऊन  विधान करावयाचे असते. किंवा कर्ता स्पष्ट नसतो, किंवा कर्त्याचा उल्लेख टाळावयाचा असतो त्यावेळी हा कर्मकर्तरी प्रयोग विशेष सोयीचा वाटतो. कर्म कर्तरी प्रयोगाची काही उदाहरणे १. गाय गुराख्याकडून बांधली जाते. २. न्यायाधीशाकडून दंड करण्यात आला, ३. सभेत पत्रके वाटली गेली. ४. सर्वाना समज दिली जाईल. ३)  भावे प्रयोग पुढील वाक्ये पाहा मुलाने बैलास मारले. या वाक्यातील कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग व वचन  बदलून पाहू. ‘मुलाने’ या ऐवजी ‘मुलीने’ लिंवा ‘मुलांनी’ असा कर्ता ठेवला तरी क्रियापदाचे रूप मारले असेच राहते. ‘बैलास’ या कर्माऐवजी ‘गाईस’ असे स्त्रीलिंगी रूप किंवा बैलाना’ असे अनेक वचनी एऊप ठेवले तरी क्रियापदाचे रूप ‘मारले’ असेच राहते. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या  लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून  ते नेहमी तृतीपुरूषी, नपुंसकलिंगी, एकवचनी, असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस ‘भाने प्रयोग असे म्हणतात. भावे प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय त्याकडे प्राधान्य असते व त्या मानाने कर्ता किंवा कर्म ही दोन्ही गौण असतात. याप्रयोगाची आणखी काही उदाहरणे पाहा. १. रामाने रावणास मारले. २. शिक्षकांनी विद्यार्थ्याना शिकवावे. ३. त्याने आता घरी जावे. ४. त्याला घरी जाववते. यांतील पहिली दोन वाक्ये  सकर्मक आहेतव पुढील दोन वाक्ये अकर्मक आहेत. भावे प्रयोगाचे (१) सकर्मक भावे प्रयोग व (२) अकर्मक भावे प्रयोग असे दोन प्रकार आहेत. भावे प्रयोगाची लक्षणे (१) कर्ता तृतीयान्त किंवा चतुर्थ्यन्त असतो. (वरील वाक्ये क्र. १ ते ४) (२) कर्म असल्यास त्याची सप्रत्ययी द्वितीया विभक्ती असते. (वाक्ये  क्र. १ व २) (३) अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विध्यर्थी असते. (वाक्य क्र. ३) (४) श्क्यार्थक क्रियापदांचा नेहमीच भावे प्रयोग होतो. (वाक्य क्र. ४) भावकर्तरी प्रयोग पुढील वाक्ये पाहा १. मला आज मळमळते. २. त्याला घरी पोहचण्यापूर्वीच सांजावले. ३. आज सारखे गडगडते. ४. सहलीस जाताना कात्रजवळ उजाडले. वरील वाक्यातील क्रियापदांना कर्ते असे नाहीत. सर्वच वाक्यांतील  क्रियापदे तृतीयपुरूषी नपुंसकलिंगी एकवचनी आहेत; म्हणजे ती भावेप्रयोगी आहेत. पण त्यांना कर्ते नसल्यामुळे हा अकर्तृक भावेप्रयोगी होय.अशा वाक्यात क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळे  यास ‘भावकर्तरी प्रयोग’ असेही म्हणतात. (येथे साजांवले = सांज झाली, मळमळते = मळमळत होते, गडगडत = गडगडत होते. ४) मिश्र किंवा संकर प्रयोग मराठीत मुख्य  प्रयोग तीन आहेत. (१) कर्तरी, (२) कर्मणी व (३) भावे. पण बोलताना आपण असा काही वाक्यप्रयोग करतो, की तो म्हटला तरी कर्तरी असतो व म्हटला तर कर्मणी किंवा भावे प्रयोग असतो. म्हणजे एकाच वाक्यात दोन प्रयोगाचे मिश्रण झालेले आढळते. मिश्रण  यालाच ‘संकर’ असेही म्हणतात. अशा मिश्र प्रयोगांना ‘संकर प्रयोग’ असेही म्हणतात. १.कर्तृ – कर्म संकर पुढील वाक्ये पाहा १. तू मला पुस्तक  दिले.  (कर्मणीप्रयोग) २. तू मला पुस्तक दिलेस. (कर्तरी व कर्मणी) वरील वाक्यता ‘दिले’ हे क्रियापद ‘पुस्तक’ या कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे  बदलते. जसे, पुस्तके दिली, ग्रंथ दिला. म्हणजे पहिल्या वाक्यात कर्मणीप्रयोग आहे. आता दुसरे वाक्य पाहा. ‘पुस्तक’ या कर्माचे वचन बदलताच (पुस्तके) ‘दिलीस’  असे रूप होते. म्हणजे हा कर्मणीप्रयोग झाला. आता  या वाक्यातील ‘तू’ या कर्त्यांचे  वचन बदलून पाहा. ‘तुम्ही मला पुस्तक दिलेत’ असे वाक्य होईल. म्हणजे ‘क्रियापद’ ‘दिलेस’ हे कर्त्याप्रमाणेही बदलते. हा कर्तरीप्रयोग होतो. ‘तू मला पुस्तक दिलेस.’ याक्यात कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगाच्या छटा  आडळतात. म्हणून याला कर्तृ- कर्मसंकर प्रयोग’ असे म्हणतात. या प्रयोगाची आणखी  काही उदाहरणे पाहा १. तू कविता म्हटलीस २. तुम्ही कामे केलीत. ३. तू लाडू खाल्लास. २) कर्म – भाव संकर प्रयोग पुढील वाक्ये पाहा १. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. (कर्मणी ) २. वडिलांनी मुलाला शाळेत घातले.( कर्तरी व भाव) वरील पहिल्या वाक्यात कर्ता तृतीयान्त आहे. म्हणून हा कर्तरीप्रयोग नव्हे, आता ‘मुलाला’ या कर्माचे लिंग वचन बदलून पाहा. ‘मुलीला शाळेत घातली’ ‘मुलांना शाळेत घातले’ अशी रूपे होतील. म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते म्हणून हा कर्मणीप्रयोग आहे. दुस-या वाक्यात ‘घातले’ क्रियापद कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे   बदलते म्हणून हाही कर्मणीप्रयोग आहे. शिवाय कर्ता तृतीयान्त आहे, कर्म द्वितीयान्त आहे व क्रियापद तृतीय पुरूषी नपुंसकलिंगी एकवचनी आहे. म्हणजे भावे प्रयोगाची                                                                                                                 त्यात छटा आहे. ‘वडिलांनी मुलाला शाळेत घातले’ या वाक्यात कर्मणी व भावे या दोन्ही प्रयोगांच्या छटा आहेत. म्हणून त्याला ‘कर्म- भाव – संकर प्रयोग’  असे म्हणतात. आणखी काही उदाहरणेः १. आईने मुलीला निजविले. २. मी त्याला मुंबईस धाडले. ३) कर्तृ – भाव संकर प्रयोग पुढील वाक्ये पाहा १. तू घरी जायचे होते. (भावे प्रयोग) २. तू घरी जायचे होतेस. (कर्तरी व भावे प्रयोग) पहिल्या वाक्यातील प्रयोग भावे आहे. कारण कर्त्याचे लिंग – वचन – पुरूष बदलून पाहा ‘त्याने जायचे होते, त्यांनी जायचे होते,तिने जायचे होते.’ या वाक्यावरून क्रियापदाचे रूप न बदलता ते तृतीय पुरूषी, नपुअसकलिंगी, एकवचनी राहते. पण ‘तू घरी जायचे होतेस’ या वाक्यात भावे प्रयोगाची छटा असून कर्त्याच्या वचनाप्रमाणे ते ‘तुम्ही घरी जायचे होतेत’ असे बदलताना आढळते. म्हणजे या वाक्यातील क्रियापद अंशतः कर्तरी आहे. येथे कर्तरी व भावे या दोन प्रयोगांच्या छटा एकत्र आढळतात. म्हणून यास ‘कर्तृ – भाव संकर प्रयोग म्हणतात. आणखी काही उदाहरणे १. तू गाईला घालविलेस २. तू मला वाचविलेस ( कर्तृ – कर्म संकर प्रयोग व  कर्तृ – भाव संकर प्रयोग हे बहुधा द्वितीय पुरूषी कर्ता असताना होतात. कर्ता प्रथमपुरूषी असताना संकरप्रयोग आढळत नाहीत.)

2 comments:

  1. खुप छान माहिती आहे सर. मी पन थोडी लिहली आहे. वाचा मराठी व्याकरण

    ReplyDelete