समाजसुधारक
महात्मा जोतिबा फुले
**ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
**१८२८ - जन्म कटगूण,सातारा जिल्हा
**१८३४ ते १८३८ - पंतोजीच्या शाळेत शिक्षण झाले.
**१८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
**१८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
**१८४७ - लहूजी बुवांकडेदांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
**१८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
**१८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
**१८४८ - भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
**सप्टेंबर ७, १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
**१८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
**मार्च १५, १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
**नोहेंबर १६ १९५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतफ. विश्रामबाग वाड्यात सत्कार.
**१८५३ - 'दि सोसायटी फॉरप्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग न्ड अदर्स' स्थापन केली.
**१८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
**१८५५ - रात्रशाळेची सुरवात केली.
**१८५६ - मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
**१८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
**१८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
**१८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
**१८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
**१८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
**१८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
**१८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
**१८७५ - शेतकर्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
**१८७५ - स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
**१८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
**१८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
**१८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
**१८८७ - सत्यशोधक समाजातफ नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली
**१८८८ - ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
**१८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली.
**२८नोव्हेंबर १८९र्० पुणे येथे निधन झाले.
*******ज्योतीरावांची ग्रंथसंपदा - नाव साहित्यप्रकार लेखन काळ
१) तृतीय रत्न नाटक १८५५
२) छत्रपती शिवाजी - राजे भोसले यांचा पवाडा पोवाडा १८६९
३)ब्राह्मणांचे कसब १८६९
४)गुलामगिरी १८७३
५)शेतकर्यांचा आसूड १८८३
६)सत्सार १ सत्सार २ १८८५
७)इशारा १८८५
८)सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ १८९१ (मृत्यूनंतर प्रकाशित )
९)अखंड काव्य रचना 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
१८८०- नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
**********************************************************************************************
आंबेडकर भीमराव रामजी
**(१४ एप्रलि १८९१ - ६ डिसेंबर १९५६)
**एक थेार भारतीय पुढारी अस्पृश्यांचे नेते व भारतीय संविधानाचे शिल्पकार. रत्नागिरी जिल्हाचे मंडणगडाजवळ असलेले आंबवडे हे त्याचे मुळ गाव त्याचे वडिल रामजी सकपा हीे लष्करात सुभेदार होते. ते महूं येथे असताना आंबेडकराचा जन्म झाला. ते सहा वर्षाचे असताना त्याची आई मरण पावली. आंबेडकराचे पालन पोषण वडिल व आत्या यांनी केले. आंबेडकराचे
प्राथमिक शिक्षण सातार्यात झाले व माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मूंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कालेजमध्ये झाले. पदवि घेतल्यानंतर त्यांना बडोदे संस्थानची शिष्युवृत्ती मिळवुन १९१३ मध्ये ऊच्च शिक्षणासाठी अमेरीकेस गेले.
**हे लोकजागृतीचे कार्य चालु असताना स्वत:चे अर्धवट राहिलेले शिक्षण पुर्ण करण्याकरिता, ते मूख्यत:आपले स्नेही नवल
भथेना आणि छत्रपती शाहू यांच्या मदतीने इंग्लडला गेले त्यांनी लंडन विद्यापिठाची डी.एससी, ही दूर्लभ पदवी १९२३ साली संपादन केली. ते बॅरिस्टर झाले. मायदेशी परतताच मुबंईस त्यानी काही काळ प्राध्यपकाचे व प्रार्चायाचे काम केले तथापी अस्पृश्याच्या हिताचे कार्य त्यानी चालूच ठेवले. १९२४ मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारिणी'हि संस्था स्थापन केली.'शिकवा, चेतवा, व संघटीत करा ' हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते १९२६ साली सातारा जिल्हयातील रहिमतपुरला भरलेल्या महार-परिषदेत त्यांनी अस्पृश्य बंधुना वतनदारी व गावकीचे हक्क सोडून देण्याचा संदेश दिला त्यामूळे शेकडो महारांनी गावकीची कामे सोडून इतर कामे करण्यास सूरवात केली. १९२७ मध्ये कूलाबा जिल्हातील महाडच्या चवदार तळयावर अस्पृश्यांना इतराप्रमाणे पाणी भरता यावे, म्हणून त्यानी आपल्या हजारो अनूयायासह सत्याग्रह केला व अंस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृती जाळली.
भथेना आणि छत्रपती शाहू यांच्या मदतीने इंग्लडला गेले त्यांनी लंडन विद्यापिठाची डी.एससी, ही दूर्लभ पदवी १९२३ साली संपादन केली. ते बॅरिस्टर झाले. मायदेशी परतताच मुबंईस त्यानी काही काळ प्राध्यपकाचे व प्रार्चायाचे काम केले तथापी अस्पृश्याच्या हिताचे कार्य त्यानी चालूच ठेवले. १९२४ मध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारिणी'हि संस्था स्थापन केली.'शिकवा, चेतवा, व संघटीत करा ' हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते १९२६ साली सातारा जिल्हयातील रहिमतपुरला भरलेल्या महार-परिषदेत त्यांनी अस्पृश्य बंधुना वतनदारी व गावकीचे हक्क सोडून देण्याचा संदेश दिला त्यामूळे शेकडो महारांनी गावकीची कामे सोडून इतर कामे करण्यास सूरवात केली. १९२७ मध्ये कूलाबा जिल्हातील महाडच्या चवदार तळयावर अस्पृश्यांना इतराप्रमाणे पाणी भरता यावे, म्हणून त्यानी आपल्या हजारो अनूयायासह सत्याग्रह केला व अंस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृती जाळली.
**'अस्पृश्यता हा हिंदुधर्माला लागलेला कलंक आहे भारतीय संस्कृतीचा पाया घालणार्या सर्व ऋषीमुनी महात्म्यांनी हे विधान केले आहे. पण तो कलंक घालविण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही. आजही तो कलंक पुसला गेलेला नाही. तरी या समाजातील अस्मिता जागृत करणारा पहिला महामानव डॉ. आंबेडकर यांनाच मानले पाहिजे. यांचा जन्म १४
एप्रिल, १८९१ साली झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील 'आंबवडे' हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सकपाळ सुभेदार- मेजर या पदावर पोहोचले होते. त्यांच्या मातृघराण्यालाही शौर्याची परंपरा होती.
एप्रिल, १८९१ साली झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील 'आंबवडे' हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सकपाळ सुभेदार- मेजर या पदावर पोहोचले होते. त्यांच्या मातृघराण्यालाही शौर्याची परंपरा होती.
**रामजी लष्करी शाळेचे मुख्याध्यापक होते. महात्मा फुले व माधवराव रानडे यांच्याशी सहचिंतन करणारे होते. मद्य आणि मांस यांपासून अलिप्त होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेबांना सुपारीचेही व्यसन नव्हते. बाबासाहेब जात्याच बुध्दिमान, परिश्रमशील होते. आई-वडिलांचे उत्तम संस्कार त्यांच्यावर घडले होते. शिक्षण हेच समाज परिवर्तन घडवून आणणारे अमोघ अस्त्र आहे हे त्यांनी जाणले. भगवान बुध्द, कबीर आणि महात्मा फुले या तिघांना ते आपले गुरू मानीत. **बुध्दाचे चरित्र ते रात्रंदिवस लिहित होते, शिकत होते. १९०८ साली ते मॅटि्रकची परीक्षा उत्तीर्ण झाले. एल्फिन्स्टन कॉलेजमधून १९१२ साली बी.ए. झाले. बडोद्याच्या प्रागतिक राजेसाहेबांनी शिष्यवृज्ञ्ल्त्;ाी देऊन त्यांना अमेरिकेत पाठविले. तेथे ते अर्थशास्त्र विषयात एम.ए, पीएच.डी. झाले. बडोदा संस्थानच्या सेवेत काही काळ राहिले. पण समाजातील दलितांच्या जातीयतेचा तिढा सुटलेला नव्हता. शिक्षणाशिवाय हा सुटणार नाही, हे त्यांच्या मनाने पक्के घेतले. आणि मग त्यांनी कोल्हापूरच्या राजर्षि शाहू छत्रपतींच्या प्रोत्साहनाने १९२३ साली लंडन गाठले. तेथे लंडन विद्यापीठाचे डी.एस.सी. झाले. त्यांनी अनेक शिक्षणसंस्था काढल्या. दलितवर्ग शिकू लागला. त्याची अस्मिता जागृत झाली. बाबासाहेबांनी अनेक शोधप्रबंध लिहिले. प्रचंड पुस्तके लिहिली. दलितांच्या हक्कासाठी लढे दिले. सारा समाज ढवळून निघाला.
**१५ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदामंत्री झाले. विशाल भालप्रदेश, तेजस्वी डोळे, उंचापुरा सुदृढ बांधा, करारी वृज्ञ्ल्त्;ाी, निग्रही स्वभाव. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी त्यांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतली. शरीर थकले होते. आजार आणि वृध्दत्व यामुळे ६ डिसेंबर, १९५६ रोजी ते पंचमहाभूतात विलीन झाले. दिल्लीच्या संसद भवनासमोर त्यांचा भव्य पुतळा आजही अस्मितेची संहिता देत उभा आहे.
जीवनपट :
जन्म : १४ एप्रिल १८९१,
जन्मगाव : महू
मुंबई विद्यापीठातुन पदवी संपादन.
अमेरिका व इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण व प्रसिध्द विद्यापीठांच्या सर्वोच्च पदव्या संपादन.
१९२० पासून अस्पृश्यांचे संघटन करण्यास व त्यांच्या जागृतीस सुरूवात.
मुकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), ही नियतकालिके सुरू केली.
बहिष्कृत हितकारिणी सभा(१९२४), स्वतंत्र मजुर पक्ष (१९२६)
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारताचे पहिले कायदेमंत्री.
शेडयुल्ड कास्ट फेडरेशन (१९२४) यांसारख्या राजकिय संघटना पक्ष स्थापन
कोलंबीया विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रबंध लिहुन १९१६ साली पी.एच.डी. मिळविली व बॅरिस्टर ही पदवी.
मंुबईच्या सिडनेहम कॉलेजात दोन वर्ष अध्ययनाचे काम.
१९२३ साली लंडन विद्यापीठाची डी. एस. सी. ही अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवली.
१९३२ पुणे करारावर सही.
१९५६ साली नागपुरात धर्म त्याग.
मृत्यु : ६ डिसेंबर १९५६
जन्म : १४ एप्रिल १८९१,
जन्मगाव : महू
मुंबई विद्यापीठातुन पदवी संपादन.
अमेरिका व इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण व प्रसिध्द विद्यापीठांच्या सर्वोच्च पदव्या संपादन.
१९२० पासून अस्पृश्यांचे संघटन करण्यास व त्यांच्या जागृतीस सुरूवात.
मुकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), ही नियतकालिके सुरू केली.
बहिष्कृत हितकारिणी सभा(१९२४), स्वतंत्र मजुर पक्ष (१९२६)
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारताचे पहिले कायदेमंत्री.
शेडयुल्ड कास्ट फेडरेशन (१९२४) यांसारख्या राजकिय संघटना पक्ष स्थापन
कोलंबीया विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रबंध लिहुन १९१६ साली पी.एच.डी. मिळविली व बॅरिस्टर ही पदवी.
मंुबईच्या सिडनेहम कॉलेजात दोन वर्ष अध्ययनाचे काम.
१९२३ साली लंडन विद्यापीठाची डी. एस. सी. ही अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवली.
१९३२ पुणे करारावर सही.
१९५६ साली नागपुरात धर्म त्याग.
मृत्यु : ६ डिसेंबर १९५६
धोंडो केशव कर्वे
धोंडो केशव कर्वे | |
---|---|
टोपणनाव: | अण्णा |
जन्म: | (एप्रिल १८, इ.स. १८५८ मुरूड |
मृत्यू: | नोव्हेंबर ९, इ.स. १९६२) |
चळवळ: | स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा |
पुरस्कार: | भारतरत्न |
वडील: | केशव कर्वे |
पत्नी: | राधाबाई धोंडो कर्वे , आनंदीबाई धोंडो कर्वे |
धोंडो केशव कर्वे (एप्रिल १८, इ.स. १८५८ - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२)महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. . इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली
बालपण आणि तारुण्य[संपादन]
रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इ.स. १९१४पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. अण्णा गणिती होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.
पुनर्विवाह[संपादन]
त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.
अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, इ.स. १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे.
कार्य[संपादन]
इ.स. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली. विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती.
स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.
इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली केली.
पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' आणि त्यानंतर `महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' असे त्याचे नामकरण करण्यात आले. १९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते.
अर्थात, हे सगळे काही सहजसाध्य नव्हते हे नक्कीच. या कार्यामुळे कर्मठ, सनातन पुणेकरांचा त्यांना रोष पत्करावा लागला. संस्था चालविण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने कित्येक वर्ष अण्णासाहेबांना हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज पायी प्रवास करावा लागत असे. आपल्या संस्थांसाठी कुणाकडे देणगी मागायला गेल्यावर कित्येक वेळा त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळत असे. पण अत्यंत जिद्दीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.
जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' (एसएनडीटी) असे नामकरण करण्यात आले.
अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबलीकरणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.
कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले.
मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिले. स्त्री शिक्षणासाठी कर्वे यांनी खूप मोलाचे कार्य केले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठची स्थापना[संपादन]
त्यांनी एका जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले होते. त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठाचा विचार येत होता. विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून इ.स. 1910 मध्ये ‘निष्काम कर्ममठ‘ या संस्कारपीठाची स्थापना केली.
इ.स. १९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून, इ.स. १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. स्त्रीशिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली. अंत्यजांना आणि स्त्रियांना दुर्बल घटक लेखून त्यांना विद्येपासून वंचित करणाऱ्या समाजात अण्णांनी आपल्या तपोबलावर हा चमत्कार घडविला. अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः‘ अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या प्रत्येक संस्थेचे भरणपोषण केले.
इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची माहिती जगाला करून दिली. बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाइन यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली. टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले. अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या.अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले. `पद्मविभूषण' हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान `भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आले. एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. धोंडो केशव कर्वे हे आधुनिक महाराष्ट्रातील एक स्त्री सुधारणा करणारे म्हत्वाचे व्यक्तिमत्व आहे.
आजही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था' दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.[१]
सावित्रीबाई जोतीराव फुले
(जन्म : नायगाव, खंडाळा तालुका, सातारा जिल्हा; ३ जानेवारी, इ.स. १८३१; मृत्यू : पुणे, १० मार्च, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपलया नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.
अनुक्रमणिका
चरित्र[संपादन]
सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४०(1850) साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७(1847) रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.१ जानेवारी, इ.स. १८४८(1848) रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सा-या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले.१८४७-१८४८(1847-1848) साली केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या
सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. १८४७-१८४८ कर्च्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या
(यापूर्वी मिशनर्यानी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५(14-15) शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३(2-3) मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१६ सालीही चालू आहे. (मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे १८४७(1847) मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी १८४९(1849) मध्ये पहिली Co-ed शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.)
सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५(40-45) पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणार्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
इ.स. १८९६(1896) सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणार्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
इ.स. १८९६-९७(1896-97) सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७(1876-77) च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७(1897) मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले.I'm
सत्कार[संपादन]
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो. Savitribai phule
गूगल डूडल[संपादन]
३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमीत्त त्यांचे गूगल डूडल प्रसिद्ध करुन गूगलने त्यांना अभिवादन केले.[१]
दूरदर्शन मालिका[संपादन]
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर दूरदर्शनच्या ’किसान’ वाहिनीवर २८ सप्टेंबर २०१५ पासून सोमवार ते शुक्रवार या काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील हिंदी मालिका दाखविली जात आहे..
सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके[संपादन]
- काव्यफुले (काव्यसंग्रह)
- सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
- सुबोध रत्नाकर
- बावनकशी
सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य, कार्यक्रम वगैरे[संपादन]
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका : शैलजा मोलक)
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : ना.ग. पवार)
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : नागेश सुरवसे)
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (विद्याविकास) (लेखक : ज्ञानेश्वर धानोरकर)
- त्या होत्या म्हणून (लेखिका : डॉ. विजया वाड)
- 'व्हय मी सावित्रीबाई फुले' हे नाटक (एकपात्री प्रयोगकर्ती आद्य अभिनेत्री : सुषमा देशपांडे) (अन्य सादरकर्त्या - डॉ. वैशाली झगडे)
- साध्वी सावित्रीबाई फुले (लेखिका : फुलवंता झोडगे)
- सावित्रीबाई फुले (लेखक : अभय सदावर्ते)
- सावित्रीबाई फुले (लेखिका : निशा डंके)
- सावित्रीबाई फुले (लेखक : डी.बी. पाटील )
- सावित्रीबाई फुले - श्रध्दा (लेखक : मोहम्मद शाकीर)
- सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रतिमा इंगोले )
- सावित्रीबाई फुले (लेखक : जी.ए. उगले)
- सावित्रीबाई फुले (लेखिका : मंगला गोखले)
- सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (लेखक : ना.ग. पवार)
- 'हाँ मैं सावित्रीबाई फुले' (हिंदी), (प्रकाशक : अझिम प्रेमजी विद्यापीठ)
- ज्ञान ज्योती माई सावित्री फुले (लेखिका : विजया इंगोले)
- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका उषा पोळ-खंदारे)
- Savitribai - Journey of a Trailblazer (Publisher : Azim Premji University)
- Shayera.Savitri Bai Phule (in urdu)Author Dr.Nasreen Ramzan Sayyed
सावित्रीबाई संमेलन/अभ्यासकेंद्र/पुरस्कार[संपादन]
- सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन भरते. याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते.
- पुणे विद्यापीठाव्या नावाचा विस्तार करून ते ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करण्यात आले.
- पुणे विद्यापीठात ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र' या नावाचे एक अभ्यासकेंद्र आहे
- सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-
- कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार.
- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा 'सावित्रीबाई फुले पुरस्कार'. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्यास एका समाजसेविकेस दिला जातो. ५००१ रुपये रोख,व सन्मानपत्र, शाल व श्रिफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
- चिंचवडगाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार
- महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी(पुणे)तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले 'आदर्श माता' पुरस्कार
- क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
- मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून)
- सावित्रीबाई फुले महिलामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणार्र्या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्न पुरस्कार : आदर्श माता रत्न, उद्योग रत्न, कला रत्न, क्रीडा रत्न, जिद्द रत्न, पत्रकारिता रत्न, प्रशासकीय रत्न, वीरपत्नी रत्न, शिक्षण रत्न
- मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
- महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा सर्व्प्त्कृष्ट नर्सला देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार
- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवडचे शाखेतर्फे सामाजिक/सीक्षणिक कामासाठीचा सावित्रीबाई पुरस्कार
- माझी मैत्रीण ट्रस्टतर्फे देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार : २११६ साली हा पुरस्कार सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी यांना देण्यात आला.
- युनाइटेड ओबीसी फोरमचा सावित्रीवाई फुले वैचारिक वाङ्मय पुरस्कार.
- वसईच्या लोकमत सखी मंच आणि प्रगत सामाजिक शिक्षण संस्था यांच्यातर्फे देण्यात येत असलेला सावित्रीबाई फुले पुरस्कार
- सावित्रीवाई फुले यांच्या नावाची दत्तक-पालक योजना आहे.
No comments:
Post a Comment